Pension | दर महा 1 लाख रुपये पेन्शन हवे तर कुठे आणि कशी कराल गुंतवणूक, समजून घ्या गणित..

Pension | 30 वर्षानंतर 1 लाख रुपये पेन्शनसाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी लागले. ती ही एक रक्कमी नाही, तर SIP च्या माध्यमातून. दर महिन्याला 2200 रुपयांची गुंतवणूक ही किमया घडवून आणेल.

Pension | दर महा 1 लाख रुपये पेन्शन हवे तर कुठे आणि कशी कराल गुंतवणूक, समजून घ्या गणित..
एक लाखांचे निवृत्ती वेतन Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 3:53 PM

Pension | 30 वर्षानंतर 1 लाख रुपये पेन्शनचे तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. पण त्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund Investment) करावी लागले. म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षात निवृत्तीवेळी, (Retirement) एक लाखांचे निवृत्ती वेतन मिळवून देईल. त्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीच्या (SIP) माध्यमातून गुंतवणूक करावी लागेल. दर महिन्याला 2200 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच ही गुंतवणूक पुढे वाढवावी लागेल.  त्याआधारे तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा एक निश्चित रक्कम प्राप्त करता येईल.

SIP द्वारे महागाईवर मात

निवृत्तीनंतर पुढील 30 वर्षे त्याला पेन्शन मिळायले हवे. वय आणि बचत यावरही पेन्शन अवलंबून असेल. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक तुम्हाला एक लाख पेन्शन मिळवून देईल. SIP च्या मदतीने ही किमया गाठता येईल.

 15-15-15 चा नियम काय सांगतो

म्युच्युअल फंडातून परताव्यासाठी 15-15-15 चा नियम लक्षात घेणे आवश्यक आहे. 15 वर्षांच्या गुंतवणुकीवर 15 टक्के परतावा गृहीत धरण्यात येतो. 30 वर्षांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 15 टक्के परतावा हमखास मिळू शकतो.

हे सुद्धा वाचा

एसआयपीत 10 टक्क्यांची वाढ गरजेची

एखाद्याला 30 वर्षांमध्ये 2.76 कोटी रुपये हवे असतील तर त्याला दर वर्षाला एसआयपी 10 टक्क्यांनी वाढवणे आवश्यक आहे. दर महिन्याला 2200 रुपयांची एसआयपी सुरु कराल तर सहज तुम्हाला एक लाख रुपये दरमहा पेन्शन मिळेल. त्यात दहा टक्के वार्षिक वृद्धी दर गृहित धरा.या हिशोबाने तुम्ही एकूण 43,42,642 रुपये जमा कराल.

सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅनचा वापर

गुंतवणुकीवर 15 टक्के परतावा लक्षात घेता, 2.79 कोटी रुपये मिळतील. ही रक्कम तुम्हाला सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅनद्वारे काढल्यास दरमहा 1 लाख रुपयांची पेन्शन मिळेल. यामध्ये तुम्हाला किती रक्कम काढायची ते निश्चित करता येते. त्याद्वारे दर महिन्याला एक लाख रुपयांची निश्चित रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

हे म्युच्युअल फंड मदतीला

तुम्हाला SBI Conservative Hybrid Fund, ICICI Prudential Equity & Debt Fund आणि Kotak Equity Hybrid Fund – Direct Plan मध्ये गुंतवणूक करता येईल. तुम्ही तुमच्या वित्त सल्लागारांची मदत ही घेऊ शकता. त्यांच्या मदतीने निवृत्तीनंतरचे नियोजन करता येईल.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.