Multibagger Stock : हेच ते 5 शिलेदार, ज्यांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल!

Multibagger Stock : शेअर बाजारात काही शेअर्सनी धमाकेदार कामगिरी केली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात या शेअर्सने एकाच महिन्यात 100 टक्के परतावा दिला आहे. कोणते आहेत हे मल्टिबॅगर स्टॉक, जाणून घेऊयात..

Multibagger Stock : हेच ते 5 शिलेदार, ज्यांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल!
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 11:07 AM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) , गुंतवणूकदारांचे झटक्यात नशिब उघडविणारे स्टॉक आहेत. गेल्या महिन्याचा, एप्रिलचा विचार करता, या शेअर्सनी एकाच महिन्यात 100 टक्के परतावा दिला आहे. या स्टॉकने गेल्या महिन्यात गुंतवणूकदारांची रक्कम दुप्पट केली आहे. यामधील काही शेअर (Share)असे आहेत, ज्यामध्ये प्रत्येक दिवशी अप्पर सर्किट लागत आहे. तर काही शेअर्संवर दीड महिना अप्पर सर्किटची कृपा होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना लॉटरी लागली. त्यांना मोठा फायदा झाला. विशेष म्हणजे या कंपन्या टेक्सटाईल, इलेक्ट्रिक आणि इतर सेक्टरमधील आहेत. हे पाच स्टॉक तुमच्या पोर्टफोलियोत आहेत का?

Kakatiya Textile काकतिया टेक्सटाईलच्या मल्टिबॅगर स्टॉकने गेल्या एप्रिल महिन्यात जवळपास 130 टक्के परतावा दिला आहे. या शेअर 22.55 रुपयांनी वाढून 51.55 रुपये प्रति शेअर झाला आहे. बीएसईवर हा शेअर जवळपास 5 टक्क्यांनी वधारला आहे. शेअरमध्ये 46.54 रुपयांचे लोअर सर्किट लागले आहे. गेल्या महिन्यात या शेअरला प्रत्येक दिवशी अप्पर सर्किट लागले होते. या कंपनीचे एकूण भागभांडवल 27.04 कोटी रुपये आहे. यावर्षी हा स्टॉक 26 टक्क्यांनी घसरला आहे.

डब्ल्यूएस इंडस्ट्रीज WS Industries ही इन्सुलेटर्स तयार करणारी इलेक्ट्रिकल सेक्टरमधील दिग्गज कंपनी आहे. या कंपनीवर एक्सचेंजची एएसएम फ्रेमवर्क आहे. हा शेअर गेल्या महिन्यात 32.55 रुपयांहून 73.95 रुपयांवर पोहचला आहे. या कंपनीच्या गुंतवणूकदारांना 138 टक्के रिटर्न मिळाला आहे. 14 मार्चपासून या स्टॉकमध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागलेले आहे. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 312.19 कोटी रुपये आहे. या वर्षात या शेअरने 422 टक्के उसळी घेतली.

हे सुद्धा वाचा

पल्सर इंटरनॅशनल Pulsar International कंपनीचा शेअर गेल्या महिन्यात 45.09 रुपयांहून थेट 108.34 रुपये प्रति शेअरवर पोहचला. गुंतवणूकदारांना 140 टक्के परतावा मिळाला आहे. या शेअरमध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागले आहे. 3 जानेवारी रोजी शेअरचा भाव 4.01 रुपये होता. सध्या बीएसईवर शेअरला 119.40 रुपयांच्या अप्पर सर्किट लागले आहे. या कंपनीचे बाजारातील एकूण भागभांडवल 35.82 कोटी रुपये आहे. यावर्षी या कंपनीने 2877 टक्के परतावा दिला आहे.

आयबी इन्फोटेक IB Infotech ही आयटी सेवा पुरवठादार कंपनी आहे. या कंपनीचा शेअर गेल्या महिन्यात 62.24 रुपये होता. त्यात 130 रुपयांची उसळी घेऊन हा शेअर 142.42 रुपयांवर पोहचला. 15 मार्च रोजी या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले होते. आज या शेअरमध्ये 5 टक्के तेजी दिसून येत आहे. सध्या हा शेअर 146.40 रुपयांच्या अप्पर सर्किटवर आहे. यावर्षी हा शेअर 301 टक्क्यांनी वधारला. या कंपनीचे मार्केट कॅप 18.75 कोटी रुपये आहे.

माघ ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग कंपनी क्रिएटिव आणि मीडिया सेवा क्षेत्रातील या कंपनीचा शेअर एप्रिल महिन्यात प्रत्येक दिवशी अप्पर सर्किटवर होता. या शेअरने गुंतवणूकदारांची रक्कम 128 टक्के वाढवली आहे. या कंपनीचा शेअर 14.71 रुपयांहून 33.61 रुपयांवर पोहचला आहे. सध्या शेअरला लोअर सर्किट लागले आहे. या कंपनीचे एकूण भागभांडवल 10.47 कोटी रुपये आहे.

विशेष सूचना :  ही केवळ शेअरबाबतची माहिती आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.