स्वप्नातलं घर घेण्यासाठी लोन हवंय ? सिबिल खराब आहे ? तर मग ही योजना तुमच्यासाठी महत्वाची

कमी CIBIL मुळे तुमच्या कर्जाचा अर्ज मंजूर केला जाणार नाही ही धारणा आता सोडून द्या. ज्या लोकांचा CIBIL स्कोअर कमी आहे किंवा त्यांनी नवीन क्रेडिट घेतले आहे त्यांच्यासाठी खाली काही मार्ग दिले आहेत. ज्यामुळे तुम्ही देखील वैयक्तिक कर्ज मिळवू शकता.

स्वप्नातलं घर घेण्यासाठी लोन हवंय ? सिबिल खराब आहे ? तर मग ही योजना तुमच्यासाठी महत्वाची
HOME LOANImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 5:35 PM

मुंबई : तुमचा सिबील खराब असेल तर कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देत नाही. ज्यांचा सिबील चांगला त्यांनाच कर्ज मिळते. पण, कमी सिबील असतानाही तुम्हाला कर्ज मिळू शकते. कमी CIBIL मुळे तुमच्या कर्जाचा अर्ज मंजूर केला जाणार नाही ही धारणा आता सोडून द्या. ज्या लोकांचा CIBIL स्कोअर कमी आहे किंवा त्यांनी नवीन क्रेडिट घेतले आहे त्यांच्यासाठी खाली काही मार्ग दिले आहेत. ज्यामुळे तुम्ही देखील वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. तुमच्याकडे कर्जाचा हप्ता भरण्यासाठी पुरेसे उत्पन्न असल्यास बँका किंवा कर्ज देणाऱ्या संस्था तुमचा वैयक्तिक कर्ज अर्ज कमी CIBIL स्कोअर असूनही मंजूर करू शकतात. याशिवाय अशी एक स्किम आहे ज्यामुळे तुम्हाला हमखास कर्ज मिळू शकते.

तुम्ही एखाद्या सुप्रसिद्ध कॉर्पोरेट / बहुराष्ट्रीय कंपनी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेत काम करत असल्यास बँक किंवा कर्ज संस्थेला तुमच्या उत्पन्नाची इतरांपेक्षा अधिक खात्री मिळते. तुमच्या उत्पन्नावर तुम्ही कर्जाची वेळेत परतफेड करू शकता अशी बँकेची खात्री झाल्यास अशा अर्जदारांना EMI भरण्याची क्षमता, नोकरीची स्थिरता यावर तुमच्या कर्जाला मंजूरी मिळू शकते.

डिजिटल एनबीएफसीचा पर्याय

NFBC (NBFC) म्हणजेच Non Banking Financial Company. या कंपन्या अगदी बँकेप्रमाणेच कर्ज देतात. पण, त्यांना कायदेशीर बँक म्हणून मान्यता नाही. या खाजगी वित्तीय कंपन्या असून कर्जाचा व्यवहार करतात. अनेक एनबीएफसी आणि नवीन युग डिजिटल कर्ज संस्था कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या अर्जदारांना वैयक्तिक कर्ज देतात. पण, अशा NBFC द्वारे देऊ केलेत्या कर्जाचा व्याजदर बँकांपेक्षा जास्त असतो.

सह अर्जदारासह अर्ज करा

तुमचा CIBIL स्कोअर कमी असल्यास तुम्ही कुटुंबातील कमावत्या सदस्याला सह-अर्जदार बनवून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. यामुळे तुम्हाला कर्ज देणारी बँकेची जोखीम कमी होते. कारण, या प्रकरणात सह अर्जदारही तुमच्याप्रमाणे कर्जाची परतफेड करण्यासाठी तितकेच जबाबदार असतात. पण, यात तुमच्या सहकारी अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा लागतो. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असला तरी सह अर्जदार सोबत असल्याने कर्ज मिळण्यात अडचण येणार नाही.

वैयक्तिक कर्जाची रक्कम कमी निवडा

CIBIL स्कोअर कमी असल्यामुळे बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. अशावेळी आपण कमी कर्जाच्या रकमेसाठी अर्ज करावा. ज्यामुळे तुम्हाला कर्ज परतफेड करणे सोपे होईल तसेच बँकेलाही कर्ज देताना जोखीम कमी वाटेल. कमी क्रेडिट स्कोअर असलेले अर्जदार कर्ज मिळवण्यासाठी जमीन, मुदत ठेव, सोने तारण ठेवून कर्ज घेऊ शकतात.

सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी काय कराल ?

तुमचे सीबील खराब आहे अशावेळी होमलोन घ्यायचे आहे. 1 वर्षानंतर घर मिळणार असेल तर सीबील सुधारण्यासाठी गृहकर्ज घेण्यासाठी एक उपाय आहे. ज्या बँकेत तुमचे खाते आहे तिथे ५० हजारांची एक फिक्स डिपॉझिट करा. त्या फिक्स डिपॉझिटसाठी एक क्रेडिट कार्ड apply करा. बँक तुम्हाला ४० हजारांचे लिमिट असलेले क्रेडिट कार्ड देईल.

हे क्रेडिट कार्ड दर महिन्याला २० ते ५० टक्के वापरा. त्याचे बिल जनरेट झाले की ३ दिवसांच्या आत पेमेंट करा. वेळेत पेमेंट केल्याचे ३ आणि कार्ड वापरायचे ३ असे ६ पॉईंट्स तुमच्या सिबिल स्कॉरला जमा होतील. त्यामुळे पुढील ६ ते १२ महिन्यात सिबिल स्कोर सुधारेल. शिवाय फिक्स डिपॉझिटचे बँक तुम्हाला ६ टक्के व्याज देईल ते वेगळचे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.