यंदा मोदी सरकारने प्रोव्हिडंट फंड निधीतील किती रक्कम शेअर बाजारात गुंतवली?

EPFO | EPFO ने भांडवली बाजारात केलेली 7,715 कोटी रुपयांची गुंतवणूक ही एसबीआय म्युच्युअल फंड आणि युटीआय म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कोणत्याही एकाच कंपनीत EPFO ने गुंतवणूक केलेली नाही.

यंदा मोदी सरकारने प्रोव्हिडंट फंड निधीतील किती रक्कम शेअर बाजारात गुंतवली?
पीएफ
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 6:44 AM

नवी दिल्ली: भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भांडवली बाजारात 7,715 कोटी रुपये गुंतवले आहेत. केंद्र सरकारने सोमवारी संसदेत यासंदर्भातील माहिती दिली. नियमानुसार EPFO एकूण निधीच्या 15 टक्के पैसे भांडवली बाजारात गुंतवू शकते. यासाठी केंद्रीय विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली होती. हे विश्वस्त मंडळ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील रक्कम भांडवली बाजारात गुंतवण्याची परवानगी देते.

EPFO ने भांडवली बाजारात केलेली 7,715 कोटी रुपयांची गुंतवणूक ही एसबीआय म्युच्युअल फंड आणि युटीआय म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कोणत्याही एकाच कंपनीत EPFO ने गुंतवणूक केलेली नाही.

यापूर्वी 2020-21 या आर्थिक वर्षात EPFO ने 31,025 कोटी, 2019-20 मध्ये 32,377 कोटी तर 2018-19 मध्ये 27,743 कोटी रुपये भांडवली बाजारात गुंतवले होते. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून एप्रिल-जून तिमाहीत 57,846 कोटी रुपये जमा झाले होते. गेल्या आर्थिक वर्षात हा आकडा 2,18,345 कोटी रुपये इतका होता. तर 2019-20 मध्ये कर्मचाऱ्यांच्या पीएफमधून 2,19,325 कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली होती.

आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत पैशांचे वाटप

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तडाख्यानंतर मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा केली होती. या योजनेतंर्गत 25.57 लाख पीएफधारकांना 1,193.18 कोटी रुपये वाटण्यात आले. कोविडचा प्रभाव पाहता आत्मनिर्भर भारत योजनेला 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या माध्यमातून नवीन रोजगार उत्पन्न होतील, अशी आशा सरकारला आहे.

आजारपणाच्या खर्चासाठी पीएफचे पैसे मिळणार

तुम्ही आता आजारपणाच्यावेळी गरज लागल्यास PF खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकता. विशेष म्हणजे यासाठी रुग्णालयाचे बिलही सादर करण्याची गरज नाही. केवळ एक विनंतीचा अर्ज सादर करून तुम्ही हे पैसे मिळवू शकता. या अर्जात आजार आणि रुग्णालयाची संपूर्ण माहिती नमूद करावी लागेल. पीएफ खातेधारक स्वत:साठी आणि कुटुंबातील व्यक्तींसाठी पैसे घेऊ शकतो. यापूर्वी रुग्णालयाचे बिल दाखवल्यानंतरच पीएफ खात्यामधून आगाऊ रक्कम काढता येत होती. मात्र, आता केवळ एक अर्ज दिल्यानंतर काही तासांमध्ये तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. या सुविधेमुळे पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

संबंधित बातम्या:

PF withdrawal rule: पीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; जाणून घ्या कसे मिळवाल पैसे?

PF मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आधार-पॅन, असे करा अपडेट

आता यूएएनशिवाय जाणून घ्या पीएफ खात्यातील शिल्लक, ही आहे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.