Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या रिकाम्या दुकानात SBI ATM कसे लावायचे? जाणून घ्या बँकेचा नियम

जर तुम्हाला देखील तुमच्या दुकानावर किंवा जमिनीवर एटीएम बसवायचे असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुमची जमीन एटीएमसाठी कशी भाड्याने देता येईल. एटीएममधून कसे कमवायचे आणि एटीएम स्थापित करण्याची प्रक्रिया काय आहे हे देखील जाणून घ्या.

तुमच्या रिकाम्या दुकानात SBI ATM कसे लावायचे? जाणून घ्या बँकेचा नियम
स्टेट बँक ऑफ इंडिया
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 10:12 AM

नवी दिल्लीः स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रत्येक भागात आपले एटीएम उघडलेत, जेणेकरून ग्राहकांना सेवा देताना कोणतीही अडचण येऊ नये. तुम्ही हे देखील पाहिले असेल की, तुमच्या परिसरातसुद्धा एटीएम असेल आणि आता बँक परिसर वगळता दुकानांमध्येही एटीएम आहेत. बँका भाड्याने खासगी जागांमध्ये एटीएम उघडत आहेत. जर तुमच्याकडे रिकामे दुकान किंवा जमीन पडीक असेल तर तुम्ही त्यात एटीएम बसवू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता. जर तुम्हाला देखील तुमच्या दुकानावर किंवा जमिनीवर एटीएम बसवायचे असेल, तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमची जमीन एटीएमसाठी कशी भाड्याने देता येईल. एटीएममधून कसे कमवायचे आणि एटीएम स्थापित करण्याची प्रक्रिया काय आहे हे देखील जाणून घ्या.

SBI ATM कसे लावायचे?

जर तुम्हाला एसबीआय एटीएम बसवायचे असेल तर तुम्हाला आधी बँकेशी संपर्क साधावा लागेल. बँकेने सांगितलेल्या नियमांनुसार, एटीएम बसवण्याचा अर्ज तुमच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एसबीआय प्रादेशिक व्यवसाय कार्यालयाला (RBO) द्यावा लागेल. बँक म्हणते, ‘तुम्ही तुमच्या क्षेत्राच्या RBO चा पत्ता https://bank.sbi/portal/web/home/branch-locator वरून मिळवू शकता. पत्ता आमच्या जवळच्या शाखेतूनही मिळवता येतो. हे त्या RBO अंतर्गत काम करणाऱ्या सर्व शाखांच्या बँकिंग हॉलमध्ये प्रदर्शित केले जाते.

एटीएम कसे बसवायचे?

जर तुम्हाला देखील ATM मधून पैसे कमवायचे असतील तर तुमच्याकडे एक जागा असणे आवश्यक आहे. जमीन अशी असावी की, जिथे एटीएम सेटअप करता येईल. ही जागा दुकानासारखीही असू शकते, पण दुकान एटीएमनुसार थोडे मोठे असले पाहिजे. बँकेशी थेट संपर्क करण्याव्यतिरिक्त, अनेक एजन्सीज एटीएम बसवण्याचे कामही करतात, ज्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. या एजन्सीजमध्ये टाटा इंडिकॅश एटीएम, मुथूट एटीएम, इंडिया वन एटीएम अशी अनेक नावे आहेत.

कमाई कशी आहे?

एटीएम लावून पैसे कमवण्याचे दोन मार्ग आहेत. करारात ही बाब आहे की, तुम्हाला मासिक आधारावर भाडे दिले जाते आणि त्यासाठी करार आहे. यासह अनेक कंपन्या व्यवहाराच्या आधारावर करार करतात. त्या एटीएममध्ये जेवढे जास्त व्यवहार होतील तेवढा नफा मालकाला मिळेल. म्हणजेच व्यवहाराच्या आधारावर भाडे दिले जाते. मासिक भाडे हे मालमत्तेचे स्थान, आकार इत्यादींवर अवलंबून असते.

संबंधित बातम्या

New Rule: नोकरी करताय मग PF संबंधित ‘हे’ काम जरुर करा, नाहीतर तुमचे पैसे बुडतील

FD पेक्षा जास्त कमाई करणारी योजना, कधी आणि केव्हा गुंतवणूक कराल, जाणून घ्या

How to install SBI ATM in your empty shop? Learn bank rules

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.