‘हा’ निर्णय घ्या, देशातील महागाई कमी होईल; ‘इक्रा’चा केंद्र सरकारला सल्ला

Inflation | केंद्र सरकारने इंधनाच्या दरात कपात केल्यास महागाई आटोक्यात येईल. तसेच इंधनाच्या वाढत्या मागणीमुळे कर कमी करुनही केंद्र सरकारच्या उत्पन्नात विशेष घट होणार नाही

'हा' निर्णय घ्या, देशातील महागाई कमी होईल; 'इक्रा'चा केंद्र सरकारला सल्ला
महागाईने तोडला आजवरचा रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 10:14 AM

मुंबई: देशातील इंधन दरवाढ आणि प्रचंड महागाईमुळे गेल्या काही दिवसांमध्ये सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता मोदी सरकारवर (Modi government) सर्व स्तरातून टीका व्हायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पतनिर्धारण संस्था ‘इक्रा’ने केंद्र सरकारला नुकताच एक महत्वाचा सल्ला दिला होता. (Fuel price and Inflation rate increases in country)

महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उपकर कमी करा. इंधन दरवाढीमुळे महागाई उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. त्यामुळे बचत आणि भांडवल निर्मितीला बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इंधनाच्या दरात कपात केल्यास महागाई आटोक्यात येईल. तसेच इंधनाच्या वाढत्या मागणीमुळे कर कमी करुनही केंद्र सरकारच्या उत्पन्नात विशेष घट होणार नाही, असे ‘इक्रा’ने म्हटले होते. त्यामुळे आता मोदी सरकार इंधनावरील कर कमी करुन सामान्यांना दिलासा देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीमुळे विरोधक आणि सामान्य नागरिकांकडून सातत्याने लक्ष्य होत असलेल्या मोदी सरकारकडून लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol and Diesel) वाढत्या किंमतींना ब्रेक लावण्यासाठी त्यावरील कर कमी केले जाऊ शकतात.

केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील करात प्रत्येकी 4.5 रुपयांची कपात करु शकते. त्यामुळे सरकारच्या उत्पन्नात विशेष घट होणार नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या मागणीमुळे सरकारच्या ही तूट भविष्यात भरून निघेल. त्यामुळे मोदी सरकारकडून लवकरच इंधनावरील करात कपातीचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.

केंद्र सरकारने मार्च 2020 ते मे 2020 या पेट्रोवरील सेस आणि सरचार्जमध्ये 13 रुपये तर डिझेलवरील सेल आणि सरचार्जमध्ये तब्बल 16 रुपयांची दरवाढ केली आहे. चालू आर्थिक वर्षातील परिस्थिती पाहता पेट्रोल-डिझेलची मागणी 14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, इंधनाच्या दरात कपात न झाल्यास ही मागणी 13 टक्क्यांपर्यंत खाली घसरेल. 2021 मध्ये आतापर्यंत पेट्रोलची मागणी 10.6 टक्क्यांनी घटली आहे. तर इंधनावरील करापोटी केंद्र सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नात 55 टक्क्यांनी वाढ होऊ ते 3.5 लाख कोटी इतके झाले आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: मोदी सरकार ‘त्या’ कटू निर्णयाची अंमलबजावणी करणार, अल्पबचत योजनांचा व्याजदर घटणार?

Petrol-Diesel Price: अवघ्या 31 दिवसांत पेट्रोल-डिझेल आठ रुपयांनी महागलं, जाणून घ्या आजचा दर

Inflation: ‘कॉमन मॅन’चा खिसा कापला जाणार; महागाईने तोडला आजवरचा रेकॉर्ड

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.