सोनं गहाण ठेऊन कर्ज घ्यायचेय, जाणून घ्या कोणत्या बँकेत सर्वाधिक कमी व्याजदर?

Gold loans | एसबीआय गोल्ड आणि मुथूट फायनान्स सोने तारण ठेऊन कर्ज देणाऱ्या आघाडीच्या संस्था आहेत. मात्र, सोने तारण कर्जावरील व्याजही जास्त असते. त्यामुळे ग्राहक कायम कमी व्याजदर आकारणाऱ्या पर्यायांच्या शोधात असतात.

सोनं गहाण ठेऊन कर्ज घ्यायचेय, जाणून घ्या कोणत्या बँकेत सर्वाधिक कमी व्याजदर?
सोन्याचा दर
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 11:58 AM

मुंबई: कोरोना संकटामुळे सध्या अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. नोकरी नसल्यामुळे अनेकांना दैनंदिन खर्च चालवण्यासाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. बँकांच्या अटी-शर्तींमुळे सामान्य लोकांना पटकन कर्ज मिळत नाही. त्यामुळे अनेकजण घरातील सोने गहाण (Gold loans) ठेऊन पैसे कर्जाऊ घेत आहेत. (How to Avail gold loan what is intrest rates)

सध्या बँकांशिवाय इतर काही संस्थाही सोने तारण ठेवून कर्ज देतात. एसबीआय गोल्ड आणि मुथूट फायनान्स सोने तारण ठेऊन कर्ज देणाऱ्या आघाडीच्या संस्था आहेत. मात्र, सोने तारण कर्जावरील व्याजही जास्त असते. त्यामुळे ग्राहक कायम कमी व्याजदर आकारणाऱ्या पर्यायांच्या शोधात असतात.

कोणत्या बँकेत किती टक्के व्याजदर?

मण्णपुरम फायनान्स- 29 टक्के मुथुट फायनान्स- 24 ते 26 टक्के एक्सिस बँक- 13 टक्के एसबीआय बँक- 7 ते 7.5 टक्के आयसीआयसीआय बँक- 7.4 टक्के एचडीएफसी बँक- 8.9 टक्के ते 17.23 टक्के कॅनरा बँक- 7.35 टक्के

किती कर्ज मिळते?

तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांवर किती कर्ज द्यायचे याचे नियम प्रत्येक बँकेत वेगवेगळे असतात. एसबीआयकडून 20 हजारापासून 20 लाखांपर्यंत सोने तारण कर्ज दिले जाते. मुथुट फायनान्सकडून किमान 1500 रुपयांपासून कोणत्याही रक्कमेचे कर्ज दिले जाते. सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला संबंधित बँकेच्या शाखेत जावे लागते. त्याठिकाणी तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर काही कायदेशीर बाबींची पूर्तता करुन तुम्हाला सोने दिले जाते. सोन्याच्या किंमतीनुसार तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ठरते.

संबंधित बातम्या:

Gold Price: सोन्याचा भाव वधारला, पण अद्यापही 47 हजाराखालीच

BISच्या वेबसाईटवर हॉलमार्किंगची माहिती गायब; व्यापाऱ्यांनी ‘या’ केंद्रीय मंत्र्याला पाठवले पत्र

Gold Hallmarking च्या नियमांविषयी संभ्रमाचे वातावरण, व्यापारी नाराज

(How to Avail gold loan what is intrest rates)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.