India’s Richest : श्रीमंतांच्या यादीत वाजवायचाय डंका, मग उभा करा इतका नोटांचा डोंगर!

India's Richest : विविध देशात सर्वात श्रीमंतांच्या वर्गात नाव कमाविण्यासाठी किती कमाई करावी लागेल याची माहिती तुम्हाला आहे का, जगात प्रत्येक देशात कमाईचा हा आकडा वेगळा आहे. 

India's Richest : श्रीमंतांच्या यादीत वाजवायचाय डंका, मग उभा करा इतका नोटांचा डोंगर!
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 4:37 PM

नवी दिल्ली : श्रीमंत (Richest) होण्याचा अर्थ मोठा बंगला, महागडी कार आणि काही शेतीवाडी नावावर असली की, तो श्रीमंत झालाच, असा सर्वसामान्य समज आहे. पण जगातील एक टक्का श्रीमंतांमध्ये नाव येण्यासाठी किती बरं संपत्ती लागत असेल? ही कल्पना ही आपल्यासाठी अत्यंत वजनदार आहे नाही का, ग्लोबल रिअल इस्टेट कन्सल्टेंसी नाईट फ्रँकने (Knight Frank) याविषयीचा एक अहवाल तयार केला आहे. या फर्मने अपडेटेड वेल्थ रिपोर्ट तयार केला आहे. त्यामध्ये विविध देशात सर्वात श्रीमंतांच्या वर्गात नाव कमाविण्यासाठी किती कमाई करावी लागेल याची माहिती दिली आहे. प्रत्येक देशात कमाईचा हा आकडा वेगवेगळा आहे.

मोनॅकोत हवी इतकी संपत्ती या यादीत सर्वात आघाडीवर मोनॅको देश आहे. मोनॅको या देशात कोणत्याही व्यक्तीला 1 टक्के श्रीमंतांच्या यादीत नाव काढण्यासाठी 8 अंकी पगाराची आवश्यकता आहे. नाईट फ्रँकच्या अहवालानुसार, मोनॅकोमध्ये श्रीमंताच्या यादीत समावेशासाठी 12.4 दशलक्ष अमेरिकन डॉलर कमाई हवी.

भारतात हवी इतकी कमाई तर भारतात श्रीमंतांच्या यादीत समावेश होण्यासाठी व्यक्तीकडे किती रुपयांची दौलत हवी? या फर्मच्या वेल्थ रिपोर्टनुसार, श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी कमीत कमी 175,000 डॉलर म्हणजे 1.44 कोटी रुपये संपत्ती असणे आवश्यक आहे. भारतासह 25 देशांमध्ये हेच प्रमाण आहे दक्षिण आफ्रिका, केनिया आणि फिलिपिन्सपेक्षा भारतीय संपत्ती कमाविण्यात अग्रेसर आहे. गेल्या काही वर्षांत भारतीयांनी इक्विटी बाजार आणि डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून 11 टक्के अधिक संपत्ती कमावली आहे.

हे सुद्धा वाचा

आशिया देशातील परिस्थिती काय आशियातील देशांमध्ये हाँगकाँग सर्वात पुढे आहे. या देशात श्रीमंतांच्या एक टक्के यादीत सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे 3.4 दशलक्ष डॉलर संपत्ती हवी. सिंगापूरमध्ये 3.5 दशलक्ष डॉलर पैसा हवा. फोर्ब्सच्या यादीनुसार, 2023 मधील अब्जाधीशांच्या यादीत 169 भारतीय होते. गेल्यावर्षी हा आकडा 166 इतका होता. एका वर्षांत संपत्तीत 8 टक्के घसरण होऊन पण मुकेश अंबानी हे भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंती व्यक्तींमध्ये घट्ट पाय रोवून आहेत.

श्रीमंत-गरीब दरी वाढली नाईट फ्रँकने अहवालात स्पष्ट केले आहे की, कोरोनासारखी महामारी, वाढता खर्च, महागाई यामुळे भारतात श्रीमंत आणि गरिबांमधील दरी रुंदावली आहे. मोनॅकोमध्ये श्रीमंतांच्या यादीत समावेश होण्यासाठी मोठी कमाई करावी लागते. तर फिलिपिन्समध्ये मात्र या यादीत समावेशासाठी मोनॅको पेक्षा कमी पैसा लागतो. नाईट फ्रँकच्या अहवालानुसार, मोनॅकोमध्ये श्रीमंताच्या यादीत समावेशासाठी 12.4 दशलक्ष अमेरिकन डॉलर कमाई हवी.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.