जुने PAN कार्ड बंद होणार, नवे PAN 2.0 कसे बनवावे? जाणून घ्या

Upgraded Pan Card: अपग्रेडेड PAN कार्डसाठी अर्ज कसा करावा, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर चिंता करून नका, याविषयीची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. दरम्यान, PAN 2.0 यामुळे PAN कार्डचे तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केले जाईल जेणेकरून ते वापरण्याचा मार्ग सोपा होईल.

जुने PAN कार्ड बंद होणार, नवे PAN 2.0 कसे बनवावे? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 7:10 PM

Upgraded Pan Card : देशातील 78 कोटी नागरिकांचे PAN कार्ड अपग्रेड करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रक्रियेसाठी 1400 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. युजर्सचा डेटा अधिक सुरक्षित करणे आणि डिजिटल प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा उद्देश आहे. 1972 पासून वापरात असलेले तुमचे PAN कार्ड आता बदलाच्या वाटेवर आहे. मोदी सरकारने PAN 2.0 च्या नवीन एडिशनला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे 78 कोटी लोकांना आता आपले स्थायी खाते क्रमांक (PAN) कार्ड बदलावे लागणार आहे.

करदात्यांना गोष्टी सोप्या व्हाव्यात हा या बदलाचा मुख्य हेतू आहे. सरकारच्या मंजुरीनंतर करदात्यांच्या मनात त्यांचा PAN क्रमांकही बदलला जाणार का आणि नवीन कार्ड बनवण्याची प्रक्रिया काय असेल, असा प्रश्न निर्माण होत आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटल्याप्रमाणे, PAN कार्डची नवीन एडिशन केवळ नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल, तर आपला PAN क्रमांक तसाच राहील. या कार्डवर एक QR कोड दिला जाईल. यात ज्यात तुमची सर्व माहिती असेल. याचा वापर करून कर भरणे किंवा कंपनीची नोंदणी करणे किंवा बँकेत खाते उघडणे सोपे होणार आहे.

कोणते नवे फीचर्स?

PAN कार्डचे तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केले जाईल जेणेकरून ते वापरण्याचा मार्ग सोपा होईल. सर्व प्रकारच्या व्यवसायाची ओळख आणि नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेष वैशिष्ट्ये जोडली जातील. PAN कार्डशी संबंधित सर्व सेवांसाठी एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, ज्यामुळे युजर्सचा अनुभव सुधारेल. युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन PAN कार्डमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये देखील स्थापित केली जातील, जेणेकरून फसवणुकीसारख्या घटनांवर मात करता येईल.

शुल्क आकारले जाणार नाही

PAN कार्डच्या अपग्रेड व्हर्जनसाठी सामान्य माणसाला काहीही करण्याची गरज नाही, असं केंद्रीय मंत्र्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी कुठेही अर्ज करण्याची गरज भासणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. देशातील ज्या 78 कोटी लोकांना PAN कार्ड देण्यात आले आहे, त्यांना विभागाकडून नवीन PAN कार्ड पाठविण्यात येणार आहे.

नंबर बदलले जाणार नाहीत

PAN कार्ड अपग्रेड करण्याच्या प्रक्रियेत नंबर बदलले जाणार नाहीत, असे सरकारने स्पष्ट पणे सांगितले आहे. प्रत्येकाचा PAN नंबर एकच राहील आणि जोपर्यंत नवीन कार्ड तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची सर्व कामे जुन्या PAN कार्डच्या माध्यमातून करत राहा.

नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही

नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही किंवा त्यासाठी पैसे खर्च करण्याची ही गरज नाही. सरकार नवीन PAN कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवेल.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....