‘Life Insurance क्षेत्रातील कंपन्यांना पेन्शन स्कीम आणि आरोग्य विमा विकण्याचीही परवानगी द्या’
Life Insurance | जगभरात पेन्शन आणि आरोग्य विमा हे जीवन विम्याचेच भाग मानले जातात. कारण निवृत्तीनंतर पेन्शन आर्थिक आधार देते. तर आरोग्य विमा उतारवयात अधिक फायदेशीर ठरतो. त्यामुळे देशातील जीवन विमा कंपन्यांना आरोग्य विमा आणि पेन्शन योजनांसारखी उत्पादने विकण्याचीही परवानगी मिळावी, असे दीपक पारेख यांनी म्हटले.
मुंबई: देशातील जीवन विमा उतरवणाऱ्या कंपन्यांना भविष्यात पेन्शन आणि आरोग्य विमा विकण्याचीही परवानगी मिळावी, अशी मागणी एचडीएफसी लाइफचे (HDFC Life) अध्यक्ष दीपक पारेख यांनी केली आहे. त्यामुळे देशभरात विमा उतरवणाऱ्या लोकांची संख्या वाढेल, असा दावा पारेख यांनी केला. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत पारेख यांनी यासंदर्भात भाष्य केले. देशातील अनेक विमा कंपन्यांना केवळ जीवन विमा विकण्याची मुभा आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा आरोग्य विम्यासारखी उत्पादने विकण्याची परवानगी या कंपन्यांना नाही. यामध्ये बदल झाला पाहिजे, असे पारेख यांनी म्हटले.
जगभरात पेन्शन आणि आरोग्य विमा हे जीवन विम्याचेच भाग मानले जातात. कारण निवृत्तीनंतर पेन्शन आर्थिक आधार देते. तर आरोग्य विमा उतारवयात अधिक फायदेशीर ठरतो. त्यामुळे देशातील जीवन विमा कंपन्यांना आरोग्य विमा आणि पेन्शन योजनांसारखी उत्पादने विकण्याचीही परवानगी मिळावी, असे दीपक पारेख यांनी म्हटले.
कोरोनाकाळात HDFC Life ने जवळपास 4 कोटी जीवन विमा उतरवले. तसेच 2.9 लाख पेक्षा अधिक विम्याचे पैसे अदा केले. ही रक्कम जवळपास 3000 कोटी रुपये असल्याचा दावा दीपक पारेख यांनी केला.
आर्थिक विकासाचा दर 8 ते 10 टक्के राहणार
गेल्या 15 महिन्यात HDFC Life मधील अनेक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी तयार आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासदर 8 ते 10 टक्क्यांच्या आसपास राहील, असे दीपक पारेख यांनी सांगितले.
HDFC Life च्या नफ्यात घट
एचडीएफसी लाइफ (HDFC Life) कंपनीच्या निव्वळ नफ्यात पहिल्या तिमाहीत घट झाली आहे. निव्वळ नफा 33 टक्क्यांनी कमी होऊन 302 कोटी रुपये इतका राहिला. गेल्यावर्षी याचा तिमाहीत कंपनीला 451 कोटींची निव्वळ नफा झाला होता.
संबंधित बातम्या:
20 वर्षांनंतर दर महिना 1.5 लाख रुपये कमवायचेत? जाणून घ्या किती गुंतवणूक करणं गरजेचं
SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँक घरी 20000 रुपयांपर्यंत रोकड पाठवणार, पण कशी?
PM Kisan Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के सबसिडी, फायदा कसा मिळवायचा ते जाणून घ्या