1 वर्षात सोन्यापेक्षा रोक रकमेच्या गुंतवणुकीनं दिला जास्त परतावा, इक्विटीमध्ये 39% पर्यंत उत्पन्न

या सर्व उपकरणांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते. एकाच इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसे गुंतवून कोणालाही बंपर रिटर्न्सची अपेक्षा करता येत नाही.

1 वर्षात सोन्यापेक्षा रोक रकमेच्या गुंतवणुकीनं दिला जास्त परतावा, इक्विटीमध्ये 39% पर्यंत उत्पन्न
Equity Mutual Funds
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 8:21 AM

नवी दिल्लीः आपण जेव्हा भविष्यातील गुंतवणुकीचा विचार करता, तेव्हा एकत्रित मोठी रक्कम जमा करण्याकडे आपला कल असतो. पण एकत्रित म्हणजे कधीही एकाच पोर्टफोलिओ पैसे ठेवू नका. आपण पोर्टफोलिओ बनवत असल्यास त्यात गुंतवणुकीची वेगळी साधने आहेत. आपले ज्या प्रकारचे आर्थिक लक्ष्य आहे, त्याच प्रकारचे नियोजन देखील तेथे असले पाहिजे. आपण केलेल्या गुंतवणुकीचा परतावा किती मिळेल हे आधी जाणून घ्या. परताव्यानुसार त्या योजनेमध्येच पैसे गुंतवा. येथे योजना म्हणजे इक्विटी, गोल्ड, कॅश आणि फिक्स्ड डिपॉझिटचे पर्यायही मिळतील. या सर्व योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते. एकाच योजनेमध्ये पैसे गुंतवून कोणालाही बंपर रिटर्न्सची अपेक्षा करता येत नाही.

योजनेमधून मिळणाऱ्या परताव्यानुसार पैसे गुंतविण्याचा सल्ला

आपण ज्या योजनेमध्ये गुंतवणूक करीत आहात त्या बाजाराची स्थिती तपासा. बाजारात त्या योजनेमधून मिळणाऱ्या परताव्यानुसार पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला जातो. चार प्रकारच्या गुंतवणुकी सर्वाधिक लोकप्रिय आहेत, ज्यात इक्विटी, रोख, सोने आणि निश्चित ठेवींची नावे दिली जातात. गेल्या एका वर्षाच्या रिटर्न्सवर नजर टाकली तर इक्विटी किंवा सेन्सेक्स त्या वर जात आहे. दुसर्‍या क्रमांकावर एफडी, तिसर्‍या क्रमांकावर रोख व चौथ्या क्रमांकावर सोनं आहे. पण सोन्याचा परतावा तोट्यात आहे.

1 वर्षात आपण सर्वाधिक कमाई कुठे केली?

एका वर्षाच्या गुंतवणुकीवर जर आपण पाहिले तर सर्वात जास्त म्हणजे इक्विटी किंवा सेन्सेक्सने, ज्याने 38.9% परतावा दिला. दुसर्‍या स्थानावर मुदत ठेव एफडी आहे, ज्याने 5.1% परतावा दिला. रोख तिसर्‍या क्रमांकावर असून त्यामध्ये 3.13 टक्के परतावा मिळाला आहे. सोन्या चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याने -4.72% परतावा दिला. गेल्या तीन वर्षातील गुंतवणुकीची स्थिती पाहिल्यास इक्विटीने 13.0 % मिळविला. दुसर्‍या क्रमांकावर सोन्याचा परतावा होता, तो 16.72 टक्के परतावा देत होता. तिसर्‍या क्रमांकावर एफडी होते, ज्याने 6.7% मिळकत केली. तर रोख रक्कम 5.03 टक्के वाढीसह चौथ्या क्रमांकावर होती.

5 आणि 10 वर्षांतील सर्वाधिक परतावा

मागील 5 वर्षांतील परतावा पाहता इक्विटीकडून 13.76 टक्के, रोख रकमेतून 5.76 टक्के, सोन्याने 8.33 टक्के आणि एफडीकडून 7 टक्के उत्पन्न मिळवले. इक्विटीने 10 वर्षांच्या ठेवींवर 10.96 टक्के, रोख रकमेवर 7.31%, सोने 7.47% आणि मुदत ठेव 9.25 टक्के रिटर्न दिलेत. यापूर्वी सोने हे गुंतवणुकीचे सर्वात विश्वासार्ह माध्यम मानले जात असे, परंतु गेल्या एका वर्षात सोन्यात मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. एका वर्षात सोन्याच्या गुंतवणुकीतून परतावा मिळण्याऐवजी तोटा झाला. दुसरीकडे इक्विटी किंवा सेन्सेक्स चांगली कमाई करत आहेत. गेल्या तीन वर्षांच्या विक्रमाकडे नजर टाकल्यास सोन्याने आपली मागणी कायम ठेवत गुंतवणूकदारांना आनंदित केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे दर झपाट्याने कमी होत असल्याने कोरोना साथीत त्याचा गुंतवणुकीवर परिणाम झाला.

इक्विटीने चांगला परतावा दिला

अलिकडच्या वर्षांत इक्विटी चांगली कमाई करीत आहे. गेल्या एका वर्षात त्याचा परतावा 38.9% पर्यंत पोहोचलाय. जर आपण 3, 5 आणि 10 वर्षांच्या विक्रमाकडे पाहिले तर त्यातली गुंतवणूक समाधानकारक आहे. याने गुंतवणुकीच्या इतर संधींपेक्षा जास्त पैसे कमविण्याची संधी दिलीय. इक्विटीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण त्यामध्ये अगदी कमी पैशात गुंतवणूक सुरू करू शकता. एखादी व्यक्ती एसआयपीमध्ये 500 रुपयांसह गुंतवणूक करू शकते. जर आपल्याला दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायची असेल तर इक्विटी हा एक उत्तम मार्ग मानला जातो, ज्यामध्ये वर्षानुवर्षे चांगले पैसे मिळू शकतात.

संबंधित बातम्या

LPG cylinder Booking: ‘या’ अ‍ॅपसह गॅस सिलिंडर बुक करा, बंपर कॅशबॅक मिळवा, जाणून घ्या फायदा

Jindal Group च्या शेअर्सने वर्षभरात गुंतवणूकदारांना केले श्रीमंत; 1 लाखाच्या बदल्यात मिळाले 3.65 लाख, आताही संधी

Higher return on cash investment than gold in 1 year, up to 39% return on equity

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.