50 हजार महिना कमवता ! 8-3-4 फॉर्म्युला बनवेल श्रीमंत, जाणून घ्या

कोट्यधीश होण्याची अनेकांची स्वप्न असतात. पण त्यासाठी नेमकं काय करावं, हेच कळत नाही. पण चिंता करू नका. आम्ही तुम्हाला एक असा फॉर्म्युला सांगणार आहोत जो तुम्हाला कोट्यधीश बनवेल. हा फॉर्म्युला अगदी सोप्या भाषेत जाणून घ्या.

50 हजार महिना कमवता ! 8-3-4 फॉर्म्युला बनवेल श्रीमंत, जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 1:21 PM

श्रीमंत व्हावं, असं कुणाला नाही वाटत. प्रत्येकालाच वाटतं की चांगल्या सुखसुविधा मिळाव्यात अर्थातच श्रीमंत व्हावं. पण यासाठी तुम्हाला बचतही करावी लागेल. कारण, आधी बचत कराल तरच भविष्यात श्रीमंत व्हाल. यासाठी आम्ही तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहोत. तो अगदी सोप्या भाषेत जाणून घ्या.

बचतीच्या जोरावर कोट्यधीश व्हायचं म्हणचे अधिक बचतीची गरज आहे. समजा तुमचा महिन्याला 50 हजार रुपये पगार आहे, असं आपण गृहीत धरू. यावरही कोट्यधीश बनण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आता हे ध्येय तुम्हाला कसं साध्य करता येईल किंवा या 50 हजार रुपये मासिक वेतनावर कसं श्रीमंत बनता येईल, तर याविषयी खाली सविस्तर जाणून घ्या.

8-4-3 हा नियम वापरा

8-4-3 हा नियम किंवा फॉर्म्युला तुम्हाला कोट्यधीश बनवले. 8-4-3 हा फॉर्म्युला वापरून दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास कोणती 15 वर्षांच्या आत कोट्यधीश होऊ शकतो. चक्रवाढ व्याजासह 8-4-3 नियम (8-4-3 Rule Compound Interest) किंवा आपण त्याला फॉर्म्युला म्हणू. हा फॉर्म्युला आपल्याला कोट्यधीश होण्यास कशी मदत करू शकतो. आता हा फॉर्म्युला वापरायचा कसा. हे समजून घऊया.

कंपाउंडिंग फॉर्म्युला म्हणजे काय?

कंपाउंडिंग फॉर्म्युला म्हणजे कंपाउंडिंग गुंतवणुकीची शक्ती. हे पैसे वाढवते. त्यामुळे गुंतवणुकीत अनेक पटींनी वाढ होते. गुंतवलेल्या पैशावर व्याज किंवा परतावा जोडून तयार केलेली रक्कम पुन्हा गुंतविली जाते. याला चक्रवाढ व्याज म्हणतात.

8-4-3 चा नियम नेमका काय?

8-4-3 चा नियम कंपाउंडिंगशी संबंधित आहे. याचा वापर करून गुंतवणूकदार आपल्या पैशावर त्वरित परतावा मिळवू शकतो. हे एका उदाहरणाने समजून घेऊया म्हणजे तुमच्या अगदी सहजपणे लक्षात देखील येईल.

12 वर्षांनंतर 64 लाखांचा परतावा

समजा तुमचा पगार 50 हजार रुपये आहे आणि तुम्ही 20 हजार रुपये वार्षिक 12 टक्के व्याज देणाऱ्या मालमत्ता वर्गात (Asset Classes) गुंतवता. अशा प्रकारे तुम्ही 8 वर्षात 32 लाख रुपये कमवू शकता. पहिले 32 लाख रुपये 8 वर्षांत मिळतील, पण पुढचे 32 लाख रुपये त्याच व्याजदराने 4 वर्षांत मिळतील. अशा प्रकारे 12 वर्षांनंतर तुम्हाला 64 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो.

रक्कम 1 कोटी रुपयांपर्यंत वाढेल

आता जर एखाद्या व्यक्तीने आणखी 3 वर्षे गुंतवणूक सुरू ठेवली तर या वर्षांत त्याची रक्कम 64 लाख रुपयांवरून 1 कोटी रुपयांपर्यंत वाढेल.

एक लक्षात घ्या की, शेअर्स, रोखे, बँक एफडी आणि इतर गुंतवणूक योजनांसारख्या कोणत्याही मालमत्ता वर्गात (Asset Classes) गुंतवणूक करण्यापूर्वी प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. कारण, यामध्ये जोखीम देखील अधिक आहे. त्यामुळे अगदी कोणताही व्यवहार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.