असा केला कर वसूल, WhatsApp ला मेसेज टाकला, हिंगोलीकरांनी त्यालाच रिप्लाय केला, भारतात पहिल्यांदाच व्हॉट्सअपवरून 56 लाखांची कर वसूली

भारतात पहिल्यांदा व्हाट्सअपच्या माध्यमातून कर भरण्याची अभिनव संकल्पना आंमलात आणली आहे ती हिंगोली नगर परिषदेने. हायटेक पाऊल टाकत परिषदेने कर संकलनासाठी नागरिकांच्या हातातील स्मार्टफोनचा वापर केला. व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्याचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला.हिंगोलीकरांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने अवघ्या चार महिन्यांतच नगर परिषदेने 56 लाखांची कर वसूली केली आहे.

असा केला कर वसूल, WhatsApp ला मेसेज टाकला, हिंगोलीकरांनी त्यालाच रिप्लाय केला, भारतात पहिल्यांदाच व्हॉट्सअपवरून 56 लाखांची कर वसूली
कर भरा व्हॉट्सअपवर Image Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 3:11 PM

हिंगोलीः मालमत्तेचा कर (Property Tax) भरण्यासाठी शहरात व शहराच्या बाहेर राहत असलेल्या नागरिकांना एक ना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय पालिकेला चकरा मारून करदाते (Tax Payers) थकतात यावर वेगळा पर्याय शोधून काढला तो म्हणजे हिंगोली नगरपरिषदेने (Hingoli Nagar parishad). नगरपरिषदेने हायटेक पाऊल टाकत, नागरिकांच्या हातातील स्मार्टफोनलाच त्यांच्या कर संकलनाचे माध्यम बनवले आहे. परिषदेने त्यासाठी व्हॉट्सअप (WhatsApp) या सोशल मीडिया अॅपचा उपयोग केला आहे. या अॅपचा वापर करत भारतात पहिल्यांदा कर संकलनाचा अभिनव प्रयोग परिषदेने राबविला आहे. नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुरवाडे (CEO Ajay Kurwade) यांनी ग्राहकांना व्हॉट्सॲप च्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने नगरपरिषदेचा कर भरण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. बरं मागे राहतील ते हिंगोलीकर कसले. त्यांनी ही या संधीचे सोनं केले आहे आणि नागरिक म्हणून जबाबदारीचे ही पालन केले आहे. कुरवाडे यांच्या या अभिनव प्रयोगाला हिंगोलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अवघ्या चार महिन्यांत थोडा थोडका नव्हे तर तब्बल 56 लाखांची कर वसुली केली आहे. या स्मार्ट प्रयोगाची राज्यभर चर्चा होत असून काळाच्या दाखवलेला हा प्रयोग नागरिकांच्याही पसंतीस उतरला आहे.

जगातून कोठूनही भरा कर

नगर परिषदेचा कर भरणा करण्यासाठी या आधी प्रत्यक्षात लोकांमध्ये जाऊन कर वसुल करावा लागत होता. परंतू कोविड काळात, लोकांसोबत कमी संपर्क आला. यातून कर भरण्याचे आवाहन आमच्या समोर होते. त्यातुनच ही अभिनव कल्पना सूचली. विशेष म्हणजे व्हॉट्सअप वर कर भरण्यासाठी नागरिकांना प्लेस्टोअरला जाऊन नवीन अॅप ओपन करण्याची गरज पडत नाही. व्हॉट्सअपवर हाय असा मॅसेज जरी पाठवला तर सिस्टिम नागरिकाला त्वरीत संबंधित मोबाईल क्रमांकावर त्या नागरिकाचे नाव, त्याचा घर क्रमांक आणि त्याच्याकडे थकीत असलेला कर याची माहिती एका मॅसेजद्वारे पाठवते. त्याचखाली पेमेंट गॅटवेची लिंकही पाठवण्यात येते. या लिंकवर नागरिकाने क्लिक केल्यास त्याला भारतातच काय जगात कोठूनही त्याच्या थकीत कराची रक्कम पाठविता येते. गेल्यावर्षी ही योजना लागू केली आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला, नागरिकांनी चार महिन्यांत 56 लाखांचा कर भरणा केल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुरवाडे यांनी दिली. नागरिकांना कर जमा करण्यासाठी या प्रयोगामुळे परिषदेच्या कार्यालयात येण्याची गरज उरली नाही. घरबसल्या नागरिकांना कर जमा करता येतो. विशेष म्हणजे हिंगोलीकर जगात कुठे ही असला तरी त्याला या प्रयोगाद्वारे कर भरणा करता येणार आहे. या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने पालिकेचा कर भरता येतो. कर भरल्या नंतर लगेच कर भरल्याची डिजिटल पावती कर दात्याला दिली जाते.

हे सुद्धा वाचा

डिजिटल पावती त्वरीत

करपट्टी असो वा नळपट्टी अथवा इतर सेवा नगरपरिषदेच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून भरणे मला अत्यंत सोयीचे झाले आहे. त्यासाठी मला परिषदेत चकरा मारण्याची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे कर भरल्या भरल्या मला त्याची डिजिटल पावतीही मिळल्याची माहिती, शहरातील नागरिक कल्याण असेगावकर यांनी दिली. या व्हॉट्स ॲप कर प्रणाली मुळे मलामत्ता धारकांना कर भरण्यास मोठी मदत होत आहे कर भरण्यासाठी पालिकेच्या चकरा मारायची गरज नाही कोणी कामानिमित्त बाहेरगावी राहत असतील तर त्यांना सुध्धा ऑनलाइन कर भरता येणार आहे ह्या अभिनय उपक्रमाची सगळी कडे वावा होत आहे इतर ही नगरपालिकेने हा उपक्रम हा अंमलात आणावा ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.