Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eicher Motors : छप्परफाड डिव्हिडंड! बुलेटच्या वेगाने धावणार शेअर

Eicher Motors : आयशर मोटर्सचा शेअर 1 जानेवारी 1999 रोजी 1.22 रुपयांवर ट्रेडिंग करत होता. या शेअरने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 2,77,367 टक्के इतका परतावा दिला आहे.

Eicher Motors : छप्परफाड डिव्हिडंड! बुलेटच्या वेगाने धावणार शेअर
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 8:47 AM

नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : शेअर बाजारातील (Share Market) अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यामध्ये आयशर मोटर्सचा (Eicher Motors) शेअर तर गुंतवणूकदारांना लॉटरी ठरली आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला. या शेअरमुळे गुंतवणूक मालामाल झाले आहेत. 1 जानेवारी 1999 रोजी हा शेअर केवळ 1.22 रुपयांवर ट्रेडिंग करत होता. त्यानंतर या शेअरने गुंतवणूकदारांना 2,77,367 टक्के इतका परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांना ही कंपनीने 3700 टक्के लाभांश (Dividend) देणार आहे. आता उद्या डिव्हिडंडची घोषणा करणार आहे. 28 मार्च 2023 रोजी आयशर मोटर्सचे शेअर 2852 निच्चांकावर आला होता. त्यानंतर गुंतवणूकदारांना 20 टक्के बंपर रिटर्न मिळाला.

Ex-Dividend ची घोषणा

आयशर मोटर्स रॉयल एनफील्ड (Royal Enfield) आणि आयशर या नावाने ट्रक-टॅक्टरची निर्मिती करते. ऑटोमोबाईल व्यवसायात असलेल्या या दिग्गज कंपनीचा सोमवारी 14 ऑगस्ट रोजी एक्स डिव्हिडंड ट्रेडिंग होणार आहे. आयशर मोटर्सच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने 37 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या लाभांशाची घोषणा केली आहे. एक रुपया फेस वॅल्यू असलेल्या आयशर मोटर्सचा शेअर 3700 टक्के होत आहे.

हे सुद्धा वाचा

जोरदार कामगिरी

जून तिमाहीत आयशर मोटर्सने जोरदार कामगिरी बजावली. या कंपनीचा तिमाही निकाल शानदार राहिला. या निकालानुसार, आयशर मोटर्सच्या एकूण महसूलात वाढ झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महसूल वाढून तो 3986 कोटी रुपये झाला. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यामध्ये 43.68 टक्क्यांची वाढ झाली.

एकत्रित नफ्यात मोठी वाढ

कंपनीच्या एकत्रित शुद्ध नफ्यात मोठी वाढ झाली. नेट प्रॉफिट 50 टक्क्यांहून अधिक वाढला. हा 918 कोटींवर जाऊन पोहचला. आयशर मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार रॉयल एनफिल्डच्या विक्रीत मोठी वाढ झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रॉयल एनफिल्डची विक्री 21 टक्क्यांनी वाढली. कंपनीच्या 2.25 लाख बाईकची विक्री झाली.

चढता आलेख

आयशर मोटर्सच्या शेअरमध्ये सातत्याने वृद्धी होत आहे. 20 नोव्हेंबर 2009 रोजी आयशर मोटर्सचा एक शेअर 60 रुपयांना होता. 16 ऑगस्ट 2013 रोजी हा शेअर 316 रुपयांवर पोहचला. तर आता आयशर मोटर्सचा शेअर 3385 रुपयांवर आहे. आता कंपनी इलेक्ट्रिक बुलेट आणण्याच्या तयारीत आहे.

अशी झाली होती घसरण

3 वर्षांपूर्वी 3 एप्रिल 2020 रोजी आयशर मोटर्सच्या शेअर्सने 1268 रुपयांवर घसरला होता. या निच्चांकी कामगिरीनंतर या शेअरने मोठा पल्ला गाठला. एका वर्षात या शेअरमध्ये मोठा बदल झाला नाही. 28 मार्च 2023 रोजी आयशर मोटर्सचे शेअर 2852 निच्चांकावर आला होता. त्यानंतर गुंतवणूकदारांना 20 टक्के बंपर रिटर्न मिळाला.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.