SIP चे प्रकार किती रे भाऊ? Step-Up SIP म्हणजे काय ? समजून घ्या फरक

SIP Investment: तुम्ही इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर SIP चे किंवा Step-Up SIP चे अनेक व्हिडिओ, रिल्स पाहिले असतील. पण, तुम्हाला बेसिक किती प्रकारच्या SIP आहेत? हे माहिती आहे का? तसेच Step-Up SIP म्हणजे नेमकं काय? या दोन्ही प्रश्नांची उत्तर आम्ही आज अगदी सोप्या भाषेत देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

SIP चे प्रकार किती रे भाऊ? Step-Up SIP म्हणजे काय ? समजून घ्या फरक
SIP चे प्रकार किती?
Follow us
| Updated on: Jan 09, 2025 | 9:07 AM

SIP Investment: तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टाग्राम, फेसबुक उघडलं की धडाधड SIP चे व्हिडिओ किंवा रिल्स समोर येतात, ‘इतक्या-इतक्या वर्षात कोट्यधीश बना,’ ‘घर घेऊ नका पण SIP करा,’ ‘आजच SIP सुरु करा,’ अशा सगळ्या आशयाचे हे व्हिडिओ असतात. पण, हे सगळं करण्यापूर्वी बेसिक SIP म्हणजे काय? आणि त्याचे किती प्रकार आहेत? या दोन प्रश्नांची उत्तर जाणून घेणं महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया.

नोकरी सुरू करताच अनेकदा बचतीचा सल्ला दिला जातो. या काळात लोक सहसा बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवी किंवा सोने, असे सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय निवडतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा योजनांमध्ये थोडी रक्कम ठेवणे शहाणपणाचे आहे. पण, तुमच्या बचतीचा काही भाग पद्धतशीरपणे म्युच्युअल फंडात गुंतविणे कालांतराने अधिक फायदेशीर ठरू शकते. सुरुवातीला SIP म्हणजे काय? हे जाणून घेऊया.

SIP म्हणजे काय?

SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ही गुंतवणुकीची एक पद्धत आहे. यामध्ये तुम्ही म्युच्युअल फंडात वेळोवेळी मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही अशी ठराविक रक्कम गुंतवू शकतात. SIP गुंतवणूकदारांना माफक रकमेपासून सुरुवात करण्यास आणि हळूहळू दीर्घ कालावधीत महत्त्वपूर्ण निधी जमा करण्यास अनुमती देते. काही फंडांमध्ये तुम्ही फक्त 100 किंवा 500 रुपयांपेक्षा कमी रकमेत गुंतवणूक सुरू करू शकता. या काळात गुंतवणूकदार 1 ते 5, 10 किंवा 15 वर्षांचा गुंतवणुकीचा कालावधी निवडू शकतात. पण हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो, याचा अर्थ असा आहे की SIP जोखमीच्या अधीन आहेत. त्यामुळे कधीही गुंतवणूक करताना एकाच प्रकारात गुंतवणूक करू नका.

आता Step-Up SIP म्हणजे नेमके आहे तरी काय, हे जाणून घेऊया.

Step-Up SIP म्हणजे काय?

Step-Up SIP म्हणजे तुम्ही दरवर्षी आपल्या SIP ची रक्कम वाढवणे. जेव्हा तुम्ही SIP सुरू करता तेव्हा तुम्ही एक टक्केवारी (समजा, 10, 20 किंवा 30 टक्के) सेट करू शकता ज्याअंतर्गत तुम्ही वार्षिक योगदान वाढवू इच्छित आहात. तुम्ही एक वर्षानंतर तुमची म्युच्युअल फंड गुंतवणूक वाढविणे देखील निवडू शकता. फार कठीण नाही आहे. पुढे अगदी सोप्या उदाहरणानं समजून घेऊया.

उदाहरणार्थ, तुम्ही सध्या मासिक SIP मध्ये 5,000 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर Step-Up SIP मुळे तुम्ही ती रक्कम वार्षिक 10-20 टक्के वाढवू शकता.

गुंतवणूक कशी करावी?

योग्य म्युच्युअल फंडाची निवड करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. या कालावधीतील मागील कामगिरी, विशेषत: सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सचा दीर्घकालीन परतावा हे याचे सूचक असू शकते, परंतु लक्षात ठेवा की मागील कामगिरी भविष्यातील परिणामांची हमी देत नाही. एसआयपीमुळे रुपया-खर्चाच्या सरासरीचा फायदा मिळतो आणि त्याचबरोबर दीर्घ काळासाठी जोखीम कमी होते. त्यामुळे दोन ते तीन वर्षांत परताव्याचा अंदाज बांधणे एका वर्षापेक्षा अधिक चांगले ठरू शकते.

एसआयपी निवडताना तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता विचारात घेतली पाहिजे. या दरम्यान तुमच्या बजेटनुसार मासिक एसआयपी ठरवा. गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आपण इलेक्ट्रॉनिक नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (ई-नॅच) किंवा इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस (ईसीएस) देखील स्थापित करू शकता. हे आपल्या बँक खात्यातून निवडलेल्या SIP रकमेची वजावट करते.

SIP चे फायदे कोणते?

आर्थिक शिस्त: SIP मुळे नियमित गुंतवणुकीची सवय लागते.

रुपयाची सरासरी: बाजारातील चढ-उतारांच्या काळातही गुंतवणूक सुरक्षित राहण्याची शक्यता अधिक असते.

कंपाउंडिंगचा फायदा: दीर्घ कालावधीत भरपूर पैसे जमा करता येतात. लवचिकता: SIP ची रक्कम कोणत्याही वेळी वाढवू शकता किंवा कमी करू शकता.

टॅक्स बेनिफिट्स: SIP च्या माध्यमातून ईएलएसएस फंडात गुंतवणूक केल्यास प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत टॅक्स बेनिफिट्स मिळतात.

SIP चे प्रकार किती?

नॉर्मल SIP: नॉर्मल SIP मध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवली जाते. Step-Up SIP: स्टेप-अप SIP वार्षिक गुंतवणुकीची रक्कम वाढविण्याचा पर्याय देते. फ्लेक्स SIP: फ्लेक्स SIP मध्ये दर महा गुंतवणुकीची रक्कम बदलण्याची लवचिकता मिळते. कामगिरी-आधारित SIP: कामगिरी-आधारित SIP गुंतवणूकदारांना फंडाच्या कामगिरीच्या आधारे योगदान कमी किंवा जास्त करता येते.

SIP हा गुंतवणुकीचा सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. Step-Up SIP मुळे गुंतवणूकदारांना उत्पन्नवाढीचा फायदा घेऊन मोठा फंड उभारता येतो. योग्य SIP निवडणे आर्थिक ध्येय साध्य करण्यात आणि दीर्घकालीन फायदे मिळविण्यात मदत करू शकते.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.