कोरोना लसीच्या नावाने अनेकांची फसवणूक, ‘तोंड बंद ठेवा’, HDFC बँकेचं ग्राहकांना आवाहन

कोरोना लसीच्या नावाखाली अनेकांना लुबाडल्याच्या घटना समोर आल्या आहेत (HDFC bank launches Muh Band Rakho campaign).

कोरोना लसीच्या नावाने अनेकांची फसवणूक, 'तोंड बंद ठेवा', HDFC बँकेचं ग्राहकांना आवाहन
HDFC Bank
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 9:30 PM

मुंबई : कोरोना लसीच्या नावाखाली अनेकांना लुबाडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे या सायबर क्राईम सारख्या घटनांपासून सुरक्षित राहावं, यासाठी एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना ‘तोंड बंद ठेवा’ या मोहिमेअंतर्गत आपली वैयक्तिक माहिती कुणासोबतही शेअर न करण्याचं आवाहन केलं आहे (HDFC bank launches Muh Band Rakho campaign).

कोरोना लसीच्या नावाने लोकांना लुबाडलं जात आहे. लसीकरणासाठी नोंद करण्यासाठी किंवा लसीच्या रजिस्ट्रेशनच्या नावाने काही भामट्यांकडून पैसे मागितले जात आहेत. मात्र, सरकारकडून अशी कोणतीही प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही. याबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून एचडीएफसी बँकेने फेसबुकवर दोन मिनिटाचा व्हिडीओ जारी कर सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

आरोग्य कर्मचारी कधीही तुम्ही किती पैसे कमवतात, तुमचं कोणत्या बँक खात्यात पैसे आहेत याबाबत विचारणार नाहीत. तसेच ते लसीसाठी पैसे मागणार नाहीत. त्यामुळे सतर्क राहा, असं एचडीएफसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे (HDFC bank launches Muh Band Rakho campaign).

यावर उपाय काय?

तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरुन फोन आला, संबंधित व्यक्ती फोनवर कोरोना लसीचं रजिस्ट्रेशन करत असल्याचं सांगत असेल, त्यासाठी तो तुमच्या आधारकार्डचा नंबर, बँक खात्याशी संबंधित किंवा विमा पॉलिसीच्या कागदपत्रांची माहिती मागत असेल तर कृपया देऊ नका. कारण लसीच्या ऑनलाईन नोंदणीच्या नावावर लोकांना लुबाडण्याचा नवा धंदा सायबर गुन्हेगारांनी सुरु केला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोना लसीच्या रजिस्ट्रेशनच्या नावाने याआधी देखील फसवणूक

सायबर गुन्हेगार लोकांना फोन करुन कोरोना लस तयार झाली असून त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे, अशी खोटी माहिती देत आहेत. ते फक्त यावर थांबत नाहीत. तर या लसीची होम डिलिव्हरी केली जात असल्याची माहिती ते फोनवर देत आहेत. त्याचबरोबर ते लोकांकडून होम डिलिव्हरीसाठी पैसेदेखील मागत आहेत. काही भामटे तर लोकांना चिनी कंपनीने तयार केलेल्या कोरोना लसीच्या वितरणाला सुरुवात झाल्याचं सांगत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर काही ठिकाणी बिटकॉईनमध्ये पैशांची मागणी केली जात असल्याचं समोर आलं आहे. या सायबर गुन्हेगारांकडून सरकारी योजनेचं नाव सांगत तुमच्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांची माहिती चोरीला जाऊ शकते. त्यामुळे सतर्क राहण्याची जास्त आवश्यक आहे.

हेही वाचा : धक्कादायक, केंद्रीय आरोग्य सचिवांच्या भावाचा गोळी लागलेला मृतदेह आढळला

'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.