निवृत्तीनंतर आनंदात जगायचंय, मग आजच सुरु करा NPS अकाऊंट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन माध्यमांद्वारे NPS खाते कसे सुरु करता येईल, याची माहिती देणार आहोत. (How To Open NPS Account Online)

निवृत्तीनंतर आनंदात जगायचंय, मग आजच सुरु करा NPS अकाऊंट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
दरवर्षी मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या या योजनेबद्दल सर्वकाही
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 6:04 PM

मुंबई : New Pension Scheme किंवा National Pension Scheme अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना…आपल्या निवृत्तीनंतरच्या खर्चांसाठी ही अत्यंत उपयुक्त योजना मानली जाते. जर तुम्हालाही वृद्धापकाळात कोणावरही अवलंबून राहायचे नसेल तर राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करा, असा सल्ला अनेकदा दिला जातो. (How To Open NPS Account Online Know the Process)

ही योजना खाजगी नोकरी करणार्‍यांसाठी अतिशय फायदेशीर समजली जाते. कारण त्या व्यक्तींना नोकरीनंतर काहीही पेन्शन मिळत नाही. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्ही निवृत्तीनंतर आरामात जीवन जगू शकता. मात्र आपल्यापैकी अनेकांना NPS खाते कसे सुरु करायचे, याची माहिती नसते. तर आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन माध्यमांद्वारे NPS खाते कसे सुरु करता येईल, याची माहिती देणार आहोत.

?NPS खाते उघडण्याची संपूर्ण प्रक्रिया?

?ENPS खाते उघडण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Enps.nsdl.com/eNPS किंवा Nps.karvy.com या लिंकवर क्लिक करावे लागेल.

?यानंतर तुम्ही नवीन नोंदणीवर क्लिक करा. त्यात तुम्हाला तुमचा तपशील आणि मोबाईल क्रमांक भरावा लागेल.

?यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. त्यानंतर त्यात तुमच्या बँक खात्याचा तपशील भरा.

?तुमचा पोर्टफोलिओ आणि निधी निवडा. त्यानंतर पुढे nominee व्यक्तीचे नाव भरा.

? तसेच तुम्ही ज्या खात्याचा तपशील भरला आहे, त्या खात्याचा एक कॅन्सल चेक देणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कॅन्सल चेक, तुमचा फोटो आणि सही अपलोड करावी लागेल.

?यानंतर तुम्हाला NPS मध्ये गुंतवणूक करावी लागेल

?NPS मध्ये गुंतवणुकीसाठीची रक्कम दिल्यानंतर तुम्हाला Permanent Retirement Account Number दिला जाईल. त्याशिवाय तुम्हाला पेमेंट केलेल्याची पावतीही मिळेल.

?गुंतवणूक केल्यानंतर ‘e-sign/print registration form’ वर जा. या ठिकाणी गेल्यानतंर तुम्ही पॅन आणि नेटबँकिंगद्वारे नोंदणी करू शकता. यानंतर तुम्हाला केवायसी भरावी (Know your customer) लागेल. याबाबतची नोंदणी करताना तुम्ही दिलेल्या बँक खात्याच्या तपशीलांशी ती जुळते की नाही, हे लक्षात ठेवा.

?सध्या 22 बँका NPS योजनेची ऑनलाईन घेण्याची सुविधा देत आहेत. त्यांची माहिती एनएसडीएल (NSDL) च्या वेबसाईटवर उपलब्ध असेल.

एनपीएस म्हणजे काय?

नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) जानेवारी 2004 मध्ये सरकारी कर्मचार्‍यांसाठी सुरू करण्यात आले. हे सर्व लोकांसाठी 2009 मध्ये उघडले गेले होते. कोणतीही व्यक्ती आपल्या कामाच्या आयुष्यात नियमितपणे पेन्शन खात्यात योगदान देऊ शकते. वयाच्या 60 व्या वर्षी पोहोचल्यावर तो एकाच वेळी गोळा झालेल्या पैशांचा काही भाग काढून घेऊ शकेल आणि निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी उर्वरित रक्कम वापरू शकेल.

दोन प्रकारची खाती उघडण्याची सुविधा

नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये दोन प्रकारची खाती उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. टियर 1 खाते हे पेन्शन खाते आहे. त्याच वेळी टियर 2 खाते एक स्वयंसेवी बचत खाते आहे. टियर 1 खाते असलेले एनपीएस ग्राहक टियर 2 खाते उघडू शकतात. यासाठी ऑफलाईन किंवा एनपीएस पोर्टल वापरता येईल. (How To Open NPS Account Online Know the Process)

संबंधित बातम्या : 

Post office RD : पोस्टाची भन्नाट योजना, 990 रुपयांची गुंतवणूक करा आणि 69,002 रुपये मिळवा

ना पार्ट टाईम जॉब, ना बिझनेस, नोकरीसोबत Second Income Source तयार करण्यासाठी भन्नाट टिप्स

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.