ICC World Cup 2023 : विश्वचषकामुळे अशी होईल कमाई, या कंपन्यात गुंतवणूक ठरेल फायद्याची

ICC World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकाच्या उत्सवात तुम्हाला काही कंपन्या झटपट कमाई करुन देऊ शकतात. यामध्ये दारु उत्पादक कंपन्यांपासून तर इतरही अनेक कंपन्या आहेत. रिटेल सेगमेंटमधील पण अनेक कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. बाजारातील काही तज्ज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीजवर पण लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

ICC World Cup 2023 : विश्वचषकामुळे अशी होईल कमाई, या कंपन्यात गुंतवणूक ठरेल फायद्याची
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 5:48 PM

नवी दिल्ली | 7 ऑक्टोबर 2023 : आयसीसी विश्वकपाचे (ICC World Cup 2023) यजमान पदाची माळ यंदा भारताच्या गळ्यात आहे. या क्रिकेट सामन्यांमुळे देशात आर्थिक उलाढाल होणार आहे. अनेक शहरातील स्थानिक बाजारपेठांमध्ये चैतन्य येईल. या विश्वचषकात अनेक कंपन्यांसाठी बिझनेस करण्याची मोठी संधी आहे. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या शेअरधारकांना चांगला परतावा मिळू शकतो. वर्ल्डकपच्यावेळी दारु उत्पादन करणाऱ्या कंपन्या, सॉफ्ट ड्रिंक कंपन्या, रिटेल कंपन्या यांना मोठा फायदा होऊ शकतो. काही तज्ज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीजवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या कंपन्या गुंतवणूकदारांना मालामाल (Investors Return) करतील.

या आहेत 7 शेअर

क्रिकेटच्या विश्वकप दरम्यान या कंपन्यांचे शेअर, बाजारात जोरदार कामगिरी करु शकतात. शेअर बाजारातील पिचवर या कंपन्या तुफान फटकेबाजी करु शकतात. पण शेअर बाजारातील गुंतवणूक आणि परतावा हा जोखीमवर आधारीत असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना तुम्ही बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. तुमचा पण अभ्यास गुंतवणूक करताना महत्वाचा असतो बरं.

हे सुद्धा वाचा
  1. ताज हॉटेल्स : वर्ल्डकपमुळे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात हॉटेल व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. यामध्ये अनेक हॉटेल्स फुल्ल झाल्या आहेत. या कालावधीत ‘इंडियन हॉटेल्स कंपनी’ चा शेअर जोरदार परतावा देऊ शकतो. चांगले रिटर्न मिळू शकतात.
  2. डॉमिनोज पिझ्झा : भारतात डॉमिनोज पिझ्झाचा कारभार जुबिलेंट फुडवर्क्स पाहते. या विश्वचषकादरम्यान पिझ्झाची ऑर्डर वाढणार आहे. काल परवा पिझ्झाच्या किंमती घसरल्या. या कंपनीचा शेअर 600 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत आहे.
  3. वरुण बेवरेजेस : ही कंपनी पेप्सिकोच्या बॉटलिंगचे काम पाहते. अमेरिकेच्या बाहेर जगात पेप्सिकोची सर्वात मोठी फ्रँचाईज या कंपनीकडे आहे. या कंपनीचा कारभार एकूण 6 देशात पसरलेला आहे. विश्वचषका दरम्यान या कंपनीने मोठा परतावा दिला आहे.
  4. मॅकडोनाल्ड्स : भारतात मॅकडोनाल्डस चेनचे व्यवस्थापन वेस्टलाईफ फुडवर्ल्ड या कंपनीकडे आहे. या कंपनीचे भारतात 350 हून अधिक रेस्टॉरंट आहेत. त्यामुळे वर्ल्डकपच्या दरम्यान याची विक्री वाढणार आहे. त्यामुळे या कंपनीचा शेअर वधारेल.
  5. युनायटेड स्पिरिट्स : विश्वचषकानिमित्त दारुची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे अनेक दारु कंपन्या मोठा गल्ला जमावू शकतात. या काळात युनायटेड स्प्रिट्स ग्रुपचा शेअर वधारण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना फायदा होईल.
  6. इंडिगो : विश्वकपासाठी अनेक संघ झुजणार आहे. अनेक शहरातील मैदानावर हे सामने रंगतील. त्यामुळे ट्रॅव्हल कंपन्यांचे आणि विमान कंपन्यांना मोठा फायदा होऊ शकतो. त्याचा एअरलाईन इंडिगोला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

  • रिलायन्स रिटेल : विश्वचषकाच्या काळात रिटेल सेक्टरमध्ये मोठी वृद्धी होण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठी रिटेल कंपनी रिलायन्स रिटेल आणि त्यांची मुळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला त्याचा फायदा होऊ शकतो. शेअरधारकांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.