RBI On Repo Rate : वाढलेल्या ईएमआयवर कधी मिळेल दिलासा? सणासुदीत काय असेल इरादा

RBI On Repo Rate : रेपो दर दुसऱ्यांदा जैसे थे ठेवल्याने सर्वसामान्यांना नव्या पैशांचा फायदा झाला नाही. त्यांचा डोक्यावर वाढलेल्या ईएमआयचा बोजा तसाच आहे. आता देशात सणासुदीचे पर्व सुरु होईल. पुढील सहा महिने हे विविध सणांचे आहे. या काळात तरी चाकरमान्यांची ईएमआयमधून सूटका होईल का, असा सवाल विचारण्यात येत आहे.

RBI On Repo Rate : वाढलेल्या ईएमआयवर कधी मिळेल दिलासा? सणासुदीत काय असेल इरादा
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 7:31 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर (RBI On Repo Rate ) दुसऱ्यांदा जैसे थे ठेवल्याने सर्वसामान्यांना नव्या पैशांचा फायदा झाला नाही. त्यांचा डोक्यावर वाढलेल्या ईएमआयचा बोजा तसाच आहे. आता देशात सणासुदीचे पर्व सुरु होईल. पुढील सहा महिने हे विविध सणांचे आहे. पावसाने ओढ दिल्यास सणांचे गणित बिघडू शकते. केंद्र सरकारच्या डोक्याला ताप होऊ शकतो. पण सध्याच्या अंदाजानुसार, देशभरात चांगला पाऊस होण्याचे संकेत आहे. आता विविध सणांची हजेरी लागेल. अशावेळी वाढता ईएमआय हा सर्वांसाठी डोकेदुखी आहे. या आनंदमय काळात तरी चाकरमान्यांची ईएमआयमधून (EMI) सूटका होईल का, असा सवाल विचारण्यात येत आहे.

महागाईवर गणित अवलंबून घाऊक महागाई घटली आहे. पण डाळी, इतर चीज वस्तू अजूनही महाग आहे. खाद्य तेलात मोठा दिलासा मिळाला आहे. इंधनाचे दर अजून कमी झालेले नाहीत. सर्वांनाच महाग दरानेच पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागत आहे. महागाई चार टक्क्यांवर आणण्यासाठी आरबीआयची कसरत सुरु आहे. महागाई कमी झाली तर व्याज दर कमी होतील. परिणामी ईएमआय घटले अशी आशा सर्वसामान्यांना आहे.

गव्हर्नरची भूमिका काय आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची भूमिका मांडली. आताच काही अंदाज बांधणे योग्य होणार नाही. महागाई कमी झाली तर पुढे याविषयी विचार करता येईल, असे ते म्हणाले. पण तज्ज्ञांच्या मते सणासुदीच्या काळात आरबीआय रेपो दरात कपातीची आनंदवार्ता देऊ शकते. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ऐन तोंडावर आल्याने केंद्र सरकारचा मोठा दबाव केंद्रीय बँकेवर असेल.

हे सुद्धा वाचा

रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरात महागाई वाढली आहे. कच्चा तेलाचे भाव कमी झाले असले तर इतरी खाद्यान्न, डाळी यांच्या उत्पादनावर आणि निर्यातीवर प्रतिकूल परिणाम झाला. त्याचा मोठा फटका सर्वच देशांना बसला. अजूनही हे युद्ध सुरु असल्याने जगभरात महागाईचे चटके सहन करावे लागत आहे.

व्याजदरात 6 वेळा वाढ गेल्या वर्षी मे महिन्यापासून व्याज दरात वाढीची सुरुवात झाली होती. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने त्यावेळी आपत्कालीन बैठक बोलावली होती. मे 2022 मध्ये आरबीआयने मोठ्या कालावधीनंतर रेपो दरात बदल केला होता. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत एकूण 6 वेळा रेपो दरात वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला.

रेपो दर म्हणजे काय देशातील व्यावसायिक बँकांना भारतीय रिझर्व्ह बँक कर्ज पुरवठा करते. त्याला रेपो दर असे म्हणतात. रेपो दरात वाढ झाली की केंद्रीय बँक देशातील बँकांना महाग दराने कर्ज पुरवठा करते. बँका कर्जाचा बोजा ग्राहकांवर टाकते. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर व्याजदरात वाढ होते. आरबीआय महागाईत कर्ज कमी होण्यासाठी बाजारात लिक्विडिटी कमी करते. त्यासाठी रेपो दरात वाढ करण्यात येते.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.