AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीसुद्धा SBI डेबिट कार्ड वापरताय, तर ही बातमी महत्वाची, जाणून घ्या

देशातील सर्वात मोठी बँक SBI ने आपल्या ट्विटर हँडलवर आपल्या 44 कोटी ग्राहकांसाठी एक व्हिडीओ जारी केलाय. ज्यात कार्ड ब्लॉक करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगितली गेलीय.

तुम्हीसुद्धा SBI डेबिट कार्ड वापरताय, तर ही बातमी महत्वाची, जाणून घ्या
State Bank Of India
| Edited By: | Updated on: Aug 28, 2021 | 12:39 PM
Share

नवी दिल्ली : जर तुम्ही देखील SBI ग्राहक असाल आणि तुमचे डेबिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेले असेल तर ते शक्य तितक्या लवकर ब्लॉक करणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा कार्ड तुमच्या सोबत असतानासुद्धा कार्डशिवाय व्यवहार केला जातो, मग अशा परिस्थितीतसुद्धा कार्ड ताबडतोब ब्लॉक करावे. देशातील सर्वात मोठी बँक SBI ने आपल्या ट्विटर हँडलवर आपल्या 44 कोटी ग्राहकांसाठी एक व्हिडीओ जारी केलाय. ज्यात कार्ड ब्लॉक करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगितली गेलीय.

1. टोल फ्री क्रमांकावर कॉल करा

तुमचे SBI डेबिट कार्ड ब्लॉक करण्याचा सर्वात वेगवान मार्ग म्हणजे बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर 1800 11 2211 किंवा 1800 425 3800 वर कॉल करणे. टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला काही सूचना दिल्या जातील. या फॉलो करून तुम्ही कार्ड ब्लॉक करू शकता.

2. नेट बँकिंगद्वारे ब्लॉक करा

>> आपले वापरकर्ता नाव आणि पासवर्डसह www.onlinesbi.com वर लॉगिन करा. >> ‘ई-सेवा’ टॅबमध्ये, ‘एटीएम कार्ड सेवा’ अंतर्गत, ‘ब्लॉक एटीएम कार्ड’ निवडा. >> डेबिट कार्डाशी जोडलेले खाते निवडा. >> सर्व सक्रिय आणि अवरोधित कार्डे दाखवली जातील. तुम्हाला कार्डाचे पहिले 4 आणि शेवटचे 4 अंक दिसतील. >> तुम्हाला ब्लॉक करायचे असलेले कार्ड सोबत कार्ड ब्लॉक करण्याचे कारण निवडा. ड्रॉपडाऊन मेनूमधून कारण निवडले जाऊ शकते. त्यानंतर ‘सबमिट’वर क्लिक करा. >> तपशील तपासा आणि खातरजमा करा. एकदा कार्ड ब्लॉक झाले की, इंटरनेट सुविधेद्वारे अनब्लॉक करण्याचा पर्याय नाही. >> ऑथेंटिकेशनची पद्धत निवडा. हे एसएमएसद्वारे ओटीपी किंवा प्रोफाइल पासवर्ड असू शकते. >> आवश्यक बॉक्समध्ये ओटीपी/प्रोफाइल पासवर्ड टाका. त्यानंतर ‘कन्फर्म’ वर क्लिक करा. >> कार्ड यशस्वीपणे ब्लॉक केल्यावर तिकीट क्रमांकासह एक मेसेज दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी ठेवा.

3. एसएमएस पाठवून ब्लॉक करा

तुम्ही SMS पाठवून तुमचे ATM कार्ड ब्लॉक देखील करू शकता. तुमचे ATM कार्ड ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला 567676 वर ब्लॉक XXXX पाठवावे लागेल. येथे XXXX डेबिट कार्ड क्रमांकाचे शेवटचे 4 अंक आहेत. बँक खात्यात नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून एसएमएस पाठवा. बँकेकडून एसएमएस मिळाल्यावर तुम्हाला एक खातरजमा करणारा एसएमएस पाठवला जाईल. एसएमएस अलर्टमध्ये तिकीट क्रमांक, ब्लॉक करण्याची तारीख आणि वेळ समाविष्ट असेल.

4. बँक शाखेला भेट द्या

बँक अधिकाऱ्याला त्याच्या डेबिट कार्डला जवळच्या शाखेत जाऊन ब्लॉक करण्याची विनंती करता येते.

संबंधित बातम्या

PMJDY: 43.04 कोटी जन धन बँक खाती 7 वर्षांत उघडली, जाणून घ्या त्यांच्यात किती पैसे जमा?

PM Kisan : चांगली बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात आता 6000 ऐवजी 12000 येणार, जाणून घ्या कसे?

If you too use an SBI debit card, this is important news

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.