ऑनलाईन कर्ज देणाऱ्या अ‍ॅपची न्यायालयाकडून गंभीर दखल, अ‍ॅपवर नियंत्रण कधी येणार? ‘आरबीआयला’ सवाल

लोकांच्या अडचणींचा फायदा घेऊन, अत्यंत महाग व्याजदराने कर्ज (Loan) वाटणाऱ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची (online lending platforms) दखल हायकोर्टाकडून घेण्यात आली आहे. याबाबत भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेकडे कोर्टाने (High Court) विचारणा केली आहे.

ऑनलाईन कर्ज देणाऱ्या अ‍ॅपची न्यायालयाकडून गंभीर दखल, अ‍ॅपवर नियंत्रण कधी येणार? 'आरबीआयला' सवाल
आरबीआयचा कारवाईचा बडगाImage Credit source: Newsclick
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 7:31 AM

मुंबई : लोकांच्या अडचणींचा फायदा घेऊन, अत्यंत महाग व्याजदराने कर्ज (Loan) वाटणाऱ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची (online lending platforms) दखल हायकोर्टाकडून घेण्यात आली आहे. याबाबत भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेकडे कोर्टाने (High Court) विचारणा केली आहे. भारतात ऑनलाईन कर्ज वाटणाऱ्या प्लॅटफॉर्मची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म लोकांना उच्च व्याजदराने कमी कालावधीसाठी कर्जाचे वाटप करतात. कर्जाची परतफेड वेळेवर झाली नाही तर त्यांच्याकडून ग्राहकांवर दबाव आणला जातो. दंड म्हणून अव्वाच्या सव्वा रक्कम वसुल केली जाते. याविरोधात हायकोर्टामध्ये एक पीआयएल दाखल करण्यात आली आहे, या पीआयएलवर सुनावनीदरम्यान हाय कोर्टाने कर्ज देणाऱ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म संदर्भात विचारणा केली आहे. आरबीआयने यापूर्वीच अशाप्रकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बंदी कशी घालता येईल, याबाबत एका कमिटीची स्थापना केली होती. त्या कमेटीचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे, या रिपोर्टच्या अमंलबजावणीसंदर्भात हायकोर्टाकडून बँकेला विचारणा करण्यात आली आहे.

कोर्टाने काय म्हटले?

ऑनलाईन कर्ज देणाऱ्या ऑनलाई प्लॅटफॉर्मच्या नियंत्रणासाठी आरबीआयकडून एका कमिटीची स्थापना करण्यात आली होती. या कमिटीने आपला अहवाल सादर केला आहे. मात्र या अहवालात सांगितलेल्या तरतूदी लागू करण्यासाठी आरबीआयने काय पाऊले उचलली असा सवाल यावेळी न्यायालयाने केला आहे. यावेळी बोलताना आरबीआयच्या वकिलाने म्हटले आहे की, संबंधित कमिटीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्या अहवालावर नागरिकांची मते मागवण्यात येत आहेत. यावेळी सुनावणी करताना या अहवालामधील तरतुदी कधी लागू करण्यात येणार याबाबतचे स्टेटस कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 20 जुलैईला होणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

तेलंगनामधील एका व्यक्तीकडून ऑनलाईन कर्जपुरवठा करणाऱ्या प्लॅटॉर्मविरोधात हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म लोकांना उच्च व्याजदराने कमी कालावधीसाठी कर्ज देतात. अडचणीत सापडलेला व्यक्ती त्यांच्याकडून कर्ज घेतो. मात्र त्यानंतर या संस्था कर्ज वसूलीसाठी संबंधित व्यक्तीवर दबाव टाकत असल्याचे त्याने म्हटले आहे. सध्या देशभरात 300 पेक्षा अधिक अ‍ॅप यापद्धतीने काम करत आहेत. यावर आरबीआयचे नियंत्रण असावे अशी मागणी संबंधित व्यक्तीकडून करण्यात आली आहे. या प्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Today’s petrol, diesel rates: आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

BSNL-MTNL: विलीनीकरणाला कर्जाचा डोंगर आडवा, देशभरात लाखभर 4-G टॉवर!

AUTO TRACKER: ‘ह्युंदाई’ला सोशल झळ, वाहन विक्रीचा टक्का घसरला; ‘ही’ कंपनी टॉप

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.