Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hyundai Venue : ह्युंदाईनं मागच्या 31 महिन्यात विकल्या 2.5 लाख वेन्यू! काय आहेत कारची वैशिष्ट्ये?

Hyundai Venue हे नेहमीच भारतीय बाजारपेठेतलं टॉप तीन सर्वाधिक विकलं जाणारं कॉम्पॅक्ट SUVपैकी एक व्हेरिएंट राहिलंय. Hyundaiनं पहिल्या 6 महिन्यांतच 50, 000 गाड्यांची विक्री केली.

Hyundai Venue : ह्युंदाईनं मागच्या 31 महिन्यात विकल्या 2.5 लाख वेन्यू! काय आहेत कारची वैशिष्ट्ये?
ह्युंदाई वेन्यू
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 3:56 PM

मुंबई : Hyundai Venue हे नेहमीच भारतीय बाजारपेठेतलं टॉप तीन सर्वाधिक विकलं जाणारं कॉम्पॅक्ट SUVपैकी एक व्हेरिएंट राहिलंय. Hyundaiनं पहिल्या 6 महिन्यांतच 50, 000 गाड्यांची विक्री केली. सेगमेंटमध्ये वाढती स्पर्धा असूनही ह्युंदाईला व्हेन्यूच्या 2.5 लाख युनिट्सची विक्री करण्यासाठी 31 महिने लागले. वेन्यू बाजारपेठेत यशस्वी कशी झाली, कोणते घटक महत्त्वाचे ठरले, जाणून घेऊ…

कॉम्पॅक्ट SUV Hyundai Venue ही भारतीय बाजारपेठेतील परवडणाऱ्या कॉम्पॅक्ट SUV पैकी एक आहे. त्याची सुरुवातीची किंमत 6.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 11.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. Hyundai E, S, S+, S(O), SX, SX(O) एक्झिक्युटिव्ह, SX+ आणि SX(O) अशा आठ ट्रिममध्ये ऑफर करते.

फिचर्सनं परिपूर्ण इतर कोणत्याही Hyundai वाहनाप्रमाणं, वेन्यूला बरेच फिचर्स मिळतात. यात ब्लूलिंक कनेक्टेड कार तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस मोबाइल चार्जर, स्टार्ट/स्टॉपसाठी पुश बटण, क्रूझ कंट्रोल, रिअर एसी व्हेंट्स, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मल्टी-फंक्शन स्टिअरिंग मिळतं. मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील्स हेही वैशिष्ट्य उपलब्ध आहेत.

कॅमेरा, स्पीकर आणि… एलईडी डे टाईम रनिंग लॅम्प, प्रोजेक्टर हेडलॅम्प, क्रिस्टल इफेक्टसह एलईडी टेल लॅम्प, मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले, रिअर पार्किंग कॅमेरा, कॉर्नरिंग लॅम्प, हिल स्टार्ट असिस्ट, लेदर अपहोल्स्ट्री, एअर प्युरिफायर, ड्रायव्हर रिअर व्ह्यू मॉनिटर, आर्कमीस स्पीकर हेदेखील मिळतं.

चांगली सर्व्हिस मारुती सुझुकीनंतर ह्युंदाईचं सर्व्हिस नेटवर्क सर्वात मोठ आहे. भारतीय ग्राहकानं नवीन वाहन खरेदी करताना याचा विचार केला पाहिजे. इतर काही ऑटोमोबाइल निर्मात्यांच्या तुलनेत सेवेची किंमतदेखील परवडणारी आहे. याशिवाय बहुतांश सुटे भागही सहज उपलब्ध होतात.

Hyundai वेन्यूमध्ये 3 इंजिन Hyundai वेन्यू तीन इंजिनांसह येते. हे 1.2-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 1.5-लिटर डिझेल इंजिन आणि 1.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे, जे थेट-इंजेक्शनसह येतं. नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 83 PS मॅक्झिमम पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. हे फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतं. हे इंजिन अशा लोकांसाठी आहे, जे दररोज कामासाठी कार वापरतात.

डिझेल इंजिन परवडण्याजोगं कारमध्ये डिझेल इंजिनदेखील आहे, जे जास्तीत जास्त 100 PS पॉवर आणि 240 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. यात 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. हे इंजिन अशा लोकांसाठी आहे जे महामार्गावर आपली वाहनं वापरतात. पेट्रोल इंजिनपेक्षा डिझेल इंजिन अधिक किफायतशीर आहे, त्यामुळे ते परवडण्याजोगं असल्यानं याला पसंती आहे. एक टर्बोचार्ज केलेलं पेट्रोल इंजिनदेखील आहे. ते जास्तीत जास्त 120 PS पॉवर आणि 172 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. हे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, 6-स्पीड iMT गिअरबॉक्स किंवा 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे.

WhatsApps Furute Update : व्हाट्सअॅपचा व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठीचा नवा Interface

Online Payments : ऑनलाइन पेमेंटच्या पद्धतीत 1 जानेवारीपासून होणार महत्त्वाचा बदल, जाणून घ्या…

IPL 2022 Auction: बंगळुरुमध्ये ‘या’ तारखेला होऊ शकतो लिलाव

शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा.
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.