जगातील सर्वात मोठे सीईओ किती तास करतात काम ? जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

देशामध्ये नुकतीच आठवड्यातून 70 तास काम करण्याची चर्चा सुरू होती. त्यातच आता भर पडली असून 90 तास काम करण्याचा मुद्दा त्या मध्ये जोडला गेला आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील सर्वात मोठे सीईओ हे स्वतः किती तास काम करतात?

जगातील सर्वात मोठे सीईओ किती तास करतात काम ? जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
work life balance
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 4:58 PM

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी देशातील तरुणांना आठवड्यातून 70 दिवस काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे वर्क लाइफ बॅलन्स बाबत मोठी चर्चा सुरू झाली त्यानंतर या वादात गौतम अडानी पासून एलॉन मस्क पर्यंतची नावे जोडली गेली आहेत. आता L&T चे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यम यांनी आठवड्यात 90 तास काम करण्याबाबत बोलून एक नवीन ट्विस्ट दिला आहे. पण आपल्या कर्मचाऱ्यांकडून इतके तास कामाची अपेक्षा करणारे जगातील सर्वात मोठे सीईओ स्वतः किती तास काम करतात हे जाणून घेणे आवश्यक आहे.

90 तास काम करण्यावर जो वाद सुरू आहे तो सुरू होण्यापूर्वी एलॉन मस्क सारख्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने सांगितले होते की आठवड्यातून 40 तास काम करून जग बदलता येत नाही त्यामुळे लोकांनी आठवड्यातून 80 ते 100 तास काम केले पाहिजे. बॉस आणि सीईओच्या कामकाजाच्या कामगिरी बाबत अनेक सर्वेक्षण करण्यात आली आहेत.

दररोज करावे लागेल बारा तासांपेक्षा जास्त काम

जर तुम्हाला आठवड्यातून 70 तास काम करायचे असेल तर 5 डे वर्किंग वीक संकल्पनेनुसार तुम्हाला दररोज 14 तास काम करावे लागेल. जर तुम्हाला 90 तास काम करायचं असेल तर पाच दिवसात 18 तास काम केल्यासारखे होईल. तसेच जर तुम्ही सात दिवस काम केले तर 70 तासांसाठी तुम्हाला दररोज दहा तास काम करावे लागेल. तसेच 90 तास काम करण्यासाठी तुम्हाला दररोज बारा तासांपेक्षा जास्त काम करावे लागेल.

मिडीयम डॉट कॉम च्या बातमीनुसार एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की जगातील सर्वात मोठे सीईओ आठवड्यातून सरासरी 62 तास काम करतात त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांकडून 70 आणि 90 तासांच्या कामाची अपेक्षा करणे आश्चर्यकारक वाटते. भारताच्या वर्क कल्चर बाबत केलेल्या सर्वेक्षणात असे समजले आहे की येथील लोक आधीच ओव्हरटाईम करतात.

सर्वेक्षणात आणखीन एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे या वादात सर्वात मोठा अडथळा म्हणजे सीईओ आणि बॉस यांना मिळणारा पगार तसेच फ्रेश आणि मिड लेवल कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार. सीईओ आणि बॉसला मिळणाऱ्या पॅकेज मध्ये ते घरातील कामासाठी कामगार ठेवू शकतात. तसेच अनेक चैनीच्या वस्तू घेऊ शकतात. सामान्य कर्मचाऱ्यांसाठी मात्र हे सर्व कठीण आहे.

एलॉन मस्क आठवड्यातून 80 ते 100 तास काम करण्याबद्दल बोलतात तर ते असेही म्हणतात की व्यक्तीने दिवसातून सहा तास झोप घेणे आवश्यक आहे. अन्यथा ती व्यक्ती ऑफिसमध्ये येऊनही काम करणार नाही.

तर गौतम अडाणी यांनी या मुद्द्यावर काही वेगळेच म्हटले आहे. ते म्हणतात की कोणत्याही एका व्यक्तीचे कार्य जीवन संतुलन इतर कोणावरही लादले जाऊ शकत नाही. हे प्रत्येकासाठी वेगळे असू शकते. एकच गोष्ट व्हायला हवी की जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत असता तेव्हा त्यांनाही आनंद देता आला पाहिजे.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.