‘या’ सात चुका केल्या तर हातापाया पडूनही बँकेकडून मिळणार नाही कर्ज, असा होतो CIBIL खराब
बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी सिबिल स्कोअर तपासला जातो. जर योग्य असेल तर बँका कर्ज देतात. अन्यथान बँकेकडून कर्ज मिळणं कठीण होतं. त्यामुळे सिबिल स्कोअर खूपच महत्त्वाचा आहे. सात गोष्टींमुळे सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

बँक कर्ज आणि सिबिल स्कोअरImage Credit source: TV9 Network
बँकांकडून कर्ज घेण्यापूर्वी आपल्या सिबिल स्कोअरची माहिती असणं गरजेचं आहे. सिबिल स्कोअर 300 ते 900 अंकांपर्यंत असतो. या दरम्यान असलेला आकडा तुम्ही कर्ज घेण्यास योग्य व्यक्ती आहात की नाही हे ठरतं. आपलं जुनं कर्ज, क्रेडिट कार्ड बिल आधारावर ही संख्या निश्चित केली जाते. जर तुम्ही कार्ड आणि कर्जाची रक्कम योग्य वेळेत भरली असेल तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला होतो. जर यात काही चूक झाली तर मात्र त्याचा थेट फटका सिबिल स्कोअरवर होतो. त्यामुळे सिबिल स्कोअर खराब होऊ नये यासाठी 7 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला फटका बसू शकतो.
- जर तुम्ही कर्ज घेतलं असेल आणि त्या कर्जाचा हप्ता (ईएमआय) चुकला तर त्याचा थेट परिणाम सिबिलवर होतो. यामुळे सिबिल स्कोअर कमी होतो. त्यातही एकापेक्षा जास्त ईएमआय भरणं राहून गेलं तर मग सिबिल स्कोअर खूपच खराब होतो. अशा स्थितीत बँका लोन देत नाहीत. कर्ज भरेल की नाही याची धास्ती बँकांना लागते.
- इतकंच काय तर तुम्ही मोठं लोन घेतलं असेल तरीही त्याचा परिणाम सिबिलवर होतो. तुमच्या डोक्यावर आधीच मोठं कर्ज आहे आणि भरायचं आहे. त्यामुळे बँका पुन्हा कर्ज देताना काचकूच करतात. गृहकर्ज घेतल्यानंतर सिबिल स्कोअर कमी होतो.
- एखादी व्यक्ती कर्जासाठी वेगवेगळ्या बँकांमध्ये अर्ज करते आणि कमी व्याजदराने कर्ज मिळेल तेथून घेते. पण तुम्ही जेव्हा अनेक बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुमचा सिबिल स्कोअर प्रत्येक बँकेकडून तपासला जातो. ही प्रक्रिया कठोर चौकशी अंतर्गत घडते. बँक किंवा एनबीएफसी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासतात तेव्हा त्याला हार्ड इन्क्वायरी म्हणतात.
- तुम्ही वेळेपूर्वी कर्ज बंद केले तर त्याचा परिणाम तुमच्या सिबिलवरही होतो. जर तुम्ही सुरक्षित कर्ज घेतले आणि ते वेळेपूर्वी बंद केले तर सिबिल स्कोअर कमी होतो. पण हे तात्पुरत्या स्वरूपाचं असतं आणि काही काळाने पुन्हा बरा होतो.
- तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून मोठी खरेदी केली तर तु्मच्या सिबिलवर परिणाम होतो. त्यामुळे खरेदीसाठी तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड मर्यादा 30 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम वापरावी. नाही तर तुमच्या सिबिल स्कोअरवर परिणाम होईल.
- तुम्ही वारंवार क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला तर याचा तुमच्या सिबिलवरही परिणाम होतो. कारण यामध्येही कठोर चौकशी केली जाते. यामुळे सिबिल कमी होते. पण तात्पुरता स्वरुपाचं असून काळानंतर सिबिल पुन्हा बरा होतो.
- तुम्ही क्रेडिट कार्ड बंद केले तर याचा सिबिलवर परिणाम होतो. तुमचा क्रेडिट वापर गुणोत्तर वाढतो. या गुणोत्तरात वाढ झाल्याने सिबिल स्कोअरवर विपरीत परिणाम होतो आणि कमी होतो.