Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका वर्षात 1 लाखाचे झाले 9 लाख रुपये, या गुंतवणुकीत मिळाला बंपर रिटर्न

शेअर बाजाराच्या या गुंतवणुकीत गुंतवणूकदारांचे एका वर्षात 8 वेळा पैसे वाढले आहेत. अधिक नफा देणारी आणि 800 टक्क्यांहून जास्त रिटर्न देणाऱ्या या गुंतवणुकीबद्दल जाणून घेऊयात.

एका वर्षात 1 लाखाचे झाले 9 लाख रुपये, या गुंतवणुकीत मिळाला बंपर रिटर्न
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 4:49 PM

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये बँका त्यांच्या ठेवींवरील व्याज दर (Interest Rate) सातत्यानं कमी करत आहेत. अशात, गुंतवणुकीचा असा एक पर्याय आहे ज्यामध्ये रिर्टन मिळण्याची कोणीची कोणतीही ठराविक वेळ नाही आहे. इतकंच नाही तर अधिक कालावधीसाठी बँकांसह इतर गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये यामध्ये अधिक पटीनं जास्त परतावाही मिळण्याची शक्यता आहे. ही शेअर बाजारातली (Stock Market) गुंतवणूक आहे. दीर्घ कालावधीत यामध्ये गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेअर बाजाराच्या या गुंतवणुकीत गुंतवणूकदारांचे एका वर्षात 8 वेळा पैसे वाढले आहेत. अधिक नफा देणारी आणि 800 टक्क्यांहून जास्त रिटर्न देणाऱ्या या गुंतवणुकीबद्दल जाणून घेऊयात. (in one year share market investors got 8 times return in stock market)

शेअर बाजारात गुंतवणूक हा एक असा मार्ग आहे ज्याच्या मदतीने तुम्ही काही वर्षांतच मोठ्या प्रमाणात नफा मिळवून गुंतवणूक आणखी वाढवू शकता. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, असे अनेक शेअर्स मार्केट आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना बक्कळ रिटर्न दिले आहेत. खरंतर, स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणं तसं जोखमीचं आहे. त्यामुळे तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच गुंतवणूक करा.

गुंतवणूकदारांच्या 1 लाखांचे झाले थेट 9 लाख रुपयांपेक्षा अधिक अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड लिमिटेड (Adani Green Energy Limited) ही देशातील रेन्यूएबल एनर्जी क्षेत्रातली कंपनी आहे. ही कंपनी सौर उर्जा प्रकल्पांमध्ये काम करते. गेल्या वर्षी एस्सेल ग्रीन एनर्जी आणि एस्सेल इन्फ्राप्रोजेक्ट्सकडून 10 मेगावॅट सौर मालमत्तांचं 1,300 कोटी रुपयांचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती.

अधिक माहितीनुसार, अडाणी ग्रीन एनर्जीची शेअर किंमत 4 नोव्हेंबर 2019 रोजी 92.65 रुपये होती. याचवेळी 5 नोव्हेंबर 2020 रोजी कंपनीची शेअर किंमत 855 रुपयांवर पोहोचली. यामध्ये मागच्या एका वर्षात कंपनीच्या स्टॉक्समध्ये 822 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच, ज्यांनी एका वर्षापूर्वी कंपनीत फक्त 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती त्यांची गुंतवणूक आता थेट 9 लाख रुपये झाली आहे. (in one year share market investors got 8 times return in stock market)

लखपती होण्याची आणखी एक संधी लॉरस लॅब (Laurus Labs) ही कंपनी एचआयव्ही रोगावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांमध्ये जे घटक वापरे जातात त्यांचा पुरवठा करते. या कंपनीचा गेल्या एका वर्षात शेअर थेट 280 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा एका वर्षाच्या तुलनेत चार पट वाढला आहे.

लॉरस लॅब कंपनीमधल्या गुंतवणूकदारांची चांदीच झाली आहे. लॉरस लॅबच्या शेअरची किंमत 4 नोव्हेंबर 2019 रोजी 74.71 रुपये होतो जी 282 टक्क्यांनी वाढून 284.40 रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे 1 लाखांची गुंतवणूक थेट 3 लाख रुपयांवर गेली आहे.

इतर बातम्या – 

‘या’ कॉलेजमध्ये फीऐवजी नारळ दिले तरी चालतील, कारण वाचून तुम्हीच म्हणाल एक नंबर!

US Election 2020 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक मतमोजणीत अडथळा, हँड सॅनिटायझरमुळे बॅलेट स्कॅनर खराब

(टीप – इथे फक्त स्टॉकचा परफॉर्मेंस देण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया नोंदणीकृत तज्ञाचा सल्ला घ्या.)

(in one year share market investors got 8 times return in stock market)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.