Car Insurance | दिवाळीत फटाक्यांमुळे कारच नुकसान झालं, तर इन्शुरन्स कव्हर मिळत का?
Car Insurance | कार इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक कार मालक इन्शुरन्स कव्हरला प्राधान्य देतो. वेळेच्यावेळी इन्शुरन्स पैसे भरले जातात. कारण एखाद्यावेळी अपघात किंवा अन्य कुठल्या कारणांमुळे कारच नुकसान झाल्यास इन्शुरन्स कव्हरमुळे मोठी आर्थिक मदत होते. आज आपण दिवाळीत फटाक्यांमुळे कारच नुकसान झाल्यास इन्शुरन्स कव्हर मिळतं का? हे जाणून घेऊया.
मुंबई : दिवाळीत रस्त्यावर, सोसायटीच्या आवारात फटाके फोडले जातात. काहीवेळा फटाके फुटताना कारच नुकसान होतं. अशावेळी तुम्ही इन्शुरन्स कव्हर घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. सध्याच्या जमान्यात रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत चाललीय. त्यामुळे पॉल्यूशनची प्रमाणही वाढतय. कारला आग लागण्याच्या घटना सुद्धा वाढत चालल्या आहेत. दिवाळीच्या दिवसात सर्वत्र लाइट्स, मिठाई आणि फटाके फोडले जातात. कारच्या बाजूलाच फटाके फुटत असतील, तर आग लागण्याचा धोका सुद्धा असतो. फटाक्यांमुळे तुमच्या कारच नुकसान झालं असेल, तर अनेक इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला इन्शुरन्स कव्हर देतात.
कार इन्शुरन्स पॉलिसी
कार इन्शुरन्स पॉलिसी तीन प्रकारची असते. थर्ड-पार्टी कार इन्शुरन्स, कॉम्प्रिहेंसिव कार इन्शुरन्स आणि स्टँडअलोन पॉलिसी (स्वत:मुळे झालेला डॅमेज). आग किंवा स्फोटामुळे कारला डॅमेज झाल्यास कॉम्प्रिहेंसिव आणि स्टँडअलोन कार इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर मिळतं.
इन्शुरन्स कंपनीकडून कव्हर मिळवण्यासाठी असा करा क्लेम
कारच नुकसान झाल्यास इन्शुरन्स कंपनी आणि एंजटला सर्वात आधी इन्फॉर्म करा. एजंट तात्काळ आपल्या मदतीसाठी अरेंजमेंट करेल.
न चूकता FIR करा : संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना द्या आणि FIR करा. आगीमुळे होणाऱ्या डॅमेजमध्ये इन्शुरन्स कंपन्या सामान्यपणे FIR ची मागणी करतात. यातून त्यांना तारीख, वेळ, जागा आणि घटनेबद्दल डिटेल माहिती मिळते.
डॉक्यूमेंट : इंस्पेक्शन प्रोसेसला तुमचा दावा पटला, तर तुमचा क्लेम योग्य आहे, मग इन्शूरन्स एजंट डॉक्यूमेटेशन सुरु करेल.
क्लेम सेटलमेंट : डॉक्यूमेटेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इन्शूरन्स एजंट क्लेम कव्हर देतो.
इन्शूरन्स रिजेक्ट कधी होतो?
बॅटरीमध्ये स्पार्क किंवा इलेक्ट्रिक वायरिंग सिस्टममधल्या खराबीमुळे कारला आग लागली असेल, तर क्लेम रिजेक्ट होईल.
AC किंवा LPG गॅस किट बदलताना किंवा फिट करताना चूकीमुळे आग लागली, तर इन्शूरन्स क्लेम रिजेक्ट होतो.
काही इंटरनल इशू असेल, ऑइल लीकेज किंवा ओव्हरहिटिंग प्रॉब्लेममुळे कार डॅमेज झाली, तर इन्शूरन्स कव्हर नाही मिळतं.