RBI ने का घेतला असा निर्णय? - आर्थिक रिकव्हरीमध्ये (Economic Recovery) रिअल इस्टेट क्षेत्राचं (Real Estate Sector) महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं RBI ने शुक्रवारी म्हटलं आहे. कारण, या क्षेत्रात फक्त रोजगार मिळत नाही तर हे इतर उद्योगांशीही जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे या क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि यातील धोका कमी करण्यासाठी, 31 मार्च 2022 पर्यंत सगळ्या गृह कर्जाला (Housing Loan) कर्जाचे मूल्य (Loan To Valu) शी लिंक केलं जाणार आहे. आर्थिक धोरणांच्या बैठकीनंतर आरबीआयने याची घोषणा केली आहे.