AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मान्सूनचा पाऊस जितका जादा तितका पैसा मिळणार, ‘या’ कंपन्यातील गुंतवणुकीवर मोठ्या कमाईची संधी

मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होते. शेतीशी निगडित असणाऱ्या कंपन्यांचं उत्पन्न देखील वाढतं.

मान्सूनचा पाऊस जितका जादा तितका पैसा मिळणार, 'या' कंपन्यातील गुंतवणुकीवर मोठ्या कमाईची संधी
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 12:21 PM

नवी दिल्ली :यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून साधारण राहणार असून सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनचा पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्यास अर्थव्यवस्थेवरही त्याचा चांगला परिणम दिसून येतो. पाऊस चांगला झाल्यास शेती चांगली पिकते. कंपन्यांना त्यांच्या उत्पादनसाठी कच्चा माल उपलब्ध होतो. परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होते. शेतीशी निगडित असणाऱ्या कंपन्यांचं उत्पन्न देखील वाढतं. (IMD predict normal monsoon this year experts said these share may give good return this year)

खरिप हंगामासाठी कोट्यवधी शेतकऱ्यांची तयारी

एका अहवालानुसार खरिप हंगामात मान्सून पावसावर भारतातील 20 कोटी शेतकरी शेती करतात. यामध्ये धानाची पेरणी, ऊस लागण, मका, कापूस आणि सोयाबीन सारख्या पिकांचा समावेश असतो.मात्र, देशातील एकूण शेतीयोग्य जमिनीपैकी केवळ 50 टक्केंच्या आसपास सिंचनाची सोय झाली असल्यानं शेतीच्या उत्पन्नावर त्याचा फरक पडतो. कृषी क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेतील वाटा 14 टक्केंवर गेला आहे.

Monsoon | मान्सून 1 जून रोजी केरळात, हवामान विभागाचा अंदाज, राज्यात कुठे-कधी पाऊस?

मान्सूनचा या कंपन्यांना फायदा

रॅलिस इंडिया

टाटा ग्रुपची रॅलिस इंडिया ही कृषी क्षेत्रातील केमिकल कंपनी आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील तीन ते सहा महिन्यात रॅलिस इंडिया कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीमधे तेजी येण्याची शक्यता आहे. या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. मान्सूनचा पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्यास ग्रामीण भागातून मागणी वाढते. जीसीएल सिक्योरिजनं रॅलिस इंडियाचे शेअर 370 रुपयांना खरेदी करावते असा सल्ला दिला आहे.

कोरोमंडल इंटरनॅशनल

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज हाऊसनं कीटकनाशक बनवणाऱ्या कोरोमंडल इंटरनॅशनलमध्ये गुंतवूणक करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास सध्याचं मूल्य 728 रुपये आणि त्या वर 41 टक्के परतावा मिळू शकतो.

एस्कॉर्टस लिमिटेड

खरिप हंगामात शेती करण्यासाठी ट्रॅक्टर आणि इतर अवजारांची मागणी वाढते. याचा फायदा एस्कॉर्टस लिमिटेड या कंपनीला होईऊ शकते. केडिया कमोडिटीजचे संचालक अजय केडिया यांनी या कंपनीत 1280 बेस ठेऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

इतर बातम्या:

‘आधी आमदार-खासदारांना कोरोनाची लस द्या’, हरियाणा सरकारचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र

भाजपात प्रवेश करताच बाळासाहेब सानप यांना मोठी जबाबदारी, चंद्रकांत पाटलांकडून नियुक्तीचे पत्र

(IMD predict normal monsoon this year experts said these share may give good return this year)

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.