9 कॅरेट सोन्याला पण हॉलमार्किंग, दरवाढीशी असे आहे कनेक्शन, तुम्हाला काय होईल फायदा
9 Carat Gold Hallmark : सोने आणि चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. चांदी लाखाचा लवकरच टप्पा गाठेल. तर सोने आता 75 हजारी मनसबदार झाले आहेत. सोने दिवसागणिक सामान्यांच्या आवाक्यबाहेर जात आहे.
सोने आणि चांदीच्या किंमतीत गेल्या सहा महिन्यात तुफान तेजी आली आहे. त्यामुळे सोने व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सला (BIS) एक अपील केले आहे. वाढत्या किंमती पाहता, 9 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्किंग देण्याची मागणी ट्रेडर्सनी केली आहे. य दागिन्यांसाठी हॉलमार्किंग युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांवरील आर्थिक बोजा कमी होण्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. सोने आणि चांदी काही महिन्यानंतर सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरवाढीचे कारण तरी काय
जागतिक बँकांचे व्याजदर कमी झाले आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वळवला आहे. तर चीनमध्ये सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली आहे. अनेक देशाच्या मध्यवर्ती, केंद्रीय बँक सोन्याचा साठा करुन ठेवत आहेत. या सर्व कारणांमुळे सोन्यामध्ये सातत्याने भाव वाढ होत असल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.
काय 9 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्किंग होईल?
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) प्रतिनिधींनी मंगळवारी BIS अधिकाऱ्यांची मुलाखत घेतली. या दरम्यान 9 कॅरेट सोन्यासाठी हॉलमार्किंग आणि HUID क्रमांकाबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली. ET ने दिलेल्या वृत्तानुसार, IBJA चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी वाढत्या किंमतींचा ग्राहकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सांगितले. किंमतीत सातत्याने वाढत आहे. ग्राहकांच्या खिशावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे याविषयावर योग्य तो निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
9 कॅरेटची सध्या किंमत काय
9 कॅरेट सोन्याची किंमत सध्या जवळपास 28,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास आहे. त्यावर ग्राहकांना 3% अतिरिक्त जीएसटी मोजावा लागतो. जर 9 कॅरेट सोन्याच्या हॉलमार्किंगला मान्यता मिळाली. तर ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. त्यांचे बजेट कमी होईल. त्यात दागदागिने खरेदी करता येईल.
हॉलमार्किंगचा असा होईल फायदा?
- हॉलमार्किंगमुळे सोने खरेदी करताना शुद्धतेची हमी मिळेल. हॉलमार्किंग फसवणूक आणि अशुद्धतेपासून वाचवते.
- हॉलमार्क हे सरकार प्रमाणित चिन्ह आहे. त्यामुळे थर्ड पार्टीकडून सोन्याची शुद्धता तपासल्याची खात्री पटते. हे चिन्ह विश्वास आणि पारदर्शकतेचे प्रतिक आहे.
- हॉलमार्कच्या दागिन्यांची विक्री करायची असेल तर त्याचे योग्य मूल्य मिळते.
- हॉलमार्क दागिने तारण ठेवणे आणि त्यावर विमा करणे सोपे होते.