खासगी क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक ICICI ने धमाकेदार तिमाही निकाल जाहीर केला आहे. यामध्ये ICICI बँकेच्या नफ्यामध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
30 सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीमध्ये बँकेला तब्बल 4,251 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात तो फक्त 654.96 कोटी रुपयांचा होता.
icici prudential healthcare etf
आयसीआयसीआय बँकेला इतका मोठा नफा गुंतवणुकीची विक्री आणि निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ केल्यामुळे झाला आहे. इतकंच नाही तर बँकेच्या मालमत्ता आणि एनपीएमध्येही सुधारणा झाली आहे.
बँकेच्या व्याजातून निव्वळ रक्कम 16 टक्क्यांनी वाढून 9,366 रुपयांवर पोहोचली आहे. तर या काळात बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन 0.10 टक्क्यांनी घसरून 3.5.77 टक्क्यांवर आलं आहे.
मागच्या वर्षी हे 37,424.78 कोटी रुपये होतं. ICICI Bank चं वित्तीय उत्पन्न गेल्या वर्षी याच काळात 341 कोटी रुपयांच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीमध्ये 542 कोटी रुपयांवर गेलं आहे.