UPI पेमेंट, पेटीएम आणि डिजिटल रुपयामध्ये नेमका काय फरक आहे? 2 मिनिटांत दूर करा गोंधळ

उद्यापासून डिजिटल रुपया चलनात येणार आहे. हा रुपया UPI पेक्षा कसा वेगळा आहे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तरंही जाणून घ्या.

UPI पेमेंट, पेटीएम आणि डिजिटल रुपयामध्ये नेमका काय फरक आहे? 2 मिनिटांत दूर करा गोंधळ
डिजिटल रुपया Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 4:38 PM

मुंबई,  UPI पेमेंटमुळे देशात मोठी क्रांती घडली असताना आता यात भारतीय रिझर्व्ह बँकेनेदेखील एक पाऊल पुढे टाकले आहे.  1 डिसेंबरपासून म्हणजेच उद्यापासून भारतात डिजिटल करन्सीने (Digital Currency) व्यवहाराचा पर्याय उपलब्ध असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 डिसेंबरपासून पायलट प्रोजेक्ट म्हणून रिटेल डिजिटल रुपी (Digital Rupee) लाँच करणार आहे. पायलट प्रोजेक्ट दरम्यान, किरकोळ डिजिटल रुपयाचे वितरण, वापर आणि तयार करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची कसून चाचणी केली जाईल. रिझर्व्ह बँकेच्या या डिजिटल चलनाला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) असे नाव देण्यात आले आहे.

डिजिटल रुपयाचे नाव ऐकताच तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की आता हे सुरू होत असेल तर पेटीएम, गुगल पे आणि फोन पेचे काय करायचे? किंवा यूपीआयचे इतके पर्याय उपलब्ध असताना डिजिटल रुपया का काढावा? किंवा डिजिटल रुपया या सग्यांपासून कसा वेगळा आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.

UPI आणि डिजिटल रुपयामधील फरक

शहरी भागात अर्ध्यापेक्षा जास्त लोकं व्यवहारासाठी UPI चा वापर करतात, परंतु याला डिजिटल चलन म्हणता येणार नाही. कारण UPI द्वारे हस्तांतरित केलेले पैसे केवळ भौतिक चलनाद्वारे चालतात. याचा अर्थ UPI पेमेंटसाठी वापरले जाणारे चलन सध्याच्या भौतिक चलनाच्या समतुल्य आहे. डिजिटल रुपया हे स्वतःच अंतर्निहित पेमेंट असेल, जे चलनाऐवजी डिजिटल पेमेंटसाठी वापरले जाऊ शकते.

हे सुद्धा वाचा

रिझर्व्ह बँक करेल व्यवहार

रिझर्व्ह बँकेने जारी केलेला ई-रुपी डिजिटल टोकन म्हणून काम करेल. दुसऱ्या शब्दांत, CBDC हे RBI द्वारे जारी केलेल्या चलनी नोटांचे डिजिटल स्वरूप आहे. आता UPI आणि डिजिटल रुपयामधील आणखी एक फरक समजून घेऊया. वास्तविक, UPI पेमेंट म्हणजे थेट बँक खाते ते बँक खाते. रिझर्व्ह बँकेने डिजिटल रुपयासाठी म्हटले आहे की, पायलट प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेल्या बँकांच्या डिजिटल वॉलेटद्वारे त्याचा वापर केला जाऊ शकतो.

UPI वेगवेगळ्या बँका हाताळतात आणि या बँका रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली काम करतात. पण तुमचा डिजिटल रुपया थेट रिझव्‍‌र्ह बँकेद्वारे चालवला जाईल आणि त्यावर देखरेख केली जाईल. त्याच्या वितरणात उर्वरित बँकांचा सहभाग असेल. मात्र यावर रिझर्व्ह बँकेचे थेट नियंत्रणअसेल.

सामान्य व्यक्ती व्यवहार कसा करणार?

डिजिटल रुपयाचे व्यवहार व्यक्ती ते व्यक्ती (P2P) आणि व्यक्ती ते व्यापारी (P2M) दोन्ही करता येतात. याशिवाय, जर तुम्हाला व्यापार्‍याला पैसे द्यावे लागतील, तर तुम्ही त्याच्याकडे असलेला QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.