LIC च्या ‘या’ योजनेत आधार कार्ड असणाऱ्या महिला बनणार श्रीमंत, जाणून घ्या…

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी LIC ची एक विशेष योजना आहे. एलआयसीच्या या योजनेचे नाव 'आधार शिला योजना' आहे, ज्यामध्ये 8 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात.

LIC च्या 'या' योजनेत आधार कार्ड असणाऱ्या महिला बनणार श्रीमंत, जाणून घ्या...
दररोज 25 रुपये बचत करा आणि 2 लाख मिळवा
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 10:18 AM

नवी दिल्लीः भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी विविध योजनांद्वारे विमा संरक्षण देते. तसेच दीर्घ मुदतीत पैसे कमविण्याची संधीसुद्धा उपलब्ध करते. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार या योजना निवडू शकतात. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी LIC ची एक विशेष योजना आहे. एलआयसीच्या या योजनेचे नाव ‘आधार शिला योजना’ आहे, ज्यामध्ये 8 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात.

LIC आधार शिला योजनेत सुरक्षा आणि बचत दोन्ही सुविधा उपलब्ध

LIC आधार शिला योजनेत सुरक्षा आणि बचत दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. या योजनांचा लाभ फक्त त्या महिला घेऊ शकतात, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे. आधार शिला योजनेच्या मॅच्युरिटीपूर्वी पॉलिसीधारकाच्या मृत्यूवर पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील उपलब्ध आहे. तर जर पॉलिसीधारक मॅच्युरिटीपर्यंत जिवंत राहिला तर त्यांना एकरकमी पेमेंट मिळते.

विमा रक्कम आणि प्रीमियम भरण्याचे नियम काय?

एलआयसी आधार शिला योजनेंतर्गत मूलभूत विमा रकमेची किमान रक्कम 75,000 रुपये आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपये आहे. पॉलिसीची मुदत किमान 10 वर्षे आणि कमाल 20 वर्षे आहे. या योजनेत कमाल मॅच्युरिटीचे वय 70 वर्षे आहे. ही योजना सामान्यतः निरोगी असलेल्या महिलांसाठी आहे आणि त्यांना कोणतीही वैद्यकीय चाचण्या घेण्याची आवश्यकता नाही. या योजनेसाठी प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक दिले जाऊ शकतात. विशेषतः महिलांसाठी तयार केलेल्या या योजनेंतर्गत प्रीमियम, मॅच्युरिटी क्लेम आणि डेथ क्लेमवर कर सूट सुविधा उपलब्ध आहे.

एलआयसी आधार शिला योजनेची मुख्य वैशिष्ट्ये?

आणीबाणीच्या परिस्थितीत बचत आणि आर्थिक सुरक्षा वाढवण्यासाठी डिझाइन केलेली ही एक नॉन-लिंक्ड पार्टिसिपेटरी एंडॉमेंट योजना आहे. यामध्ये पॉलिसी मुदतीच्या शेवटी एकरकमी रक्कम उपलब्ध आहे. जर पॉलिसीधारकाचा पॉलिसी कालावधी संपण्यापूर्वी मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला कव्हरेज मिळतो. याशिवाय पॉलिसीधारक पॉलिसी घेतल्यानंतर 5 वर्षांनी मृत्युमुखी पडला तर मॅच्युरिटीवर लॉयल्टी जोडण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. या योजनेच्या ग्राहकांसाठी अपघात लाभ रायडर देखील उपलब्ध आहे. यात गंभीर आजारासाठी कोणत्याही रायडरचा समावेश नाही.

लॉयल्‍टी एडिशन काय आहे?

जर पॉलिसी घेण्याची पाच वर्षे पूर्ण झाली असतील आणि आतापर्यंत सर्व प्रीमियम वेळेवर आणि पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर भरले गेले असतील, तर नामनिर्देशित व्यक्तीला लॉयल्टी अॅडिशन मिळते. विमाधारक महिलेने 5 वर्षांची मुदत पूर्ण केल्यानंतर पॉलिसी सरेंडर केली तर तिला लॉयल्टी बोनस मिळू शकतो. यासाठी एक अट अशी आहे की, स्त्रीला सर्व प्रीमियम वेळेवर भरावे लागतील.

मृत्यू लाभाची रक्कम

>> जर पॉलिसीची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला मिळणारी एकरकमी रक्कम वार्षिक प्रीमियमच्या 10 पट किंवा सर्व प्रीमियमच्या 105% किंवा पूर्ण विमा रकमेची असेल. >> पॉलिसी घेतल्यानंतर 5 वर्षांनी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला विमा रकमेच्या बरोबरीने मृत्यू लाभ मिळतो. अशा परिस्थितीत मृत्यू लाभ हक्काची रक्कम मूळ विमा रकमेच्या 110% इतकी असेल. >> जर पॉलिसीधारक पॉलिसी घेतल्याच्या 5 वर्षांनंतर पण मॅच्युरिटीपूर्वी मृत्युमुखी पडला तर, नामांकित व्यक्तीला मूळ विमा रक्कम आणि लॉयल्टी अॅडिशन मिळेल. >> जर पॉलिसीधारक पॉलिसीची मुदत पूर्ण होईपर्यंत जिवंत राहिला, तर मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून मूलभूत विमा रक्कम आणि लॉयल्टी अॅडिशनच्या बरोबरीचे असेल. पॉलिसीधारकाला मुदतपूर्तीची रक्कम मिळवण्याचा हक्क असेल जर त्याने पॉलिसी टर्मदरम्यान सर्व प्रीमियम भरले असतील.

संबंधित बातम्या

PNB स्वस्तात विकतेय 13598 घरे, दुकाने आणि शेतजमीन, जाणून घ्या खरेदीची प्रक्रिया

तुमची मार्कशीट ‘या’ लॉकरमध्ये सुरक्षित, जिकडे जाल तिथे तात्काळ मिळणार

In LIC Aadhaar Shila scheme, women with Aadhar card will become rich, find out

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.