पत्नीच्या खात्यात पैसे टाका अन् आयकर वाचवा, कशी काम करते ही ट्रिक

Income tax saving tips: तुमच्या पत्नीचे उत्पन्न कमी आहे किंवा उत्पन्न नाही तर तुम्ही तिच्या नावावर गुंतवणूक करु शकतात. मुदत ठेव, म्यूचुअल फंड, भविष्य निर्वाह निधी यासारख्या गुंतवणूक पर्याय तुम्ही वापरु शकतात. त्यावरुन मिळणाऱ्या उत्पन्नावर कमी कर लागेल.

पत्नीच्या खात्यात पैसे टाका अन् आयकर वाचवा, कशी काम करते ही ट्रिक
tax saving
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 11:18 AM

Income tax saving tips: आयकर वाचवण्याचा अनेक पर्यायांचा शोध सर्वसामान्य व्यक्ती घेत असतात. त्यासाठी सीएचा सल्लाही घेतला जातो. पत्नीच्या खात्यात पैसे टाकण्याचा एका पर्यायावर चर्चा होत असते. याबाबची ट्रिक वापरुन आयकर वाचवता. पत्नीच्या खात्यावर पैसे टाकून कर वाचवण्याचा पद्धतीला ‘क्लबिंग’ म्हटले जाते. जर तुम्ही पत्नीच्या नावाने काही गुंतवणूक केली, तिच्या खात्यात पैसे टाकले तर त्याचे काही फायदे होऊ शकतात. त्यासाठी हा पूर्ण नियम काय आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

काय आहे क्लबिंग पर्याय

आयकर नियम 60 ते 64 नुसार, जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या खात्यात पैसे टाकले आणि त्यापासून काही उत्पन्न मिळाले (जसे व्याज, घरभाडे, डिव्हिडंड) तर ते तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते. त्यावर कर लागतो. त्याला क्लबिंग पर्याय म्हटले जाते. परंतु तुम्ही तुमच्या पत्नीला रक्कम भेट दिली तर त्यावर कोणताही कर लागत नाही. मात्र, त्यावरुन मिळणाऱ्या नफ्यावर क्लबिंग नियम लागू असणार आहे.

गुंतवणुकीतून कर वाचवण्याचे उपाय

तुमच्या पत्नीचे उत्पन्न कमी आहे किंवा उत्पन्न नाही तर तुम्ही तिच्या नावावर गुंतवणूक करु शकतात. मुदत ठेव, म्यूचुअल फंड, भविष्य निर्वाह निधी यासारख्या गुंतवणूक पर्याय तुम्ही वापरु शकतात. त्यावरुन मिळणाऱ्या उत्पन्नावर कमी कर लागेल.

हे सुद्धा वाचा

हाउस रेंट अलाउंस

पत्नीच्या नावावर घर असेल तर तुम्ही तिला भाडे देऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला घरभाडे भत्ता (एचआरए) साठी क्लेम करता येईल. त्यामुळे तुमच्या करातील रक्कम कमी होईल.

बचत खात्यात पैसे वर्ग करणे

पत्नीच्या बचत खात्यात पैसे वर्ग करता येतात. त्यामुळे बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेतील उत्पन्नापासून तुम्ही वाचू शकतात. बचत खात्यातील व्याजावर दहा हजारांपर्यंत सूट आहे.

काय करायला हवे?

  • पत्नीच्या नावावर गुंतवणूक करा. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कमी कर लागतो.
  • क्लबिंग पर्यायाचा योग्य पद्धतीने वापर करा.
  • HRA च्या माध्यमातून कर वाचवा.

काय करु नये?

  • चुकीची माहिती देऊ नका.
  • क्लबिंग पर्यायाकडे दुर्लक्ष करु नका.
  • विचार न करता आर्थिक निर्णय घेऊ नका.

या पद्धतीने वाचवा आयकर

  • ज्याचे लग्न होणार आहे, त्याने लग्नापूर्वी पत्नीला संपत्ती गिफ्ट केली तर ती क्लबिंग पर्यायात येणार नाही.
  • तुम्ही पत्नीला खर्चासाठी पैसे देत असाल आणि ती त्याच्यातून बचत करत असेल तर ते ही उत्पनात येणार नाही.
  • आरोग्य विमाच्या माध्यमातून बचत करता येते. सेक्सन 80D अंतर्गत तुम्ही वैद्यकीय विमाच्या प्रीमियममधून 25,000 पर्यंतची रक्कम वाचवू शकतात.
  • तुम्ही पत्नीला गिफ्ट ऐवजी कर्ज देऊन आयकर वाचवू शकतात. तुम्ही तिला कमी व्याजावर पैसे देऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला डॉक्यूमेंट ठेवावे लागतील. त्यामुळे तुमचे दोन्ही उत्पन्न क्लब होणार नाही.
  • तुम्ही गुंतवणुकीसाठी जॉइंट खाते उघडू शकतात. फक्त प्रायमरी होल्डर पत्नी असली पाहिजे. त्यामुळे तुमची टॅक्स लायबिलिटी कमी होईल. कारण जॉइंट अकाउंटमधून मिळणाऱ्या व्याजाचे उत्पन्न प्रायमरी होल्डरला मिळते.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.