Good News! तब्बल 46,800 रुपयांपर्यंत टॅक्स वाचवा, ‘अशी’ आहे खास योजना
प्राप्तिकर (Income Tax) कलम 80C अन्वये तरतूदीनुसार करदात्यांनी आपला कर वाचवण्यासाठी नेहमीच उपाययोजना केल्या आहेत.
नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर प्रत्येकजण सध्या आर्थिक अडचणी आहे. अशात तर तुमचा टॅक्स कमी झाला तर? अर्थात यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल. अशाच एका खास योजनेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खरंतर, प्राप्तिकर (Income Tax) कलम 80C अन्वये तरतूदीनुसार करदात्यांनी आपला कर वाचवण्यासाठी नेहमीच उपाययोजना केल्या आहेत. या कलमांतर्गत कर वाचवण्यासाठी गुंतवणूकीचे उत्तम पर्याय देण्यात आले आहेत. (how to save tax invest in boi axa equity linked savings scheme and save tax)
यामध्ये अनेक गुंतवणूकदार इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) अंतर्गत बचत करणं योग्य मानतात. पण यामध्ये नेमका कसा आणि काय फायदा होता जाणून घेऊयात. BOI AXA इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज योजनेंतर्गत गुंतवणूक आयकर कलम 80सी अंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची बचत करू शकता. म्हणजेच आताच्या करवाढीच्या 4 टक्के सेससोबक दरवर्षी 46,800 रुपये कर तुम्हाला भरावा लागणार आहे.
अशी कराल बचत
ELSS ही इक्विटी म्युच्युअल फंड कॅटेगरी आहे. ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर सवलत दिली जाते. 46,800 रुपयांची कर बचत गणना ही सगळ्यात जास्त कर स्लॅबवर अवलंबून आहे. उपकरांसह करावर 4 टक्के शिक्षण सेसेला जोडलं तर वर्षाकाठी 1.5 लाख रुपयांवर कर बचत 31.2 टक्के किंवा 46,800 रुपयांची सेव्हिंग होईल.
Invest in BOI AXA Equity Linked Savings Scheme and Save Tax under Section 80C of Income Tax, up to Rs. 46,800/-^
Invest NOW!! pic.twitter.com/LmUvsNZsMX
— Bank of India (@BankofIndia_IN) February 7, 2021
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीमचे फायदे
– ईएलएसएस फंडात लॉक-इनचा कालावधी हा तीन वर्षांचा आहे. 3 वर्षाचा लॉक-इन म्हणजे खरेदीच्या तारखेपासून 3 वर्षे पूर्ण होण्याआधी तुम्ही खरेदी केलेल्या युनिट्सची विक्री करू शकत नाही.
– ELSS मध्ये गुंतवणुकीवर होणारा लाभ आणि रिडप्शन करून मिळालेली रक्कम ही पुर्णपणे करमुक्त असते.
– इक्विटीमध्ये गुंतवणूक केली तर चांगला परतावाही मिळतो. जो महागाई दराच्या अधिक असतो.
– म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीमार्फत गुंतवणूकीची सुविधा देण्यात आली आहे. (how to save tax invest in boi axa equity linked savings scheme and save tax)
संबंधित बातम्या –
फक्त हजार रुपयांमध्ये घर बसल्या सुरू करा बिझनेस, कमी वेळात होईल डबल फायदा
गुंतवणूक एकच पण प्रत्येक महिन्याला मिळतील 19 हजार, आयुष्यभर होत राहिल कमाई
गुजरात फिरताना मिळाली बिझनेस आयडिया, आता कोटींची उलाढाल करतेय ‘ही’ तरुणी
Gold Rate Today : रेकॉर्ड स्तरावर 9,000 रुपयांनी स्वस्त झालं, वाचा आजचे ताजे भाव
(how to save tax invest in boi axa equity linked savings scheme and save tax)