‘हा’ बिझनेस सुरु करा आणि महिन्याला कमवा 80 हजार रुपये
Toothpaste Business | अगदी रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या टुथपेस्टचा उद्योग हा तुम्हाला चांगली कमाई करुन देऊ शकतो. या माध्यमातून तुम्हाला चांगली कमाई करता येऊ शकते. मात्र, या बिझनेससाठी चांगल्या मार्केटिंगची गरज आहे. तुम्ही चांगल्या दर्जाची टुथपेस्ट तयार करत असाल तर बाजारपेठेत त्याचा खप होऊ शकतो.
नवी दिल्ली: सध्याच्या काळात कोरोनामुळे नोकऱ्या आणि थेट लोकांशी संबंध येणाऱ्या उद्योगांविषयी अनिश्चिततेचे वातावरण आहे. एखादं दुकान टाकायचं म्हटलं तर सरकार कधी आणि कितीवेळा लॉकडाऊन लावेल, याचा नेम नाही. अशा परिस्थितीत बंद जागेत राहूनच एखादा उद्योग करणे हे फायद्याचे ठरेल.
अगदी रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या टुथपेस्टचा उद्योग हा तुम्हाला चांगली कमाई करुन देऊ शकतो. या माध्यमातून तुम्हाला चांगली कमाई करता येऊ शकते. मात्र, या बिझनेससाठी चांगल्या मार्केटिंगची गरज आहे. तुम्ही चांगल्या दर्जाची टुथपेस्ट तयार करत असाल तर बाजारपेठेत त्याचा खप होऊ शकतो.
टुथपेस्ट तयार करण्यासाठी काय लागते?
टुथपेस्ट तयार करण्यासाठी तुम्हाला मशीन्स, वीज आणि जीएसटी क्रमांकाची गरज असते. या उद्योगासाठी तुम्हाला साधारण 500 ते 700 स्क्वेअर फूट जागा गरजेची आहे. यामध्ये प्लांट आणि गोदामाचा समावेश आहे. सध्या बाजारपेठेत कोलगेट, पेप्पोडेंट, डाबर, ओरल बी आणि पतंजली या आघाडीच्या टुथपेस्ट कंपन्या आहेत.
किती गुंतवणूक करावी लागेल?
तुम्हाला किती मोठा व्यवसाय उभारायचा आहे यावर तुमच्या गुंतवणुकीची रक्कम ठरेल. तुमच्याकडे प्लांट सुरु करण्यासाठी स्वत:ची जागा असेल तर खर्च थोडासा कमी होईल. टुथपेस्ट तयार करण्यासाठी लागणाऱ्य मशीनबाबत बोलायचे झाले तर त्यासाठी 50 हजार ते दीड लाख रुपयांचा खर्च येईल. तर कच्च्या मालासाठी साधारण एक लाख रुपयांचा खर्च येतो.
किती फायदा होईल?
तुम्ही हा व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरु केला असेल तर तुम्हाला महिन्याला 80 हजार ते एक लाखांपर्यंत फायदा होऊ शकतो.
इतर बातम्या:
Income Tax पोर्टलसाठी केंद्र सरकारने मोजले 165 कोटी, पण तांत्रिक अडचणींचे शुक्लकाष्ठ संपेना
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल एकाच किंमतीने विकणार का, पेट्रोलियम मंत्री म्हणाले…
Union Bank of Indiaच्या विशेष योजनेतून कर्ज घेणाऱ्यांसाठी चांगली संधी, क्रेडिट लाईन वाढणार