या राज्यात पेट्रोल, डिझेलवर सरकार एवढा कर वसूल करते, जाणून घ्या याबद्दल अधिक!

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत उत्तर प्रदेश (UP) मधून दिलासादायक बातमी येऊ शकते. यूपीमध्ये डिझेल, पेट्रोलवर VAT कमी होऊ शकतो. सध्या राज्यात पेट्रोलचे दर 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत. तर डिझेलचे दरही 100 रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत.

या राज्यात पेट्रोल, डिझेलवर सरकार एवढा कर वसूल करते, जाणून घ्या याबद्दल अधिक!
पेट्रोल
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 2:49 PM

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत उत्तर प्रदेश (UP) मधून दिलासादायक बातमी येऊ शकते. यूपीमध्ये डिझेल, पेट्रोलवर VAT कमी होऊ शकतो. सध्या राज्यात पेट्रोलचे दर 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत. तर डिझेलचे दरही 100 रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. योगी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील VAT कमी करण्याचा निर्णय घेतल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.22 रुपये आहे. तर डिझेलचा दर 97.48 रुपये प्रतिलिटर आहे. नोएडामध्ये एक लिटर पेट्रोल 105.44 रुपये आणि डिझेल 97.67 रुपयांना विकले जात आहे.

सलग दुसऱ्या दिवशी तेलाच्या किमतीत वाढ

गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. यानंतर तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. आज डिझेलच्या दरात 35 पैशांनी, तर पेट्रोलच्या दरात 35 पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. वेगवेगळ्या राज्यांची सरकारे आपापल्या परीने कर आकारतात. सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर 32.90 रुपये आणि डिझेलवर 31.80 रुपये उत्पादन शुल्क आकारते.

देशातील इंधनाच्या किमती गेल्या 15 महिन्यांत 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे भविष्यात देशात जास्त मायलेज देणाऱ्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी श्रेणीती गाड्यांची मागणी वाढू शकते, असे एचएसबीसी ग्लोबल रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

संबंधित बातम्या : 

दिवाळी ऑफर! IRCTC Air वरून फ्लाइटचे तिकीट बुक करा आणि मिळवा अनेक फायदे!

डिटर्जंट पावडर आणि शॅम्पू महागले, P&G ने सर्व उत्पादनांच्या किमती 4-11 टक्क्यांनी वाढवल्या!

या दिवाळीमध्ये खास आपल्या प्रियजनांना गिफ्ट करा ‘हा’ म्युच्युअल फंड, FD पेक्षा जास्त परतावा मिळेल!

(In Uttar Pradesh, the government collects so much tax on petrol and diesel)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.