रिस्क है तो इश्क है, चांगल्या परताव्यासाठी FD ला बायपास हवा, एफडीपेक्षाही अधिकची कमाई देणारे पर्याय

चिंता सोडा, FD पेक्षाही गुंतवणुकीचे आणि परताव्याचे चांगले पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहेत. त्याचाही थोडा विचार करा. काय आहेत हे पर्याय. चला जाणून घेऊयात..

रिस्क है तो इश्क है, चांगल्या परताव्यासाठी FD ला बायपास हवा, एफडीपेक्षाही अधिकची कमाई देणारे पर्याय
62 रुपये ज्यादा घेतले म्हणून प्रवाशाला 15 हजारांची भरपाई
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 11:15 AM

मुंबई : जीवनात जोखीम घेतल्याशिवाय कोणाचं भलं झालं भाऊ. आता गुंतवणुकीचंच पहा ना. मुदत ठेवीवरील (Fixed Deposit) व्याजदर कमालीचे घटले आहेत. तुम्ही साठवलेल्या रक्कमेवर अत्यल्प व्याज देऊन बँका तोच पैसा कर्ज रुपात देऊन बक्कळ पैसा कमवात आहेत. कर्ज देऊन तेही तर रिस्कच घेत आहेत. मग तुम्ही थोडी जोखीम उचलली तर काय बिघडते. एफडी इतकी सुरक्षित नाही आणि शेअर बाजाराइतका दोलनमय ही नाही, असा पर्याय आम्ही तुम्हाला सूचवत आहोत. अभ्यास करा, बुद्धी चालवा-लढवा आणि चांगला परतावा मिळवा इतकं सोप्प गणित आहे. फक्त त्यात थोडी जोखीम आहे. पण परतावा ही आहे.

बॅलन्स फंड 

एफडीसारखी सुरक्षितता आणि चांगला परतावा हवा असेल तर बॅलन्स फंड स्कीम (Balanced Fund Scheme ) गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. या फंडमधील गुंतवणुक एफडी (FD ) रोखे (Bonds) आणि इक्विटी (Equity ) यामध्ये टाकली जाते. बॅलन्स फंडमधून चांगला परतावा मिळू शकतो. तसेच त्यातील जोखीम ही कमी आहे.

अशी करा गुंतवणूक

जरी तुम्ही एक लाख रुपयांची एफडी करण्याची योजना आखत असाल तर 70 हजार रुपये बँक एफडीत टाका आणि उर्वरीत 30 हजार रुपये ब्लू चिप म्हणजे मजबूत भागभांडवल, फंडामेंटल (Fundamental) असलेल्या कंपनीत वा बँकेत गुंतवणूक करा. यामध्ये मोठ्या प्रमाणात परतावा मिळत नसेल ही पण एफडीपेक्षा जास्त परतावा नक्की मिळेल. गुंतवणुकीचा भाग तुम्ही सुनिश्चित करु शकता.

जर तुम्ही 70ः30 नुसार गुंतवणूक कराल तर असे असेल परताव्याचे गणित

बँक एफडीवर स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या एका वर्षाकरीता 5 टक्के व्याज देते.

ICICI Bank स्टॉक वर 22 टक्क्यांहून अधिकचा परतावा

4 ब्रोकरेज हाऊस यांनी ICICI Bank स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल च्या अंदाजानुसार, बँक स्टॉक 1000 पर्यंतचा स्तर गाठू शकतो. एडलवाईस सिक्योरिटीज ने या बँक स्टॉकसाठी 890 तर एमके ग्लोबल ने 890 चे लक्ष निर्धारीत केले आहे. सध्या हा स्टॉक 728 या स्तरावर आहे. म्हणजे हा स्टॉकमध्ये कमीतकमी 22 टक्के आणि 37 टक्क्यांपर्यंत ग्रोथ नोंदवू शकतो. तुम्ही एक वर्षांपर्यंत या स्टॉकमध्ये मर्यादा आहे.

कसा मिळेल एफडी पेक्षा जास्त परतावा 

हा स्टॉक तुम्हाला एका वर्षात बँकेच्या एफडीपेक्षा जास्त परतावा देईल. तर याचा अर्थ स्पष्ट आहे की, तुमचा स्टॉक पोर्टफोलियो तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीपेक्षा अधिकचा परतावा देईल. ICICI Bank स्टॉक मध्ये 22 टक्क्यांहून अधिक परताव्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जर तुमच्या स्टॉकने कमीतकमी 15 टक्के परतावा दिल्याचे गृहीत धरले तरी तुमच्या मुळ गुंतवणुकीवर 8 टक्के जास्त रिर्टन मिळेल. सहाजिकच एफडीवर मिळणा-या 5 टक्के बँक एफडीपेक्षा नक्कीच अधिक आहे.

70 हजारावर 5 टक्के व्याज मिळाल्यास एका वर्षात तुमची रक्कम 73 हजार 500 रुपये इतकी होईल. म्हणजे 3 हजार 500 रुपये परतावा मिळेल. तर 30 हजारांवर 15 टक्के परतावा गृहीत धरल्यास 34,500 रुपये मिळतील. म्हणजे 4 हजार 500 रुपयांची कमाई होईल.

एका वर्षात एकूण 1 लाख रुपये गुंतवणुकीतून तुम्हाला 1.08 लाख रुपयांचा परतावा मिळेल.

म्हणजे 1 लाख रुपयांवर तुम्हाला पाच हजारांच्या फायद्याऐवजी 8 हजारांचा फायदा होईल.

या गणितातच लपलेले आहेत फायदे-नुकसान

मंडळी आता आपण गणित मांडलं, त्याचं उत्तरही पाहिलं. आता त्याचे फायदे- तोटे तुमच्या लक्षात आले असतीलच,

मुळ रक्कमेतील मोठा हिस्सा एफडीत गुंतविल्याने बाजारातील चढ-उताराचा थेट परिणाम मुळ रक्कमेवर कमी होईल. तर ज्यावेळी बाजार तेजीत असेल त्यावेळी सहाजिकच फायदा ही वाढेल.

हे गणित तुमची जोखीम कमी करु शकते. मात्र तुमचं जोखीम एकदमच शुन्य करु शकत नाही. कारण तुम्ही तुमची रक्कम बाजारात गुंतवलेली असते. बाजाराच्या चढ-उतारावर त्याचे फायदे-तोटे तुम्हाला सहन करावे लागतात.

संबंधित बातम्या :

पीएफ संदर्भात महत्वाचा अलर्ट, डेडलाईन संपली तर होऊ शकते नुकसान, आळस झटका आणि वारसाचं नाव जोडा 

हा तिरपेपणा ‘डोळस’ आहे, भारतीय नोटांवर का असतात तिरप्या रेषा; काय आहे त्याचा अर्थ? 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.