बिझनेसच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी उत्तम आहे ‘हा’ व्यवसाय, प्रदूषणही होईल कमी

विशेष म्हणजे या टाईल्स आणि विटा सरकारी कामातही वापरल्या जातील. त्यामुळे या वीट आणि फरशा विकून तुम्हाला चांगला व्यवसाय करता येणार आहे.

बिझनेसच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी उत्तम आहे 'हा' व्यवसाय, प्रदूषणही होईल कमी
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 11:38 AM

नवी दिल्ली : सध्या सगळीकडे शहरीकरण होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घर बांधणीचं काम सुरू आहे. त्यामुळे चांगल्या विटा आणि इतर सामानांची मागणीही वाढत आहे. अशात आता शहरातून निघणाऱ्या कचरा फेकून न देता त्यापासून विटा आणि फरशा बनवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या टाईल्स आणि विटा सरकारी कामातही वापरल्या जातील. त्यामुळे या वीट आणि फरशा विकून तुम्हाला चांगला व्यवसाय करता येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे शहरातील प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल. ही योजना ग्रेटर नोएडामध्ये सुरू करण्यात आली आगे. साडेचार एकर क्षेत्रात याचं काम सुरू केलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. (in greater noida bricks and tiles to be made from city grabage by private compnay know its detail plan)

ग्रेटर नोएडा अथॉरिटीच्या म्हणण्यानुसार, दररोज टनभर कचरा शहरातून बाहेर पडतो. या कचरामध्ये बांधकाम साइट कचरा देखील आहे. सहसा हा कचरा एका ठिकाणाहून उचलला जातो आणि दुसर्‍या जागी फेकला जातो. पण आता असं होणार नाही. इकोटेक सेक्टर -3 मध्ये एक प्लांट उभारला जात आहे. ही कंपनी दररोज 100 टन कचर्‍यापासून विटा आणि फरशा तयार करेल. लवकरच त्याची क्षमता 300 टन करण्यात येईल.

घर, ऑफिस आणि हॉटेल-रेस्टॉरंटमधून कंपनी उचलणार कचरा!

ग्रेटर नोएडा अथॉरिटी आणि कंपनी यांच्यातील करारानुसार कंपनी घर, ऑफिस, हॉटेल-रेस्टॉरंट्स, सार्वजनिक ठिकाण आणि बांधकाम साइटवरून कचरा गोळा करू शकते. पण यासाठी कंपनी दरमहा एक निश्चित शुल्कदेखील आकारणार आहे.

दरम्यान, शहरातील कचरा उचलण्यासाठी एक सेंटरही तयार करण्यात आलं आहे. ज्यामध्ये शहरातल्या 10 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ग्रेटर नोएडा पूर्वेमध्ये 5, ग्रेटर नोएडा वेस्टमध्ये 4 आणि नालेज पार्कमध्ये एक सेंटर तयार करण्यात आलं आहे. (in greater noida bricks and tiles to be made from city grabage by private compnay know its detail plan)

संबंधित बातम्या – 

मुलांच्या भविष्यासाठी LIC ची धमाकेदार योजना, बोनससह आहे खास सुविधा

PPF मध्ये ‘या’ तारखेला पैसे जमा केल्यास मिळणार बक्कळ परतावा, कसं असे व्याजाचं गणित?

30 वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कर्मचार्‍यांना शासन देणार 120000 रुपये; नेमकं सत्य काय?

(in greater noida bricks and tiles to be made from city grabage by private compnay know its detail plan)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.