जर तुम्ही YES Bank चे ग्राहक आहात तर तुम्हाला 3-4 महिन्यांत मिळणार क्रेडिट कार्ड, जाणून घ्या
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नवीन पत, डेबिट आणि प्रीपेड कार्ड ग्राहक तयार करण्यासाठी मास्टरकार्ड आशिया पॅसिफिकवर 22 जुलैपासून बंदी घातलीय.
नवी दिल्ली : येत्या तीन ते चार महिन्यांत क्रेडिट कार्ड पुन्हा देण्याची योजना असल्याचं येस बँकेने शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मास्टरकार्डला नवीन कार्ड देण्यास बंदी घातल्यानंतर बँकेचे हे विधान समोर आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नवीन पत, डेबिट आणि प्रीपेड कार्ड ग्राहक तयार करण्यासाठी मास्टरकार्ड आशिया पॅसिफिकवर 22 जुलैपासून बंदी घातलीय.
पुढील आठवड्यात व्हिसाबरोबरचा करार केला जाणार
बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार म्हणाले की, आम्ही क्रेडिट कार्डसाठी रुपेबरोबर करार केला असून, पुढील आठवड्यात व्हिसाबरोबरचा करार केला जाणार आहे. आम्ही अपेक्षा करतो की, येत्या 90 ते 120 दिवसांत क्रेडिट कार्ड देणे सुरू होईल.
म्हणून हा निर्णय घेण्यात आला
कंपनीकडून डेटा देखभाल नियमांचे पालन न केल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. त्या बँकांवर या बंदीचा मोठा परिणाम झाला, ज्यांचे करार फक्त मास्टरकार्डबरोबर होते. या बँकेची संपूर्ण क्रेडिट कार्ड योजना मास्टरकार्डशी जोडलेली आहे. म्हणून येस बँक आपल्या ग्राहकांना पुढील तीन ते चार महिने क्रेडिट कार्ड जारी करू शकणार नाही.
बंदीचा परिणाम या 5 बँकांवर होणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मास्टरकार्ड बंदी घालण्याच्या निर्णयामुळे देशातील अॅक्सिस बँक, येस बँक आणि इंडसइंड बँक यांच्यासह देशातील पाच खासगी बँकांना नवीन कार्ड देण्यास अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने बुधवारी 22 जुलैपासून मास्टरकार्ड एशिया पॅसिफिकवर नवीन क्रेडिट, डेबिट आणि प्रीपेड कार्ड ग्राहक तयार करण्यास बंदी घातली आहे. कंपनीने देशातील डेटा संग्रहित करण्याच्या नियमांचे पालन केले नाही म्हणून हे पाऊल उचलले गेले.
एसबीआयलाही याचा फटका बसणार
या निर्णयाचा एचडीएफसी बँकेवरही परिणाम होणार आहे. परंतु आरबीआयने नवीन डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड देण्यास यापूर्वीच बंदी घातली आहे. या पाच बँकांव्यतिरिक्त बजाज फिनसर्व्ह आणि सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियालाही काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या बँका मास्टरकार्डमार्फत नवीन कार्डे देखील जारी करतात.
संबंधित बातम्या
12.90 रुपयांच्या शेअर्सच्या गुंतवणुकीनं गुंतवणूकदार श्रीमंत! वर्षभरात 1 लाखाचे झाले 6 लाख
डीमॅट खात्यासंदर्भात सेबीकडून मोठा बदल, आता खाते उघडण्यापूर्वी हा फॉर्म भरणे आवश्यक
If you are a YES Bank customer, you will get a credit card in 3-4 months