AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smart Driving License : स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्सला का होत आहे उशीर? चीनचा खरंच आहे का यामागे हात

Smart Driving License : महाराष्ट्रात स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स रखडण्यामागे चीनचा हात आहे, असं म्हटलं तर तुम्ही म्हणाल काही पण सांगताय राव, पण हे खरं आहे. देशातील अनेक राज्यांना पण त्याचा फटका बसत आहे. काय आहे नेमकं प्रकरण

Smart Driving License : स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्सला का होत आहे उशीर? चीनचा खरंच आहे का यामागे हात
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 10:42 AM

नवी दिल्ली : तुमचे पण स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स (Smart Driving License) रखडलं आहे का? आधुनिक युगातील परवाना ओळखपत्र मिळत नसल्याने अनेक जण खट्टू झाले आहेत. अनेकांना ही दप्तर दिरंगाई वाटत असेल पण यामागे चीनचा (China) हात आहे, असं सांगितलं तर विश्वास बसेल का? तुम्ही म्हणाल महाराष्ट्रातील स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्सचा आणि चीनचा काय बरं संबंध असेल? स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स वाटप रखडले आहे. राज्यात गेल्या सात ते आठ महिन्यांपासून राज्य सरकारला अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामागचे कारण तरी काय? काय आहे हा सगळा प्रकार, चीनचा याच्याशी काय संबंध असेल बरं..

सेमीकंडक्टर, चीपचा तुटवडा

देशात चीप, सेमीकंडक्टरचा तुटवडा आहे. स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी चिपची गरज असते. त्यातच तुमचा सर्व तपशील जतन, (सेव्ह) करण्यात येतो. कोरोनानंतर चीनमध्ये चिप, सेमीकंडक्टरच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.  उत्पादन घटल्याने चीनकडून होणारा पुरवठा कमी झाला आहे.  तैवान आणि दक्षिण कोरियातून ठराविक उत्पादन होत आहे. भारतात उत्पादन होत नसल्याने त्याचा फटका बसला आहे.

हे सुद्धा वाचा

चिप निर्मितीसाठी प्रयत्न

देशात फॉक्सकॉन ही तैवान कंपनी स्वतंत्र प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. तर वेदांताने गुजरातमध्ये कामाला सुरुवात केली आहे. अमेरिकन कंपनीसुद्धा मैदानात आहेत. त्यामुळे भारतात येत्या काही दिवसात सेमीकंडक्टर आणि चिप उत्पादनाला सुरुवात होईल.

स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स ठप्प

सेमीकंडक्टर चिप्समुळे चिप बेस्ट ड्रायव्हिंग लायसन्स आणि ऑटोमोबाईल रजिस्ट्रेशन कार्ड सारख्या सेवांना फटका बसला आहे. त्यामुळे नवीन कार खरेदी करणाऱ्यांना अडचण येत आहे. वर्सटाईल कार्ड टेक्नॉलॉजीचे सीईओ पेथी सरगुरु यांनी यावर भाष्य केले. त्यांच्यानुसार, 2022 मधील जास्तीत जास्त वेळ आणि 2023 च्या सुरुवातीला चिप पुरवठा साखळीला फटका बसला. चिप्सचा तुटवडा आहे. त्यामुळे स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्सचे काम रखडले आहे.

लवकर मिळेल परवाना

महाराष्ट्राने राज्यातील वाहनधारकांना स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचे कंत्राट दिले आहे. मणिपाल टेक्नोलॉजीजला हे टेंडर देण्यात आले आहे. राज्याचे वाहतूक आयुक्त विवेक भीमनवार यांनी याविषयीची माहिती दिली. त्यांच्यानुसार, ठेकेदार लवकरच हे स्मार्ट कार्ड उपलब्ध करुन देईल, अशी आशा आहे.

वाहन नोंदणीत अडचण

हैदराबादमधील केएल हाय-टेकचे अध्यक्ष आणि सीईओ पी. श्रीनिवास राव यांच्यानुसार, अनेक राज्यांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सची निविदा प्रक्रिया सुरु आहे. चिप्स नसल्याने अनेक ठिकाणी हे कार्ड तयार झाले नाही. ही अडथळ्यांची शर्यत पार करण्याची कवायत सुरु आहे. यामुळे आता वाहन नोंदणी कार्ड देण्यातही मोठी अडचण येत आहे.

प्रिंटआऊटवर काम

काही राज्यात कोविडमुळे वाहन परवाना प्रक्रियेत अडचणी आल्या आहेत. त्यात सरकारी यंत्रणेतील दिरंगाईचा समावेश तर आहेच. पण चिप तुटवड्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. सध्या काही ठिकाणी परवान्याच्या प्रिंटआऊटवर काम भागविल्या जात आहे. तसेच वाहनधारकांना डिजिलॉकरचा वापर करण्यास सांगण्यात येत आहे.

विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू.
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन.
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल.
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार.
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी.