AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UAN नंबर ॲक्टिव्हेट करण्याची सोपी पद्धत, काही वेळामध्ये चेक करा तुमचा पीएफ बॅलन्स

आपल्या ईपीएफओ खात्यामध्ये कशा प्रकारे रक्कम जमा होते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्रथम UAN ॲक्टिव्हेट करणं आवश्यक असतं. UAN PF balance

UAN नंबर ॲक्टिव्हेट करण्याची सोपी पद्धत, काही वेळामध्ये चेक करा तुमचा पीएफ बॅलन्स
EPFO
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 12:32 PM

नवी दिल्ली: अनेकजण ज्यावेळी पहिल्यांदा नोकरीला लागतात तेव्हा त्यांना पीएफ, ईपीएफओ याविषयी माहिती नसते. काही जणांना माहिती असेल तर ती थोड्या प्रमाणात असते. कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या पगारातून ठराविक रक्कम कपात करुन पीएफ खात्यात जमा केली जाते. याविषयी अनेकांना नेमकं माहिती नसते. काही वेळा कंपनीतील कामामुळे त्याकडे लक्ष दिलं जातं नाही. आपल्या पगारातून कपात केलेली नेमकी रक्कम किती? आपल्या ईपीएफओ खात्यामध्ये कशा प्रकारे रक्कम जमा होते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्रथम UAN अ‌ॅक्टिव्हेट करणं आवश्यक असतं. How to activate UAN number check your PF balance in minutes follow easy steps

एसएमएसद्वारे UAN अ‌ॅक्टिव्हेट कसा करायचा?

ईपीएफओकडे नोंदणी करताना तुमचा मोबाईल क्रमांक नोंदणी केलेला असतो. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN हा संदेश पाठवावा लागेल. तुम्ही मेसेज पाठवला की लगेचच तुम्हाला ईपीएफओकडून तुमच्या खात्याविषयी मेसेज येईल. यामध्ये पीएफ खात्यातील रक्कम,अखेरचे पैसे जमा केलेली तारीख इत्यादी माहिती मिळेल.

ईपीएफओ पोर्टलवरुन UAN अ‌ॅक्टिव्हेट कसा करायचा?

जर तुम्हाला तुमचा UAN नंबर माहिती नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात तिथे तुम्हाला माहिती उपलब्ध होईल. याशिवाय तुमच्या सॅलरील स्लीपवर देखील युएएन क्रमाक लिहिलेला असतो. ईपीएफओ पोर्टलवरुन UAN अ‌ॅक्टिव्हेट करण्यासाठी खालील स्टेप वापरा.

स्टेप 1: सर्व प्रथम EPFO च्या वेबसाईटवर Services मेनूमध्ये For Employee या ऑप्शन वर क्लिक करा

स्टेप 2: यानंतर Services पेज वर दिसणाऱ्या Member UAN/Online Service ऑप्शन वर क्लिक करा.

स्टेप 3: यानंतर नवीन पेज खुलं होईल, तिथे दिसणाऱ्या अ‌ॅक्टिवेट यूनिवर्सल अकाउँट नंबर (UAN) या ऑप्शन वर क्लिक करा.

स्टेप 4: इथं तुम्हाला UAN नंबर, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि कॅप्चा टेक्स्ट भरा, यानंतर Get Authorization Pin वर क्लिक करा

स्टेप 5: यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर एक OTP येईल. यानंतर डिटेल्स वेरीफाई करा. यानंतर I Agree वर क्लिक करा. यानंतर UAN अ‌ॅक्टिव्हेट करा.

स्टेप 6:UAN नंबर अ‌ॅक्टिव्हेट होण्यासाठी सहा तासांचा वेळ लागतो. यांनतर तुम्ही PF अकाऊंटशी काम करु शकतो.

संबंधित बातम्या:

PF चे पैसे आले! EPFO ने 8.50% व्याज केलं ट्रान्सफर, असा चेक करा तुमचा बॅलेंस

Post Office Saving Scheme: खात्यात आता ‘इतके’ पैसे ठेवणे महत्त्वाचे; अन्यथा मोठं नुकसान

(How to activate UAN number check your PF balance in minutes follow easy steps)

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....