GST Return Filing | दर महिन्याला जीएसटी रिटर्न फाईल करण्याची चिंता मिटली, केंद्र सरकारने नियम बदलला

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दर महिन्याला जीएसटी रिटर्न फाईल करणाऱ्या व्यापारांना दिलासा मिळणार आहे. GST Return filing rules

GST Return Filing | दर महिन्याला जीएसटी रिटर्न फाईल करण्याची चिंता मिटली, केंद्र सरकारने नियम बदलला
GST
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 3:38 PM

नवी दिल्ली : नव्या वर्षांत अनेक नियमांमध्ये बदल झाला आहे. 2021 मध्ये बँकिंग, फायनान्स, टॅक्स आणि इतर नियम बदलले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे जीएसटी रिटर्न फायलिंगमध्येही (GST Return Filing) बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं केलेल्या बदलांमुळे दर महिन्याला जीएसटी रिटर्न फाईल करणाऱ्या व्यापारांना दिलासा मिळणार आहे. जे व्यापारी दरवर्षी जीएसटी रिटर्न फाईल करत होते त्यांना तीन महिन्यांनंतर रिटर्न भरण्याची सुविधा मिळणार आहे. मात्र, त्यापूर्वी निर्णयासंबंधी काही गोष्टी जाणून घेणं गरजेचे आहे. (GST Return filing method changes helpful for small businessman)

या सुविधेचा लाभ कुणाला

केंद्र सरकारनं तीन महिन्यानंतर जीएसटी रिटर्न फाईल करण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ ज्यांच्या व्यवसाय 5 कोटी रुपयांपेक्षा कमी असेल त्यांच्यासाठी आहे. 5 कोटी रुपयांपेक्षा कमी व्यवसाय असलेले व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. जीएसटी रिटर्न फाईलिंसाठी नव्यानं सुरु करण्यात येणारी सुविधा ऐच्छिक असणार आहे. ज्यांना तीन महिन्यांनतर जीएसटी फाईल करायचा आहे ते करु शकतात. प्रचलित पद्धती प्रमाणे दर महिन्याला जीएसटी फाईल करणं सुलभ वाटतं ते देखील व्यापारी जुन्या पद्धतीचा वापर करु शकतात.

वेगळ्या शहरांमध्ये वेगळी सुविधा

एखाद्या व्यावसायिकाचा व्यवसाय वेगवेगळ्या शहरांमध्ये असेल तर त्याप्रमाणं स्टेट जीसटीच्या आधारावर ही योजना राबवली जाऊ शकते. यापूर्वीच्या नियमानुसार जीएसटी फाईल करत नाही तोपर्यंत व्यावसायिकांना अर्थपुरवठा होत नव्हता. नव्यान वाढवण्यात आलेल्या IFF सुविधेनुसार तुम्हाला दर महिन्याला बीटूबी सप्लाई अपलोड करता येईल. यानंतर जीएसटी फाईल केल्यास IFF फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

महिन्याच्या हिशोबानुसार जीएसटी फायलिंग, नोंदणी आवश्यक

दर महिन्याला करावा लागणारा जीएसटी रिटर्न तीन महिन्यांनतर करावे लागणार असले तरी जीएसटी रिटर्नचे पेमेंट महिन्याच्या हिशोबानुसार करण्यात येणार आहे. मागील काळात भरलेल्या रिटर्नच्या आधारावर किंवा सेल्फ असेसमेंटच्या आधारावर रिटर्न फाईल करता येणार आहे. जीएसटी रिटर्न फाईल करण्याच्या पद्धतीत बदल करायचा असेल तर वेबसाईटवर दिलेल्या वेळेत नोंदणी करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या:

कंपन्या विदेशी पण राज्य भारतीयांचं !, ‘हे’ आहेत जगातील मोठ्या कंपन्यांचा कारभार पाहणारे भारतीय सीईओ

ITR date extended latest News | रिटर्न भरतानाची छोटीशी चूक; कर परताव्यात ठरणार मोठी अडचण

PM-Kisan Scheme: शेतकऱ्यांना मोफत मिळणार 36,000 रुपयांच्या योजनेचा लाभ, अशी करा नोंदणी

(GST Return filing method changes helpful for small businessman)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.