गृहकर्जाचा EMI नाही भरता आला वेळेत? चिंता नको, RBI चा हा नियम वाचला का?

Home Loan EMI | घर साकारण्यासाठी अनेक जण बँकेकडून कर्ज उचलतात. अनेकदा सर्वकाही सुरळीत सुरु असताना काही तरी आकस्मिक खर्च येऊन पडतो. वेळेवर हप्ता न चुकवल्याने कर्जदार डिफॉल्टर ठरतो. कर्ज चुकते करण्याची इच्छा असताना काही कारणाने कर्जाचे हप्ते थकले तर आरबीआयचा हा नियम तुमच्या उपयोगी येऊ शकतो.

गृहकर्जाचा EMI नाही भरता आला वेळेत? चिंता नको, RBI चा हा नियम वाचला का?
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 2:30 PM

नवी दिल्ली | 6 डिसेंबर 2023 : घर असो वा कार खरेदी, कोणी खिशात इतकी रक्कम घेऊन थोडंच फिरतो, नाही का? हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँक EMI च्या सुविधेसह कर्ज देते. अनेकदा आकस्मिक खर्च अथवा इतर मोठा खर्च आला की बरेच जण वैयक्तिक कर्ज घेतात. पर्सनल लोन सहज मिळते. पण पुढे ईएमआय भरताना जड जाते. इच्छा असूनही अनेकांना कर्जाचा हप्ता वेळेवर चुकता करता येत नाही. बऱ्याचदा बँका नोटीस पाठवून नंतर अशा कर्जदाराला डिफॉल्टर म्हणून घोषीत करतात. कर्ज बुडव्याचा एकदा शिक्का लागला की कर्ज मिळत नाही. पण अशा ग्राहकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक खास नियम आणला आहे. काय आहे हा नियम?

महागाईने कर्जाचे प्रमाण अधिक

सिबिल (CIBIL) स्कोअर ग्राहकांच्या कर्ज अथवा क्रेडिट कार्डच्या खर्चावर लक्ष ठेवते. नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार, क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या खर्चात वाढ झाली आहे. कोरोना काळापेक्षा वैयक्तिक कर्जाची प्रकरणे अधिक आहे. यासंबंधीची काही आकडे तर यापेक्षा अधिक आहे. महागाई हे त्यामागील कारण असू शकते. सिबिल या खर्चावर देखरेख करते.

हे सुद्धा वाचा

काय आहे RBI चा नियम?

RBI च्या नवीन नियमानुसार, कर्जदाराला आर्थिक अडचण असल्यास, तो वेळेवर कर्जाचा हप्ता भरण्यास सक्षम नसल्यास त्याला रीस्ट्रक्चरचा पर्याय खुला आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ईएमआय 50 हजार रुपये आहे. तर तो या कर्ज प्रकरणाबाबत पूनर्विचार करु शकतो. म्हणजे त्याला त्याच्या कर्जाचा कालावधी वाढवता येईल. त्यामुळे त्याचा कर्जाचा हप्ता 50 हजारांहून कमी होऊन तो 25 हजार रुपये होईल. ग्राहकाच्या सुविधेनुसार ही रक्कम निश्चित करण्यात येईल. जो ग्राहक ही गोष्ट मान्य करतो. त्याच्यावरील दबाव कमी होता. त्याला तात्पुरता दिलासा मिळतो. पण त्याला भविष्यात अधिक रक्कम मात्र मोजावी लागते. कारण जितका कालावधी वाढलेला असेल, तेवढे एकूण व्याज अधिक मोजावे लागेल.

सिबिल स्कोअरवर नाही परिणाम

कोणतीही बँक जेव्हा एखाद्या व्यक्तीला कर्ज देते. त्यावेळी त्याची क्रेडिट हिस्ट्री तपासण्यात येते. बँकांना यासंबंधीचे अधिकार असतात. बँका कर्ज देण्यापूर्वी संबंधित व्यक्तींची क्रेडिट हिस्ट्री माहिती करुन घेतात. जर एखाद्या व्यक्तीच्या हिस्ट्रीसमोरील रकान्यात कर्जबुडव्या, डिफॉल्टर असा शिक्का असेल तर अशा व्यक्तीला दुसऱ्यांदा कर्ज मिळवताना मोठी अडचण येते. एकतर कर्ज मिळत नाही, अथवा त्याला काही तरी तारण ठेवावे लागते.

क्रेडिट स्कोअर असा होतो निश्चित

प्रत्येक व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर वेगवेगळा असतो. हा त्या व्यक्तीने किती वेळेत, न हप्ता चुकविता कर्ज परतफेड केली असेल तर त्या हिशोबाने ठरतो. क्रेडिट स्कोअरवर इतर पण अनेक घटकांचा परिणाम होतो. व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर 300 ते 900 यादरम्यान असतो. 700 हून अधिक क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्तीला बँक सहज कर्ज देते.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.