AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income : महागाईची चर्चा पडली मागे, इतकी वाढली भारतीयांची इनकम

Income : देशात मध्यमवर्ग आणि गरीब महागाईत भरडून निघाला आहे. पण एका अहवालाने मात्र भारतीयांचे उत्पन्न वाढल्याचा दावा केला आहे. ऑनलाईन शॉपिंग, कार खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवरुन हा अंदाज बांधण्यात आला आहे. महागाईने सर्वसामान्यांचे बजेट बिघडलेले असताना भारतात या वस्तूंची खरेदी करतेय तरी कोण?

Income : महागाईची चर्चा पडली मागे, इतकी वाढली भारतीयांची इनकम
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 9:34 AM

नवी दिल्ली | 7 ऑक्टोबर 2023 : आता सणासुदीचे (Festival Season) दिवस आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. दिवाळी अवघ्या एका महिन्यावर आली आहे. इतर सणांची पण रेलचेल आहे. वातावरण उत्साहाचे आहे. खरेदीची लगबग दिसून येत आहे. महागाईने सर्वसामान्य हैराण असला तरी खरेदीचे आकडे वेगळाचा दावा करताना दिसत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलेले आहे. पण ऑनलाईन खरेदीचे प्रमाण, कार, बाईक खरेदीचे आकडे उत्साहवर्धक आहे. जुलै ते सप्टेंबर या काळातील आकड्यांनी तर नवीन झेप घेतली आहे. येत्या दिवाळीपर्यंत खरेदीत अजून मोठा पल्ला गाठल्या जाईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. देशात कोणत्या वर्गाचे उत्पन्न (Income Source) वाढले, कोणता वर्ग ही खरेदी करत आहे?

73 टक्के लोकांचे उत्पन्न वाढले

देशात मोठ्या प्रमाणात खरेदीची लाट आली आहे. हे आकड्यावरुन समोर आलेच आहे. UBS Evidence Lab या संस्थेने याविषयीची आकडेवारी समोर आणली आहे. त्यानुसार देशातील 73 टक्के लोकांचे उत्पन्न वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. तर 24 टक्के लोकांच्या उत्पन्नात मोठी घसरण झाली आहे. तर 70 टक्के नागरिकांनी येत्या एका वर्षांत त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची आशा आहे. 65 टक्के लोकांनी उत्पन्न वाढल्याने महागाईशी दोन हात करता आल्याचा दावा केला आहे.

हे सुद्धा वाचा

डिजिटल पेमेंटमध्ये येईल घसरण

युबीएस ईव्हीडन्स लॅबने हा सर्व्हे केला आहे. त्यात 18 ते 54 वर्षे वयोगटातील 1500 लोकांचा सहभाग होता. अर्थात हा नवश्रीमंत वर्ग असल्याचे समोर आले आहे. ते उच्च श्रीमंत अथवा मध्यम श्रीमंत गटातील असल्याचे समोर आले आहे. ज्या वर्गांनी जास्त खरेदी केली, त्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. भविष्यात डिजिटल पेमेंटमध्ये कमी येण्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे. 71 टक्क्यांमधील 58 टक्के लोकांनी डिजिटल पेमेंटवर विश्वास दाखवला. तर रोखीत व्यवहार करण्याची टक्केवारी 27 टक्क्यांहून 35 टक्क्यांवर पोहचली आहे. यामागील कारणं समोर आली नाहीत .

अशी झाली खरेदी

  1. गेल्या तीन महिन्यात सोन्यासह दागिन्यांवर जादा खर्च करण्यात आला
  2. तर 52 टक्के लोक येत्या दोन वर्षांत घर खरेदीची योजना आखत आहेत
  3. 58 टक्के नागरिक दुचाकी तर 50 टक्के नागरिकांची कार खरेदीची योजना आहे
  4. 61 टक्के लोकांची स्मार्टफोन, AC, TV, फ्रीज, लॅपटॉप खरेदीची इच्छा आहे
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली.
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू.
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप.
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.