जर 30 सप्टेंबरपर्यंत 2000 च्या नोटा बदलल्या नाहीत तर त्यानंतर काय होणार त्यांचे ?
दोन हजाराच्या नोटांना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडीयाने चलनातून बाद केल्यानंतर त्यांना बॅंकेत जमा करण्याची किंवा बदल्याची मुदत 30 सप्टेंबरला संपत आहे. त्यानंतर या दोन हजाराच्या नोटांचे काय होणार ते पाहा...
नवी दिल्ली | 28 सप्टेंबर 2023 : चलनातून रद्दबातल केलेल्या 2000 रुपयांच्या नोटांना जमा करण्याची किंवा बदलण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 अगदी तोंडावर आली आहे. जर तुम्ही अजूनही तुमच्याकडील दोन हजाराची नोट बॅंकेत जमा केली नसेल तर त्वरीत करावी. आरबीआयच्या मते आतापर्यंत बॅंकेत दोन हजाराच्या 97 टक्के नोटा परत आल्या आहे. आरबीआयने 19 मे 2023 रोजी 2000 हजाराच्या नोटा बॅंकेत जमा कराव्यात किंवा सममुल्यात बदलून घ्यावेत असे आदेश दिले आहेत. परंतू आरबीआयने 30 सप्टेंबर नंतर 2000 नोटांबाबत नवा निर्णय घेणार की आधीचा निर्णय कायम ठेवणार याबाबत काही सांगितलेले नाही.
30 सप्टेंबर नंतर काय होणार
आरबीआयच्या 19 मेच्या निर्णयानूसार 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रु.नोटा बदलता किंवा जमा करता येणार आहेत. आरबीआयच्या आतापर्यंतच्या निर्णयानूसार 2000 रु.नोटा 30 सप्टेंबरनंतरही लिगल टेंडर म्हणून राहतील. परंतू त्यांना बॅंकेच जमा किंवा बदलता येणार नाही. 30 सप्टेंबर नंतर केवळ आरबीआयमध्ये या नोटा बदलता येतील. आणि तेथे याचे स्पष्टीकरणही द्यावे लागेल की नमूद तारखेच्या आत काय नोटा बदलल्या किंवा जमा केल्या नाहीत.
आता अशा बदलता येतात नोटा
30 सप्टेंबरपर्यंतच्या डेडलाईनपर्यंत कोणत्याही बॅंकेत 2000 च्या नोटा जमा करता येतील. यावेळी आरबीआयसह देशातील सर्व बॅंकांमध्ये नोट बदल्याची सुविधी आहे. बॅंकेतील अकाऊंटमध्ये 2000 च्या नोटा डीपॉझिट करण्यासाठी केवायसी फॉर्मची गरज लागू शकते. साल 2018 मध्ये 2000 च्या सुमारे 6.73 लाख कोटी रुपये चलन होते. जी मार्च 2023 मध्ये घसरुन 3.62 लाख कोटी रुपयांवर आले होते.