Vijay Kedia : कधी होते रुसलेले, तेच नशीब बसले घरात येऊन थेट, विजय केडिया असे झाले अब्जाधीश

Vijay Kedia : दिग्गज गुंतवणूकदार विजेय केडिया यांनी मेहनतीच्या जोरावर त्यांचे जीवनच पालटून टाकले. एक वेळ अशी होती की, त्यांच्या लहान मुलासाठी दूध खरेदी करायचे होते, पण त्यांच्या खिशात 14 रुपये ही नव्हते. आज केडिया हे अब्जाधीश आहेत. अशी आहे त्यांची यशोगाथा, अनेक गुंतवणूकदार करतात त्यांना फॉलो

Vijay Kedia : कधी होते रुसलेले, तेच नशीब बसले घरात येऊन थेट, विजय केडिया असे झाले अब्जाधीश
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 3:53 PM

नवी दिल्ली | 10 ऑक्टोबर 2023 : प्रत्येकाला आयुष्यात अनेकदा मोठा संघर्ष करावा लागतो. नशीब रडवते. अनेक अडचणी येतात. पण या परिस्थितीशी जो दोन हात करतो, त्याला एक ना एक दिवस रस्ता मिळतोच. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया (Vijay Kedia)यांना पण संघर्ष चुकला नाही. एका मध्यमवर्गीय कुटुंबात कोलकत्ता येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पण शेअर बाजारात (Share Market) ब्रोकर होते. केडिया इयत्ता 10 वीत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्याचा मोठा आघात त्यांच्यावर झाला. वडिलांचा आधार गेल्याने या धक्क्यातून त्यांना लवकर सावरता आले नाही. ते परीक्षेत नापास झाले. पुढे संघर्ष त्यांच्या पाचवीला पुरला.

खिशात नव्हता छदाम

त्यांनी वडिलांचा वारसा चालविण्याचा विचार केला. पण शेअर बाजारातून त्यांना झटक्यावर झटके बसत गेले. त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. त्यांच्या लहान मुलाला दूध आणण्यासाठी सुद्धा त्यांच्या खिशात 14 रुपये नव्हते. त्यावेळी दूधाचे पॅकेट 14 रुपयांना मिळत होते. पत्नीने घरातील डबे हुडकून त्यांना काही शिक्के दिले. त्यातून मुलासाठी दूध आणता आले. वडिलांच्या मृत्यूनंतर या घटनेने त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. त्यांनी कोलकत्ता सोडून मुंबईला येण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

नशीबच पालटले

1990 मध्ये विजय केडिया कोलकत्त्याहून मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांचे नशीब उघडले. 1992 मध्ये शेअर बाजारात प्रसिद्ध बुल रनचे दिवस आले. यामध्ये अनेक गुंतवणूकदारांना मोठी कमाई करता आली. त्यांना छप्परफाड कमाई झाली. विजय केडिया यांचे नशीब पण फळफळले. त्यांनी पंजाब ट्रॅक्टर्सचे शेअर खरेदी केले होते. 35 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. हे शेअर पाचपट उसळले. हे शेअर विकून त्यांनी ACC चे शेअर खरेदी केले. एकाच वर्षात त्याचा भाव दहा पटीने वाढला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. मुंबईत घर खरेदी केले आणि कुटुंबाला ते मुंबईत घेऊन आले.

खरेदी केली दुधाची कंपनी

विजय केडिया यांनी 2009 मध्ये दुधाच्या एका कंपनीचे शेअर खरेदी केले. पत्नीला हे शेअर गिफ्ट दिले. त्यांनी पत्नीची माफी मागितली. मुलासाठी दूध खरेदी करण्यासाठी 14 रुपये खिशात नव्हते. त्याची ही भेट होती. 2022 मध्ये त्यांनी सियाराम मिल्क कंपनीत 1.1 टक्के वाटा मिळवला. आज विजय केडिया यांची संपत्ती 800 कोटींच्या घरात आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.