किड्स पॅन कार्ड कसे काढावे? काय आहेत त्याचे फायदे; जाणून घ्या
भारतामध्ये पॅन कार्ड अर्थात परमानंट अकाउंट नंबरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पॅन कार्डची आवश्यकता असते. आता आपण आपल्या अल्पवयीन मुलांचे देखील पॅन कार्ड काढू शकतो. त्यासाठी काय करावे लागेल? जाणून घ्या.
नवी दिल्ली – भारतामध्ये पॅन कार्ड अर्थात परमानंट अकाउंट नंबरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पॅन कार्डची आवश्यकता असते. तसेच बँकेशी संबंधित आर्थिक व्यवहार हे पॅन कार्डशिवाय होऊच शकत नाहीत. तसेच आपण जर खासगी किंवा सरकारी कर्मचारी असाल तर आपले पीएफ खाते सुरू करण्यासाठी देखील आपल्याला पॅनची आवश्यकता असते. त्यामुळे आता पॅन हे एक अत्यावश्यक डॉक्युमेंट बनले आहे. कोणताही भारतीय नागरिक जेव्हा आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण करतो तेव्हा तो पॅन कार्ड काढण्यासाठी अर्ज करू शकतो. परंतु आपल्याला हे माहित आहे का? की आता आपण आपल्या 18 वर्षांच्या आतील मुलांचे देखील पॅन कार्ड काढू शकतो. नसेल माहीत तर जाणून घ्या आपण कशा पद्धतीने किड्स पॅन कार्ड काढ काढू शकतो, त्यासाठी नेमके काय करावे लागेल, त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते.
बँक खाते, डिमॅटे खाते सुरू करण्यासाठी, एखाद्या वित्तिय संस्थेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अथवा कर्ज घेण्यासाठी अशा सर्व ठिकाणी आपल्याला आपले पॅन कार्ड देणे आवश्यक आहे. जर पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने कुठे गुंतवणूक करत असतील, किंवा त्यांना एखाद्या आर्थिक व्यवाहारामध्ये नॉमिनी ठेवायचे असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या पाल्याचे पॅन कार्ड काढणे फायद्याचे असते. एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची आठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर तो स्वता: पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतो, मात्र संबंधित व्यक्ती अल्पवयीन असेल तर त्या व्यक्तीच्या वतीने पॅन कार्डसाठी त्याच्या आई-वडिलांनी केलेला अर्ज ग्राह्य धरून त्याला पॅनकार्ड देण्यात येते. आपल्याला हे पण लक्षात घ्यावे लागेल, जर अल्पवयीन मुलाचे पॅन कार्ड काढायचे झाल्यास केवळ त्याचे आई-वडीलच अर्ज करू शकतात. इतर कुठल्याही व्यक्तीने केलेला अर्ज ग्राह्य धरला जात नाही.
‘असा’ करा पॅन कार्डसाठी अर्ज
आता ऑनलाईन पद्धतीनेही आपल्याला पॅनसाठी अर्ज करता येत असल्याने प्रक्रिया पूर्वी इतकी किचकट राहिलेली नाही. पॅन कार्ड काढण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला ‘एनएसडीएल’च्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तिथे पॅन कार्डसाठी असलेला अर्ज भरावा. आपला मुलगा जर अल्पवयीन असेल तर तिथे बालकांसाठी पॅन कार्ड असा एक रकखाना असतो त्यावर क्लिक करावे. त्यानंतर पॅन कार्डसाठी विशिष्ट फी आकारण्यात येते, ती आपण ऑफलाईन किंवा ऑनलाईन भरू शकतो. जर पालकांनी आपल्या पाल्याच्या पॅनकार्डसाठी अर्ज केला असेल तर पाल्याच्या कागदपत्रांसह त्यांना त्यांचा कागदपत्रांची देखील पुर्तता करावी लागते. पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर अंदाजे 15 दिवसांनंतर पॅन कार्ड हे आपण दिलेल्या पत्त्यावर पोहोच केले जाते.
किड्स पॅन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
किड्स पॅन काढण्यासाठी बालकाच्या वतीने त्याचे आई-वडील अर्ज करणार असल्याने त्यांच्या ओळखीचा पुरावा दाखवणारे कागदपत्र जसे आधार कार्ड, मतदान कार्ड इत्यादी. आपल्या मुलांचे आधार कार्ड तसेच घराच्या पत्त्यासाठी लाईट बिल किंवा रेशन कार्ड या सर्व कागद पत्रांची आवश्यकता असते.
संबंधित बातम्या
फक्त 10 हजारांत सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला 30000 रुपयांपेक्षा जास्तीची कमाई, पण कशी?
‘या’ बँकेच्या क्रेडिट कार्डाद्वारे सिनेमाची तिकिटे बुक करण्यावर 50 टक्के सूट, जाणून घ्या
11 रुपयांपासून सुरू झालेला हा शेअर आज 78,000 रुपयांवर पोहोचला, पेटीएमचीही स्थिती काय?