तुम्हीही सुरू करू शकता स्वत:चे पेट्रोल पंप; जाणून घ्या प्रक्रिया आणि खर्च
गेल्या वर्षी सरकारनेही पेट्रोल पंप सुरू करण्याबाबतचे अनेक नियम बदलले असून त्यामुळे पेट्रोल पंप सुरू करणं आता अधिक सोप झालं आहे. (How to Open Petrol Pump in India Full Process and Apply )
नवी दिल्ली: तुम्हालाही अनेकदा स्वत:चं पेट्रोल पंप असावं असं वाटत असेल. तुम्हीही पेट्रोल पंप सुरू करण्याचा प्लान तयार केला असेल. पण माहितीच्या अभावी तुमचा हा प्लान प्रत्यक्षात उतरला नसेल. गेल्या वर्षी सरकारनेही पेट्रोल पंप सुरू करण्याबाबतचे अनेक नियम बदलले असून त्यामुळे पेट्रोल पंप सुरू करणं आता अधिक सोप झालं आहे. पेट्रोल पंप सुरू करण्याची ही प्रक्रिया काय आहे? जाणून घेऊया त्याची माहिती. (How to Open Petrol Pump in India Full Process and Apply )
सात सरकारी कंपन्या
देशात IOC, BPCL, HPCL या सरकारी कंपन्यांसह सात कंपन्या पेट्रोलचं रिटेलिंग करतात. मात्र, टर्न ओव्हरच्या आधारे काही कंपन्या या उद्योगात उतरू शकतात, असं सरकारने मागच्यावेळी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा कोणत्याही कंपनीचे पेट्रोल पंप सुरू करू शकता. जर तुम्हाला आयओसी या सरकारी कंपनीचे पेट्रोल पंप सुरू करायचे असेल तर त्याबाबतचे नियम जाणून घ्या. त्यामुळे तुम्हाला पेट्रोल पंप सुरू करणं अधिक सोपं जाईल.
पेट्रोल पंप कोण सुरू करू शकतं?
भारतात पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर तो देशाचा नागरिक असावा. त्याशिवाय अर्जदार हा इयत्ता 10 वी पास असावा. पूर्वी हीच पात्रता 12 वी पासची होती. पेट्रोल पंपासाठी लागणारा भूखंड तुमचा असेल तर मग काही अडचण नाही. जर तुम्ही भाड्याने भूखंड घेऊन पेट्रोल पंप सुरू करणार असाल तर तुम्हाला जागेच्या मालकासोबतची कागदपत्रे तयार करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जमीन नसेल तरीही तुम्ही पेट्रोल पंपासाठी अर्ज करू शकतात. पण अर्जात तसा उल्लेख करणं आवश्यक आहे.
पेट्रोल पंप कसा मिळतो?
अर्जानंतर कंपनी भूखंडाची स्थिती पाहून पेट्रोल पंप देण्याचा निर्णय घेते. पेट्रोल पंपासाठी कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या जाहिरातीत काही नियम आणि अटी शर्ती नमूद केलेल्या असतात. त्यात जमिनीशी संबंधित काही नियमही असतात. अशा वेळी जमीन आणि तुमचा अर्ज पाहून निर्णय घेतला जातो. शिवाय पेट्रोल पंप देण्यासाठी तुमची मुलाखतही घेतली जाते. तसेच ग्रामीण आणि शहरी भागाचा विचार करून फी बाबतचा निर्णय घेतला जातो. तुमच्या पेट्रोल पंपाचं लोकेशन कुठे आहे, त्यावरही शुल्क निर्धारित करण्यात येतं. साधारणपणे सुमारे 20 ते 50 लाखापर्यंतचं शुल्क आकारले जाते.
अर्ज कसा करणार
अनेक कंपन्या सातत्याने पेट्रोल पंप सुरू करण्याबाबतच्या जाहिराती देत असतात. या जाहिरातीत अर्ज कसा करायचा याची माहिती दिली जात असते. एवढेच नव्हे तर ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज स्वीकारला जातो. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेही पेट्रोल पंपासाठी अर्ज करू शकता.
किती नफा मिळतो?
दिल्लीतील पेट्रोल रेटच्या हिशोबाने अंदाज लावायचा झाला तर 1 डिसेंबर रोजी दिल्लीत पेट्रोलचे भाव 82.34 रुपये प्रतिलिटर एवढे होते. त्यात पेट्रोलची बेस प्राईज 26.34 रुपये आणि फ्रेट 0.37 रुपये म्हणजे एकूण 26.71 रुपये असते. याचा अर्थ डिलर्सला कोणतीही ड्युटी आणि व्हॅट न लावता पेट्रोल 26.71 रुपयांमध्ये दिले जाते. त्यानंतर 32.98 रुपये एक्साईज ड्युटी, 3.65 रुपये डिलरचं कमिशन आणि 19 रुपये व्हॅटचा समावेश असतो. त्यानंतर पेट्रोलचा भाव 82.34 रुपये होतो. म्हणजे डिलरला 3.65 रुपये प्रति लिटर मागे कमिशन मिळते. या शिवाय त्यांना अनेक फायदेही मिळतात. (How to Open Petrol Pump in India Full Process and Apply )
Video । महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 15 December 2020https://t.co/3pEIe7dcvv#NewsUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 15, 2020
संबंधित बातम्या:
गृहिणींचं बजेट कोलमडणार, गॅस महागला!
New Year ला लागू होणार चेक आणि डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम, RBI ने केली मोठी घोषणा
‘या’ तीन बड्या कंपनींनी केली भागीदारी, प्रीपेड प्लॅनपासून ते स्मार्टफोनपर्यंत दिली धमाकेदार ऑफर
(How to Open Petrol Pump in India Full Process and Apply )