‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीत कंपन्या स्त्रियांना देतायत जास्त पगार, पॅकेजमध्ये 70 टक्क्यांपर्यंत वाढ
वर्क फ्रॉम होम कल्चरमध्ये कंपन्या महिला कर्मचाऱ्यांना अधिक पगार आणि नोकरीच्या संधीही देत आहेत. कंपन्या महिलांना कामावर घेण्याच्या अंतिम पॅकेजमध्ये 70 टक्के वाढ देत आहेत.
नवी दिल्लीः कोविड 19 च्या साथीमुळे घरून काम करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेषतः आयटी क्षेत्रातील व्यावसायिक महिलांसाठी खूपच गुड न्यूज आहे. वर्क फ्रॉम होम कल्चरमध्ये कंपन्या महिला कर्मचाऱ्यांना अधिक पगार आणि नोकरीच्या संधीही देत आहेत. कंपन्या महिलांना कामावर घेण्याच्या अंतिम पॅकेजमध्ये 70 टक्के वाढ देत आहेत.
मध्यवर्ती व्यवस्थापनापासून वरिष्ठ स्तरापर्यंत महिलांच्या भरतीमध्ये जोर
आयटी क्षेत्रात आज प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात भरती होत आहे, जे या क्षेत्रातील एकूण भरतीच्या सुमारे 65 टक्के आहे. आयटी कंपन्यांमधील यंदाच्या मार्चपासून एकूण भरतीमध्ये महिला उमेदवारांची संख्या 43 टक्के आहे, असंही टीमलीज सर्व्हिसेसला आढळून आलंय. टीमलीज सर्व्हिसेसच्या सह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष रितूपर्णा चक्रवर्ती यांनी सांगितले की, मध्यवर्ती व्यवस्थापनापासून वरिष्ठ स्तरापर्यंत महिलांच्या भरतीमध्ये जोर आलाय.
विविधता उद्योगांवर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट संकेत
जरी इतर क्षेत्रांमध्ये नोकरभरती झाली नाही, परंतु विविधता उद्योगांवर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट संकेत आहेत. गेल्या तिमाहीपासून आयटी आणि नॉन-आयटी क्षेत्रांमध्ये विविधतेमध्ये इतकी वाढ कधीच दिसली नाही.
पॅकेजमध्ये 70 टक्के वाढ
सध्या केवळ आयटी क्षेत्रात महिलांची भरती होत नाही, तर पॅकेजमध्ये 60 ते 70 टक्क्यांची वाढही दिसून येत आहे. दुसऱ्या करिअरच्या महिलांना जास्त मागणी असते, कारण त्यांचे पगार अनेकदा परवडणारे असतात. नोकरी सोडल्यानंतर तिला पुन्हा काम करायचे आहे आणि तिने शेवटचा पगार अनेक महिने किंवा अनेक वर्षांपूर्वी उचलला असावा.
वर्क फ्रॉम होम (WFH) ने महिलांसाठी संधी
फक्त मोठ्या कंपन्या नोकऱ्यांच्या बाबतीत पुढे आहेत. छोट्या आणि मध्यम कंपन्यांची नियुक्ती अत्यंत संथ आहे. वर्क फ्रॉम होम (WFH) ने महिलांसाठी संधी वाढवल्यात, विशेषत: ज्या महिलांना पुन्हा कामावर जाण्याची इच्छा आहे. साथीच्या काळात घर सांभाळण्याच्या जबाबदारीसह महिलांनी पूर्णवेळ नोकऱ्यांमध्येही चांगली कामं केली आहेत. साथीच्या काळात महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त नोकऱ्या गमावल्यात. पण ज्या स्त्रियांच्या नोकऱ्या बाकी आहेत, त्यांची कामगिरी चांगली झालीय.
संबंधित बातम्या
RBI चे नवे नियम: देशातील मोठ्या बँकांनी लाखो बँक खाती केली बंद, ग्राहकांवर काय परिणाम?
स्मार्ट सेव्हिंग: अशा प्रकारे वैयक्तिक कर्जावरील व्याज करा कमी, कर्ज घेण्यापूर्वी 4 टिप्स जाणून घ्या
In the work-from-home culture, companies pay higher salaries to women, increasing packages by up to 70 per cent.