बिल गेट्स इतके श्रीमंत कसे झाले ? एका निर्णयाने बदलले जीवन

मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेट्स यांचा समावेश जगातील सर्वोच्च दहा श्रीमंत व्यक्तीत होतो. त्यांनी कॉलेजमध्ये असताना घेतलेल्या एका निर्णयाने त्यांचे संपूर्ण जीवनच बदलले

बिल गेट्स इतके श्रीमंत कसे झाले ? एका निर्णयाने बदलले जीवन
Bill GatesImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 29, 2023 | 7:34 PM

मुंबई | 29 ऑक्टोबर 2023 : जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची चर्चा होते तेव्हा बिल गेट्स यांचे नाव आवर्जून घेतले जाते. जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेट्स यांचे नाव आज जगात श्रीमंत व्यक्तीत घेतले जाते. जगातील टॉप 10 श्रीमंतामध्ये बिल गेट्स यांच्या नावाचा समावेश आहे. बिल गेट्स यांचा काल 28 ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा झाला. ते आता 68 वर्षांचे झाले आहेत. बिल गेट्स यांच्याबद्दल काही महत्वाच्या बाबी जाणून घेऊया..ते इतके श्रीमंत कसे झाले हे पाहूयात…

बिल गेट्स यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1955 मध्ये अमेरिका येथील सिएटल, वॉशिंग्टन येथे झाला. सध्या बिल गेट्स जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या स्थानावर आहेत. फोर्ब्जच्या रियल टाईम बिलेनियरच्या यादीनूसार बिल गेट्स यांची संपत्ती 123 अब्ज डॉलर इतकी आहे. बिल गेट्स यांचे वडील वकील होते. बिल यांनी देखील वडीलांप्रमाणेच वकीली क्षेत्र निवडावे अशी त्यांच्या पालकांची इच्छा होती. परंतू असे झाले नाही.

कॉलेज अर्धवट सोडले

वयाच्या 13 वर्षीच बिल गेट्स यांनी आपला पहिला सॉफ्टवेअर प्रोग्रॅम तयार केला होता. बिल गेट्स हे कॉलेज ड्रॉपआऊट आहेत. त्यांनी 1975 मध्ये आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठ सोडले होते. त्यांनी 1975 मध्येच सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. कॉलेज सोडणे आणि मायक्रोसॉफ्टची स्थापना करणे त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. या त्यांच्या निर्णयाने त्यांना पुढे यशाच्या शिखरावर पोहचवले.

दानधर्मावर विश्वास

मायक्रोसॉफ्टची स्थापना बिल गेट्स आणि त्यांचे हायस्कूलचे मित्र पॉल एलन यांनी मिळून केली होती. परंतू साल 1982 मध्येच पॉल यांनी मायक्रोसॉफ्ट सोडून दिले. बिल गेट्स चॅरिटीवर खूपच विश्वास ठेवतात. त्यांनी आपल्या संपत्तीतील खूप सारा पैसा दान केला आहे. बिल गेट्स यांना तीन मुलेही आहेत. बिल गेट्स यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत. तसेच अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूकही केली आहे. सध्या बिल गेट्स मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळातूनही बाजूला झाले आहेत. तसेच चॅरिटीसंदर्भातील कामे ते करीत असतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.